PARMATMA EK- आजचा अनुभव

                   👉▶️ आजचा अनुभव

PARMATMA EK- आजचा अनुभव
PARMATMA EK- आजचा अनुभव 

     👇🏿👇🏿👇🏿👇🏿

⭕⭕⭕⭕⭕⭕⭕⭕⭕⭕⭕

*!!" भगवान बाबा हनुमानजी को प्रणाम "!!*
*!!" महानत्यागी बाबा जुमदेवजी को प्रणाम "!!*
      *!! परमात्मा एक !!*

     *["माझा सत्य अनुभव"]*




सर्वप्रथम मी भगवान बाबा हनुमानजी ,महाणत्यागी बाबा जुमदेवजी व मातोश्री वाराणसी आई ला प्रणाम करून माझ्या अनुभव मालिकेतील पहिला अनुभव मानवधर्म एकता परिवार गृपवर आपल्या समोर सादर करत आहो. 


आधी त्या दुःखाचे आभार मानतो की त्या दुःखामुळे आम्हाला  अनमोल मोलाचा दैवी शक्तीचा व या मार्गाचा लाभ मिळाला.

माझे नाव प्रफुल नत्थुजी देशमुख आहे व मी 2nd year(IT Engineering) पलोटी कॉलेज मध्ये शिकत आहे. 2009 मध्ये मी माझ्या परिवारासोबत मार्गात  प्रवेश केला .माझ्या परिवारात माझे पप्पा,मम्मी, मी व माझा लहान भाऊ अशे 4 व्यक्ती आहोत.
माझ्या पप्पा ला दारूचे व्यसन होते,त्याच बरोबर आमच्या घरी नेहमी लहान लहानश्या गोष्टी वरून झगडे होत असत, जाणत्याने सुद्धा आमच्या परिवारावर जादूटोणा केला होता.   2009 मध्ये सारंग गॅस एजंसी नरसाळा रोड येथे माझ्या पप्पाचा अकॅसिडेंट झाला व त्यांच्या पायाची हड्डी तुटली व 1महिने 4 दिवस पप्पा  चौधरी हॉस्पिटल, सक्करधरा मध्ये ऍडमिट होते व हॉस्पिटल मधून डिस्चार्ज झाल्यानंतर घरीच एक जागी बसून सर्व जेवण-पाणी,अंघोड वगैरे करत होते.त्यांनतर आम्ही अनेक जडी-बुट्टी,लेप लावणे व होमिओपॅथिक वगैरे अशे अनेक प्रकारचे उपचार केले ,परंतु उपचाराचा फायदा झाला नाही.

                    त्यानंतर आम्ही परमात्मा एक मार्गाबद्दल ऐकले होते .माझ्या  पप्पाचे मामा प्रभाकरजी मस्के यांच्या कडे हा मार्ग होता.नंतर माझ्या मम्मी व पप्पा नि मस्के मामाजी यांना विचारपूस केली व ते आम्हाला लांडगे काकाजी(दिघोरी) कडे घेऊन गेले .त्यांनतर काकाजीनी आम्हाला मार्गाची रूपरेषा सांगितली व राखी ला 6 दिवस बाकी होते तेव्हा आम्ही या मार्गात  प्रवेश केला.आम्हाला 3 दिवसाच्या कार्यातच चमत्कार दिसला .कार्याच्या तिसऱ्या दिवशी माझी मम्मी पप्पाच्या पायाला बाबाच्या ज्योतीचे तेल व रक्षा लावत होती तेव्हा पप्पा ला अचानक 2 साप दिसले व  पप्पाच्या  3 महिन्या पासून एकही हालचाल ना होणारा पाय पप्पा  नि हलवला व तेव्हा पासून  माझ्या पप्पाचा पाय चांगला झाला  व २०१३ मध्ये आम्ही त्यागाचे कार्य घेतले व २०१४ मध्ये आमच्या घरी ९ वे हवंनकार्य पार पडले .भगवान बाबा हनुमानजी,महानत्यागी बाबा जुमदेवजी व मातोश्री वाराणसी आईच्या कृपेने आमच्या परिवारात  सर्व सुखी समाधानी आहे, अशीच कृपा आमच्या परिवारावर असू द्या व माझ्या शिक्षणात सुद्धा मला योग्य तो साथ राहू द्या , एवढेच बोलून मी माझ्या अनुभवाला विराम देतो.



लिहिण्यात काही चुक-भुल झाली असेल तर “भगवान बाबा हनुमानजी” , “महानत्यागी बाबा जुमदेवजी",मातोश्री वाराणसी आई व सर्व सेवक सेविका व माझे बालमित्र यांना क्षमा मागतो.

नमस्कार...!

*नाव:- प्रफुल नत्थुजी देशमुख*
*मु .:-अंबिका नगर,नरसाळा रोड नागपूर*
*सेवक क्रं.:-32493*
*मार्गदर्शक : -मारोतरावजी राऊत गुरुजी(गट न.८)*
परमपुज्य परमात्मा एक सेवक मंडळ,वर्धमाननगर,नागपूर.

*•••••••••••••••••••••••••••••••••*
*--------------------------*
*--------------------------*
*[टिप :- वरिल अनुभवाची कुणिही काँपी करु नये, त्यापेक्षा जास्तीतजास्त शेअर करावा.]*

*भगवतकार्याच्या या गृपला जुडण्याकरिता व आपले परमेश्वरिकृेचे अनुभव सेवकांपर्यत पोहोचवीण्याकरिता खालील सेवक दादांशी संपर्क साधावा...*

*गणेश दादा बिडकर :-9766573410*
*मोहन दादा आस्वले:-9764989883*
*रोशन दादा काटेकर :-8956656210*
•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••

सौजन्य :-
"अॅडमिन,सेवक,सेविका",
मानवधर्म एकता परिवार,
[Watts app group & Facebook page}
युवा आणि जेष्ठ सेवकांचा समुह, 
परमपुज्य परमात्मा एक सेवक मंडळ, वर्धमाननगर, नागपुर.
©®

••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••

No comments

Powered by Blogger.