PARMATMA EK- धर्मार्थ दवाखाना | परमात्मा एक

       PARMATMA EK- धर्मार्थ दवाखाना | परमात्मा एक


PARMATMA EK- धर्मार्थ दवाखाना | परमात्मा एक
PARMATMA EK- धर्मार्थ दवाखाना | परमात्मा एक


           सृष्टिच्या बदलत्या वातावरणामुळे अनेक रोग उत्पन्न होतात आणि त्याचा त्रास मानवाला होतो. सध्याच्या धकाधकीच्या काळात समाजातील कमकुवत व दुर्बल घटकांना मोफत वैद्यकीय सेवा सुलभतेने उपलब्ध होणे ही काळाची गरज आहे. तसेच परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ, नागपूर या संस्थेची संलग्न असलेले अनेक गोरगरीब वैद्यकीय सेवेपासुन वंचित आहेत. त्यांना वैद्यकीय सेवा उपलब्ध करुन देणे हा उद्देश समोर ठेवुन नागपूर शहरातील मागास भागामध्ये ज्या ठिकाणी या मार्गाचे सेवक जास्त प्रमाणात निवास करतात अशा भागात या संस्थेव्दारे धर्मार्थ दवाखाना उघडून त्यांना वैद्यकीय सेवा उपलब्ध करुन द्यावी या उद्देशाने या संस्थेच्या कार्यकर्त्यांनी बैठक दिनांक ४ सप्टेंबर १९८८ रोजी झाली असता त्या सभेत धर्मार्थ दवाखाना उघडण्याचे ठरविण्यात आले. शरीर ही खरी संपत्ती आहे. 


            'Health is Wealth' या म्हणीप्रमाणे मानवाची प्रकृती ठणठणीत असल्यास तो त्याच्या संपूर्ण आयुष्यात अनेक गोष्टींची उपलब्धी सहजतेने करु शकतो. मंडळातर्फे घर्मार्थ दवाखाना उघडण्यात यावा असे ठरल्यामुळे बाबांना मंडळातर्फे तशी विनंती करण्यात आली.

                    महानत्यागी बाबा जुमदेवजी यांनी आध्यात्मिक कार्य करुन मानवी जीवन जागृत केले. त्याचबरोबर या मार्गातील सेवकांच्या उत्थानाकरिता सामाजिक कार्य केले. त्यांना दैनंदिन जीवनाशी निगडित असलेल्या गरजा भागविण्यासाठी सहकारी बँक, ग्राहक भांडार, दुध उत्पादक संस्था इत्यादी अनेक संस्था निर्माण करुन या मार्गातील सेवक गरीब आणि कष्टकरी असल्यामुळे त्यांचा जीवननिर्वाह समाधानाने चालविण्याकरिता सहकार्य केले. मंडळाने विनंती केल्याप्रमाणे त्यांची प्रकृती सुदृढ व ठणठणीत राहावी त्यांचे रोगांपासून संरक्षण व्हावे अशा दृष्टिकोनातुन बाबांनी मंडळाच्या या कार्याला चालना दिली आणि स्वतः यावर योग्य मार्गदर्शन करुन धर्मार्थ दवाखाना उघडण्यात पुढाकार घेतला.


                अशाप्रकारे या मंडळाची आर्थिक परिस्थिती बघुन दि. २९ जुन १९८९ रोजी महानत्यागी बाबा जुमदेवजी यांच्या प्रमुख उपस्थितीत डॉ. मनो ठुब्रीकर, एसोसिएट प्रोफेसर, व्हर्जिनिया मेडिकल सेंटर व्हर्जिनिया, यु.एस.ए. यांच्या अध्यक्षतेखाली डॉ. कडासने, सिव्हील सर्जन, मेयो जनरल हॉस्पिटल, नागपूर यांच्या करकमला द्वारे मानव मंदिराच्या भवनातील खोली क्रमांक ५मध्ये धर्मार्थ दवाखानाचे उद्घाटन झाले.


                  यानंतर दवाखान्यात लाभ, या मार्गातील सेवक तसेच इतर लोक जे मागास आणि गरीद वस्तीत राहतात त्या सर्वाना जास्तीत जास्त मिळावा म्हणून मागास भाग समजला जाणाऱ्या जागनाथ बुधवारी या भागात हलविण्यात आला. हा भाग गोळीबार चौक, बांग्लादेश, बिनाकी मंगळवारी, लालगंज, शांतीनगर, इतवारी, जुनी मंगळवारी, महाल या भागातील मध्यवर्ती ठिकाण पडते. कारण या भागात या मार्गाचे सेवक जास्त प्रमाणात राहतात. तसेच वरील संपूर्ण भाग मागासला असून गरीब वस्तीचा आहे. 


             म्हणून इतर गरीब लोकांना सुध्दा याचा लाभ मिळावा हा उद्देश होता. या दवाखान्यात दोन नियमित डॉक्टर असून रोज साधारणतः ७० ते ८० रुग्ण त्याचा लाभ घेतात. अशाप्रकारे बाबांनी मानवाला शारीरिक वेदनेपासून (रोग) मुक्त करण्याचे कार्य केले आहे. हा दवाखाना फक्त गरीब सेवकांकडून मिळणाऱ्या दानावरच चालतो हे विशेष. अशाप्रकारे हर एक गरीब लोकांकडून चालविला जाणारा भारतातील एकमेव दवाखाना आहे असे म्हणण्यास हरकत नाही.


               अशाच प्रकारचा वैद्यकीय लाभ खेडेविभागातील लोकांना मिळावा या उद्देशाने बाबांच्या मार्गदर्शनाखाली मंडळाव्दारे भंडारा जिल्ह्यातील मोहाळी तहसिलातील घोप या गावी दवाखाना उघडून गरीब सेवकांची व लोकांची सेवा करण्याचे व्रत महानत्यागी बाबा जुमदेवजी यांनी घेतले. त्याप्रमाणे दि. १४ ऑक्टो. १९९१ रोजी महानत्यागी बाबा जुमदेवजी यांच्या हस्ते दवाखान्याचे उद्घाटन झाले आणि पहिल्याच दिवशी ८० रुग्णांनी याचा लाभ घेतला. या उद्घाटनाच्या सोहळ्याकरिता आमदार श्री. सुभाष कारेमोरे आणि श्री. राम अस्वले उपस्थित होते. या दवाखान्याचा लाभ या भागातील गरीब जनतेला मोठ्या प्रमाणात होत आहे. धन्य ते मानव धर्म स्थापन करणारे सेवकांचे धर्मगुरु महानत्यागी बाबा जुमदेवजी.


No comments

Powered by Blogger.