PARMATMA EK- दुग्ध उत्पादक सहकारी संस्था, धोप

                      दुग्ध उत्पादक सहकारी संस्था, धोप

PARMATMA EK- दुग्ध उत्पादक सहकारी संस्था, धोप
PARMATMA EK- दुग्ध उत्पादक सहकारी संस्था, धोप


             सालई मेटा या ठिकाणी दुध उत्पादक संस्था सुरु झाल्यानंतर तिथी दिवसेंदिवस होत असलेली प्रगती पाहून भंडारा जिल्ह्यातील धोप, लोहारा, तांडगाव, गायमुख, सोरना, सिरसोली, मोरगाव, काठी, लंजेरा, जांब, कांद्री इत्यादी गावातील मानवधर्म या मार्गातील सेवकांनी धोप या गावी १४ सप्टेंबर १९७९ रोजी श्री. शामराव कार, लोहारा यांच्या अध्यक्षतेखाली सभा घेतली आणि या भागात दुध डेअरी स्थापन करावी आणि त्याकरिता महानत्यागी बाबा जुमदेवजी विनंती करावी असे ठरविले. याच सभेत श्री.हिराजी शेंडे, धोप यांना प्रमुख करण्यात आले.


                  ठरल्याप्रमाणे वरील गावांतील सेवकांचे एक शिष्यमंडळ श्री.हिराजी शेंडे यांच्या अध्यक्षतेखाली महानत्यागी बाबा जुमदेवजी यांना विनंती करण्याकरिता नागपूरला आले. त्यांनी बाबांना विनंती केली की, आम्हाला सहा सात मैलांवरुन दुध न्यावे लागते. तसेच इतर डेअरींपासूनही आम्हाला त्रास आहे. म्हणून या ग्रामीण भागातील सेवकांना तसेच इतर लोकांना दुध डेअरी स्थापन केल्यास एक उद्योग मिळेल आणि त्रासातुन सेवक मुक्त होतील. दुध उत्पादकांच्या दुधाला योग्य भाव मिळेल. दुपाची रकमही त्यांच्या पदरात वेळेवर पडेल व त्यामुळे या भागातील गोरगरीब सेवकांची परिस्थिती सुधारेल. म्हणून आपण आमच्या भागतील पोप या गावी दूध डेअरी तयार करुन यावी. जेणेकरुन आमचे जीवनमान उंच येईल. बाबांनी त्यांच्या विनंतीला मान देऊन पोप या गादी त्या भागतील सेवकांची बैठक बोलाविली. बाबा त्या बैठकीला स्वतः जातीने हजर होते.


                 महानत्यागी बाब जुमदेवजी यांनी या बैठकीत सर्व सेवकांना योग्य मार्गदर्शन केले आणि श्री. हिराजी शेंडे यांना प्रमुख प्रवर्तक नेमून त्यांच्या अध्यक्षतेखाली अकरा लोकांची सल्लागार समिती नेमून श्री. हिराजी शेंडे यांना भंडारा जिल्हा दुग्ध विकास अधिकारी, भंडारा यांच्याशी पत्रव्यवहार करण्याचे अधिकार दिले. तसेच याच बैठकीत ११२ सभासद बनवून त्यांच्याजवळून शेअर्सच्या रुपात रुपये ठेव म्हणून जमा केले. श्री. हिराजी शेंडे, धोप यांनी दुध उत्पादक संस्थेकरिता पत्रव्यवहार करुन सहकारी कायद्यानुसार या संस्थेला धोपच्या ऐवजी गायमुख या गावाच्या नावावर दुध उत्पादक संस्थेकरिता भंडारा जिल्हा दुग्ध विकास, भंडारा यांचे पत्र क्र. बी.एच.ए./पी.आर.डी./ए. १९४ दि.७ एप्रिल १९८१ रोजी नोंदणी केली. 

                
                कारण धोप हे गाव जांब या गावात असलेल्या दुध डेअरीच्या कक्षेत येत होते. या संस्थेचे नाव परमात्मा एक सेवक दुग्ध उत्पादक सहकारी संस्था, गायमुख असे ठेवण्यात आले. या संस्थेचे उद्घाटन महानत्यागी बाबा जुमदेवजी यांचे एकुलते एक चिरंजीव डॉ. मनो ठुब्रीकर, असोसिएटेड प्रोफेसर, व्हर्जिनिया मेडिकल सेंटर, व्हर्जिनिया, यु.एस.ए. यांच्या करकमलाव्दारे दिनांक १ फेब्रुवारी १९८१ रोजी महानत्यागी बाबा जुमदेवजी यांच्या प्रमुख उपस्थितीत ग्रामपंचायत ऑफीस, धोप येथे झाले. त्या गावाचे सरपंच श्री. आत्माराम सोलंखी यांनी त्यांच्या कक्षेत ती जागा येत असल्यामुळे त्यांनी महानत्यागी बाबा जुमदेवजी यांची निष्काम सेवा पाहून त्यांना दुध डेअरीकरिता भाडे न घेता जागा वापरायला दिली. याच दिवसापासून प्रत्यक्षात दुध संकलनाला सुरुवात झाली. पहिल्याच दिवशी २०० लीटर दुध संकलन करण्यात आले.


                     या संस्थेची स्वतःची इमारत व्हावी म्हणून रामटेक-तुमसर या रस्त्यावर एक चांगलीशी जागा पाहण्याचे ठरले. त्याकरिता येणारा खर्च म्हणून ८० लोकांकडून चोवीस हजार रुपये ठेव म्हणून जमविण्यात आले. याच गावात तुकाराम पतीराम शेंडे नावाचा बाबांचा एक सेवक राहत होता. तो फार गरीब होता. परंतु त्याचे सर्व दुःख या मार्गात आल्याने नष्ट झाले होते. त्याला या मार्गात येण्यापुर्वी जे शारीरिक दुःख होते त्याच्याकरिता त्याने खुप पैसा खर्च केला. तांत्रिक मांत्रिक उपाय केले, पण दुःख दुर झाले नाही. उलट तो बरबाद झाला. या मार्गात आल्यावर त्याचे संपूर्ण दुःख दूर होऊन त्याची सर्व प्रकारची शारीरिक, मानसिक आणि आर्थित परिस्थिती सुधारली. त्यामुळे त्याला खुप आनंद झाला. त्याची धानाची शेती तुमसर-रामटेक या मार्गावर होती. त्यातील १०0 X १०0 फुट जागा त्याने या संस्थेकरिता अनुदान देण्याची बाबांजवळ इच्छा दर्शविली. परंतु बाबांनी त्याची आर्थिक परिस्थिती पाहुन त्याला संस्थेतर्फे तीन हजार रुपये जमिनीची किंमत म्हणून दिली आणि या संस्थेत आजीवन चौकीदाराची नोकरीही दिली. आजही तो या संस्थेत चौकीदार आहे.

दुध डेअरी व्यवस्थित चालावी म्हणून या संस्थेने त्या परिसरातील पन्नास लोकांना हमी घेऊन इतर बँकांतुन त्यांना गाई, म्हशी घेण्याकरिता कर्ज उपलब्ध करुन दिले. तसेच डेअरीची इमारत बांधण्याकरिता परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ, नागपूर यांच्याकडून आर्थिक मदत घेतली.


                अशाप्रकारे या डेअरीची दिवसेंदिवस प्रगती होत आहे. आजमितीस या ठिकाणी रोज ८०० लिटर दुध संकलित होते. येथील दुध उत्पादकाला वेळेवर आणि त्रास न होता पैसे चुकते होतात. यामुळे या भागतील दुध उत्पादक आनंदित आहेत. आज या डेअरीची स्वतःची वास्तु असुन तिचा परिसर इथल्या कर्मचाऱ्यांनी अत्यंत रमणीय बनविला आहे. या संस्थेची स्वतःची फॅट तपासणी मशीन असुन दुध उत्पादकांच्या जनावरांकरिता खाद्यपदार्थाचे खरेदीविक्री केंद्रही सुरु केले आहे. तसेच पुरक धंदा म्हणून रासायनिक खताचाही व्यवहार सुरु आहे. त्यामुळे या परिसरातील लोकांचा वाया जाणारा वेळ ते शेतीच्या कामासाठी वापरतात.

या सर्व गोष्टी महानत्यागी बाबा जुमदेवजी यांच्या मार्गदर्शनाने घडल्या आहेत. त्यांनी आपल्या सेवकांना या खेडेविभागात आध्यात्मिक मार्गदर्शन करुन व्यावहारिक ज्ञान दिले. अशाप्रकारे बाबांनी आपल्या सेवकांच्या सामाजिक समस्या सोडविल्या आहेत.

1 comment:

Powered by Blogger.