PARMATMA EK- मठाधिप
PARMATMA EK- मठाधिपती
![]() |
PARMATMA EK- मठाधिपती |
भारत देशात बहुधर्मी लोक राहतात. या देशाचा इतिहास पाहिला तर असे आढळून येते की या देशात अनेक भक्तिपंथाचे किंवा मार्गाचे उगम झालेले आहेत आणि त्या मागाचे मठ तयार करण्यात येऊन मठाधिपती नेमण्यात आलेले आहेत. त्याचे कारण असे आहे की, भारतीय संस्कृतीचे उगमस्थान भक्तीचे असो किंवा मार्गाचे असो त्याला अनन्यसाधारण महत्व या समाजात आहे आणि त्याचे संस्थापक व प्रचारक यांना त्या संस्थेचे अथवा मठाचे सर्व अधिकार प्राप्त झालेले आहेत.
महानत्यागी बाबा जुमदेवजी यांनी आपल्या निवासस्थानी एका भगवंताची प्राप्ती करुन मानवधर्म स्थापन केला. या मार्गाचे उगमस्थान त्यांचे स्वतःचे निवासस्थान असून ते १९४८ पासून निरंतर मानव जागृतीचा प्रचार करुन मानवांना जागविण्याचे कार्य निष्काम भावनेने करीत आहेत आणि याच उद्देशाने मानव मंदिर या भवानाची निर्मिती झाली म्हणून त्यांना या नवनिर्मित मानव मंदिर या भवनाचे मठाधिपती म्हणून घोषित करणे हे क्रमप्राप्त ठरले.
तसेच मठाधिपती या नात्याने त्यांचा उत्तराधिकारी नेमण्याचे संपूर्ण अधिकारही त्यांना बहाल करण्यात येत आहेत असे ३१ जानेवारी १९८८ रोजी झालेल्या मंडळाच्या कार्यकारिणी आणि कार्यकर्त्यांच्या बैठकीत ठरले. त्याप्रमाणे कार्यकारिणीने बाबांना मठाधिपती चे पद आभूषित करण्याची विनंती केली आणि बाबांनी
ही विनंती मान्य केली.
त्याप्रमाणे परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ, नागपूरच्या दिनांक २७ मार्च १९८८ च्या आमसभेत मानवाला योग्य मार्ग दाखवून मानवजागृतीचे निष्काम भावनेने कार्य करीत असलेले सेवक, सर्व सेवकांचे मार्गदर्शन व प्रणेते, मानव धर्माचे संस्थापक महानत्यागी बाबा जुमदेवजी यांना मठाधिपती म्हणून घोषित करण्यात आले व त्यांना मठाधिपतीचे सर्व अधिकार बहाल करण्यात आले.
तसेच मठाधिपती या नात्याने त्यांनी पेतलेले सर्व निर्णय मंडळ आणि सर्व सेवक यांना बंधनकारक राहतील असे एकमताने ठरविण्यात आले. अशाप्रकारे महानत्यागी बाबा जुमदेवजी हे परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळाचे संस्थापक असून मानव मंदिराचे मठाधिपती आहेत.

Leave a Comment