PARMATMA EK- सहकारी ग्राहक भांडार परमात्मा एक
सहकारी ग्राहक भांडार
![]() |
| PARMATMA EK- सहकारी ग्राहक भांडार परमात्मा एक |
महानत्यागी बाबा जुमदेवजी यांनी आध्यात्मिक कार्याव्दारे सेवकांचे शारीरिक दुःख दूर केल्यावर त्यांचे जीवनमान उंच आणण्याकरिता आणि त्यांना आर्थिक लाभ मिळावा म्हणून सहकारी बैंक स्थापन करुन मदत केली. त्यानंतर सेवकांच्या दैनंदिन मुलभुत गरजा सुलभतेने पूर्ण कशा होतील याकडेही त्यांनी लक्ष दिले.
सप्टेंबर १९७६ साली एके दिवशी महानत्यागी बाबा जुमदेवजी यांच्या निवासस्थानी परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळाचे कार्यकर्ते जमले होते. त्यांत श्री. नागोराव खापरे नावाचे एक सेवक हजर होते. चर्चाबैठक सुरु असतांना त्यांनी बाबांना विनंती केली की, सध्या बाजारात चांगली वस्तु मिळत नाही. जिकडे तिकडे खाद्य वस्तुंमध्ये भेसळ होत आहे. यामुळे या भेसळीचा दुष्परिणाम लोकांना होत आहे. म्हणून आम्हा सेवकांची इच्छा आहे की, आपल्या मार्गाच्या सेवकांना जीवनोपयोगी वस्तु चांगली, शुध्द व सुलभतेने मिळावी या उद्देशाने एखादे सहकारी तत्वावर बाबांच्या मार्गदर्शनाखाली ग्राहक भांडार तयार व्हावे. त्यावर बाबांनी सेवकांना मार्गदर्शन केले.
बाबांनी त्या प्रस्तावाचे स्वागत केले आणि ते म्हणाले, आपणा सर्वांची इच्छा आहे तर सहकारी भांडार स्थापन करायला हरकत नाही. बाबा सेवकांच्या इच्छेला नेहमी साथ देऊन, ती पुर्ण करतात. तरी आपल्याला चांगली वस्तु योग्य भावात सुलभतेने कशी मिळवता येईल याचा विचार करावा. असे सांगून बाबांनी सेवकांना आदेश दिला की बहुउद्देशीय भांडाराचे बॉयलॉज विकत आणून सहकारी तत्वावर प्रपोजल तयार करावे तसेच धान्यपुरवठा अधिकारी यांच्याशी धान्याकरिता संपर्क साधावा. याकरिता श्री. देवाजी टिल्लुजी खापरे यांची मुख्य प्रवर्तक म्हणून नेमणूक होऊन त्यांना मदत करण्याकरिता अकरा लोकांची एक समिती स्थापन करण्यात येऊन बाबांच्या मार्गदर्शनाचाली या समितीने ग्राहक भांडार उभारण्याचे कार्य केले.

जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, नागपूर यांच्याशी पत्र व्यवहार पूर्ण झाल्यावर त्यांचे पत्र क्रमांक एन.जी.पी./सी.ओ. एन./१८७/७६ दिनांक १६ डिसेंबर १९७६ च्या पत्राप्रमाणे परमात्मा एक सेवक बहुउद्देशीय ग्राहक भांडार सहकारी संस्था, नागपूर या नावाने किरकोळ खरदेविक्रीकरिता संस्थेची नोंदणी करण्यात आली. या वेळपर्यत सेवकांचे भागभांडवलाच्या रुपात ६,०२० रुपये जमले होते. व्यवहाराकरिता पैसा कमी पडल्यामुळे सेवकांकडून ठेवी स्वीकारण्यात आल्या. तसेच जिल्हा मध्यवर्ती ग्राहक भांडार सहकारी संस्थेचे भागभांडवलही घेण्यात आले. तसेच नागपूर डिस्ट्रिक्ट को ऑपरेटीव्ह बँक, नागपूरकडून पन्नास हजार रुपयांचे कॅश क्रेडीट कर्ज घेण्यात आले.
दुकानाकरिता योग्य अशी जागा पाहून प्रथम किराणा आणि धान्याचे दुकान १०,३२० रुपये भागभांडवलावर उघडण्यात आले. ४ जुन १९७७ रोजी महानत्यागी बाबा जुमदेवजी यांच्या प्रमुख उपस्थितीत श्री. नागोराव चापरे, अध्यक्ष परमात्मा एक नागरिक सहकारी बँक यांच्या शुभहस्ते भांडाराचे उद्घाटन जागनाथ बुधवारी, तिन नल चौक येथे झाले. या दिवशी फल्ली तेलाचा कोटा वाटप करण्यात आला. या दुकानात दैनंदिन जीवनोपयोगी वस्तु, धान्य, किराणा इत्यादी ठेवण्यात आल्या होत्या. अशाप्रकारे सेवकांना तसेच त्या भागातील इतर गरीब लोकांना योग्य भावात चांगल्या वस्तु मिळण्याचे ते एकमेव केंद्र बनले आहे.
या दुकानात सर्व व्यवहार सत्यानेच केला जातो. या द्कानाची भरभराट होऊन त्याचाच दुसरा भाग थोड्याच दिवसांनी कापडविक्री सुरु करण्यात आली. या दुकानाच लौकीक ऐकून महाराष्ट्र सरकारने साखर आणि सिमेंटची एजन्सीही संस्थेला दिली आणि या किरकोळ व्यवहाराबरोबर ठोक व्यवहार सुरु झाला. हे ग्राहक भांडार सहकारी तत्वांवर बाबांच्या आदेशानुसार "न नफा न तोटा" या तत्वावर सुरु आहे. येथील संचालक मंडळ निष्काम भावनेने ग्राहक मंडळाची सेवा करते. येथीम कर्मचारी स्वतःचे दुकान समजुन बाबांनी शिकविल्याप्रमाणे सत्य, मर्यादा, प्रेमाने व्यवहार करतात. त्यामुळे या दुकानाच्या बाबतीत जागनाथ बुधवारी या भागात आदर निर्माण होऊन विश्वास निर्माण झाला आहे. त्यामुळे ही संस्था थोड्याच काळाम भरभराटीला आली आहे. या दुकानातील कर्मचारीसुध्दा निःस्वार्थ भावनेने कार्य करुन ग्राहक भांडाराचे नावे उज्ज्वल करण्यात हातभार लावत आहेत.

Leave a Comment