PARMATMA EK - परमात्मा एक मार्गदर्शन | परिणती:-
PARMATMA EK - परमात्मा एक मार्गदर्शन | परिणती:-
![]() |
| PARMATMA EK - परमात्मा एक मार्गदर्शन | परिणती:- |
मानव मृत्युलोकात जन्माला आला की त्याला एक दिवस हे जग सोडून जावेच लागते हे त्रिकालाबाधित सत्य आहे. परंतु तो केव्हा या जगातुन जाईल हे कोणीही निश्चीतपणे सांगू शकत नाही. इतिहास पाहिला असता असे आढळुन आले आहे की, जे परमेश्वराची खरी कृपा प्राप्त करतात व योगी असतात त्यांनाच त्यांच्या मृत्युबद्दल चाहुल लागते. किंबहुना त्यांना मृत्युची वेळ आणि दिवस कळतो. त्यामुळे फक्त तेच त्यांच्या शिष्यांना मृत्युची माहिती करुन देऊ शकतात.
१९८८ सालच्या जानेवारी महिन्याची घटना. महानत्यागी बाबा जुमदेवजी सायंकाळच्या सुमारास आपल्या आसनावर (स्थानावर) बसले होते. त्यावेळेस बाबांकडे बाबांचा पुतण्या रमेश ठुब्रीकर आणि परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळाचे संचालक श्री. मेघराजजी कोहाड हे उपस्थित होते. बाबांना त्यांच्या मृत्युबद्दल काहीतरी साक्षात्कार झाला असावा म्हणून चर्चा करताकरता एकाएकी बाबांनी खूप जोराने रडायला सुरुवात केली. काही वेळाने ते उपस्थितांना सांगू लागले की, मला माझे आयुष्य संपल्यासारखे वाटते, आता मी फार काळ जगू शकणार नाही. असे म्हणून पुन्हा ते रडु लागले. बाबांच्या डोळ्यात अश्रु पाहून दोघाही उपस्थितांनी रडायला सुरुवात केली. दोघांनाही खुप वाईट वाटले.
इतक्या लवकर आपले धर्मगुरु आपल्याला सोडून जाणे योग्य नव्हे. समजा ते जर हे जग सोडून गेलेत तर त्यांच्या पश्चात भविष्यामध्ये आपल्याला जीवन कंठण्याकरिता कोणीही त्यांच्यासारखे मार्गदर्शक लाभणार नाहीत आणि जोपर्यंत या मार्गाबद्दल योग्य मार्गदर्शक मिळत नाही तोपर्यंत बाबांचा सहयोग सेवकांना मिळालाच पाहिजे ही सर्व सेवकांची इच्छा होती. म्हणून महानत्यागी बाबा जुमदेवर्जीना श्री. कोहाड यांनी अशी विनंती केली की, आम्ही बाबांची निराकार बैठक घेऊ आणि त्यात बाबा हनुमानजीला विनंती करु. याला महानत्यागी बाबा जुमदेवजींनी संमती दिली.
दिनांक २० जानेवारी १९८८ रोजी परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ, नागपूरच्या वतीने मानव मंदिर भवनमध्ये या मार्गातील सर्व कार्यकर्त्यांची एक बैठक उपस्थितीत आयोजित करण्यात आली. या बैठकीत बाबा तसेच सर्व सेवक उपस्थित होते. बाबा आपल्या आसनावर स्थानापन्न झाल्यावर निराकारमध्ये आले. जेव्हा बाबा निराकारमध्ये येतात तेव्हा ते देहभान अवस्थेत नसतात. या अवस्थेत ते परमेश्वरात विलीन झालेले असतात. किंबहुना ते परमेश्वराच्या रुपात असतात. सर्व सेवकांनी बाबांना प्रणाम केला. बाबा निराकारमध्ये आल्यावर उपस्थित सर्व रोवकांना त्यांनी विचारले की, आपने बाबा को कैसे बुलावा किया? तेव्हा श्री. मेघराज कोहाड यांनी उभे राहून बाबांना प्रणाम केला. नंतर सर्व सेवकांतर्फे भगवान बाबा हनुमानजीला, भगवंत रुपातील बाबांना विनंती केली की, बाबा आम्ही अनाडी सेवक असल्यामुळे दैवी शक्तीबद्दल तसेच मानव जागृतीच्या कार्यकर्ता बाबांचे आम्हा सेवकांना नियमित मार्गदर्शन आणि सहयोग आणखी काही वर्षांकरिता तरी पाहिजे आहे आणि आपण हा योग आम्हांस द्यावा अशी इच्छा आहे. त्यानंतर परमेश्वररुपी बाबांनी मार्गदर्शन केले आणि सांगितले की, भगवान आपकी इच्छा पुरी करेंगे और अगले आदेशतक मार्गदर्शन करेंगे! इतके बोलुन बाबा आकारात आले.
विधिलिखीत टळत नसते असे म्हणतात. त्याप्रमाणे काही महिन्यानंतर महानत्यागी बाबा जुमदेवजींवर संकट आले. त्यांची प्रकृती बिघडली. त्यांच्या छातीत दुखायला लागले, तीन चार दिवस त्रास सहन करुन त्यांनी तसेच काढले. परंतु एक दिवशी खुप त्रास झाला. त्या दिवशी सकाळी घरी आलेल्या सेवकांना त्यांनी मार्गदर्शन केले. आंघोळ वगैरे आटोपून जेवण झाल्यानंतर त्यांना छातीचा त्रास एकाएकी वाढल्याचे जाणवू लागले. म्हणून ते आईला (बाबांची धर्मपत्नी सौ. वाराणसीबाई आणि आपल्या सर्व सेवकांची आई) म्हणाले की, रिक्षा आण! आपण डॉक्टरांकडे जाऊ.
रिक्षा आणल्यावर बाबा आईसोबत गांधीबागेतील डॉ. तोलानी यांच्या दवाखान्यात गेले. ते हार्ट स्पेशालिस्ट (हृदयरोगतज्ज्ञ) आहेत. दवाखाना पहिल्या माळ्यावर आहे. ते जिन्याच्या पायऱ्या चढुन डॉक्टरांकडे गेले. डॉ. तोलानी यांनी त्यांची विचारपुस करुन त्यांना तपासले. त्यानंतर डॉक्टर बाबांना म्हणाले की, आपण सांगता की तीन दिवसांपासून छातीत त्रास आहे आणि आपणास काहीच झाले नाही. आपण जीवंत कसे राहिलात? आपल्या छातीत जे दुखणे आहे त्या दुखण्याच्या पॉईंटवर कोणताही मानव जीवंत राहु शकत नाही. आपण जीवंत कसे आहात हेच मला कळत नाही. तेव्हा बाबा डॉक्टरांना म्हणाले की, तुम्ही म्हणता तसा मुळीच त्रास नाही. मला काहीही झाले नाही. थोडासा दुखण्याचा त्रास झाला म्हणून मी आपणाकडे आलो, मला औषध द्या आणि मी घरी जातो. हे ऐकुन डॉक्टर लगेच उद्गारले, बाबा तुम्ही हे काय बोलता? मी तुम्हाला या टेबलाच्याखाली पाय ठेवु देणार नाही. मी तुम्हाला दवाखान्यात भरती करतो आहे. त्याप्रमाणे डॉक्टरांनी बाबांनी दवाखान्यात भरती करुन घेतले.
दहा दिवस औषधोपचार झाल्यावर बाबांना दवाखान्यातुन सुटी झाली. बाबा दवाखान्यातुन घरी यायला निघाले तेव्हा दरवाज्यात डॉक्टर बाबांना म्हणाले, "बाबा ऐसी कृपा आप मुझे दो। मैं कभी नहीं भूलूँगा की इस पॉईंटपर कोई जीवित नही रहता, लेकीन आप जीवित रहे। आपके साथ सचमुच भगवान है।" यावर बाबा उत्तरले, डॉक्टर साहब हमने आपकी आवाज सुन ली। इतके बोलुन बाबा खोलीच्या बाहेर निघून घरी आले. तेव्हापासून डॉक्टर तोलानी बाबांना परमेश्वररुपी मानव मानतात.
महानत्यागी बाबा जुमदेवजी यांची प्रकृती बरी नसल्याचे कळल्यावर बाबांचे चिरंजीव डॉ. मनो ठुब्रीकर अमेरिकेतुन बाबांना भेटण्यास आले. डॉ. मनो ठुब्रीकर हे अमेरिकेतील व्हर्जिनिया सेथे चार्लोटा विला शहरात नोकरीनिमित्त वास्तव्यास आहेत, नागपूरला आल्यावर त्यांनी बाबांच्या प्रकृतीची संपूर्ण चौकशी केली. त्यानंतर त्यांनी बाबांना डॉ. टावरी, इंस्टीट्युट ऑफ मेडीकल सायन्सेस येथे तपासण्याकरिता नेले. तपासाअंती असे कळले की, बाबांच्या हृदयामध्ये काहीतरी त्रास आहे. कुठेतरी रक्तनलिकेतुन रक्तप्रवाह होण्यास बाधा निर्माण झाली आहे असे सांगितल्या गेले. म्हणून बाबांना सविस्तर तपासण्याकरिता ऑपरेशन थिएटरमध्ये नेले. तेथे बाबांच्या हृदयावर छोटीशी शस्त्रक्रिया करुन व्हाल्व पंक्चर केल्या गेले. त्यानंतर मशीनच्या साहाय्याने कोणत्या नलिकेत बाधा निर्माण झाली आहे हे तपासण्याकरिता सुरुवात झाली परंतु ती मशीन बंद पडली. खुप प्रयत्न करुनही ती मशीन सुरु होण्याचा योग दिसत नव्हता. तेव्हा तेथील सर्व डॉक्टर खूप घाबरुन गेले.
त्यांच्यावर डॉ. मनो फार नाराज झाले. कारण त्यांनी व्हर्जिनिया मेडिकल सेंटर येथे हृदयाच्या व्हाल्ववर रिसर्च केलेले आहे. त्यामुळे त्यांना याची पूर्ण माहिती होती. डॉ. मनो तेथील डॉक्टरांवर खूप रागावून म्हणाले की, हे तुम्ही काय केले? शस्त्रक्रिया करण्याच्या अगोदर मशीन पूर्णपणे तपासून का घेतली नाही? त्या सर्व डॉक्टरांनी डॉ. मनो ची क्षमायाचना केली आणि म्हटले चालु मशीन बंद कसे पडले हे आम्हाला अजुनही कळत नाही. त्यानंतर बाबा घरी आले आणि ते मशीन पुनः पूर्ववत काहीही दुरुस्ती न करता सुरु झाले. हा सर्व भगवंताचा खेळ होता. येथे भगवंताला सर्वांची परिक्षा घ्यायची होती असे म्हटल्यास अतिशयोक्ती होणार नाही. कारण बाबांच्या कुटुंबातील लोक(मुलगा, सुन, नातवंडे) अमेरिकेला राहतात. त्यामुळे बाबांचा उपाय हा अमेरिकेलाच कुटुंबातील लोकांसमोर व्हावा असे भगवंताला घडवायचे होते. जेणेकरुन कुटुंबातील लोकांकडून बाबांची सेवा घडावी. या मार्गातील ही देखील एक शिकवण आहे.
बाबा घरी आल्यावर डॉ. मनो बाबांना म्हणाले, आपण अमेरिकेला या. तेथे सर्व प्रकारच्या मशीन्स आहेत. तेथे संपूर्ण तपासणी केल्यानंतर पुढील निर्णय घेऊन कार्य करु. त्याप्रमाणे बाबा मुंबईवरुन व्हर्जिनिया येथे जाण्याकरिता दिनांक ४ डिसेंबर १९८५ रोजी विमानाने निघाले. तत्पूर्वी २७ नोव्हेंबर १९८९ रोजी दाबा नागपूरवरुन मुंबईला गेले. त्यांच्यासोबत मंडळातर्फे श्री. कुंभारे, सोनकुसरे, शेरके इत्यादी सेवक मंडळ मुंबईला गेली होती. डिसेंदर १९८९ रोजी बाबा डॉ. मनो ठुढ्रीकर यांच्या निवासस्थानी ५ चार्लोटेसव्हिला येथे पोहवले. बाबांसोबत सुषमा गेल्या होत्या. तेव्हा आईची प्रकृती ठणठणीत होती. तरीपण त्या मनाने खुप खंगलेल्या दिसत होत्या. त्यांच्या मनात कुठली तरी भिती निर्माण झाली होती असे वाटत होते. बहुतेक त्यांना बाबांच्या प्रकृतीविषयी काळजी वाटत असावी.
काही दिवस आराम केल्यावर २० डिसेंबर १९८९ रोजी बाबांची प्रकृती तेथील व्हर्जिनिया मेडिकल सेंटर, व्हर्जिनिया येथे तपासण्यात आली. याठिकाणी स्वतः डॉ. मनो ठुब्रीकर असोसिएटेड प्रोफेसर म्हणून कार्यरत असून सर्जरी डिपार्टमेंटचे ते प्रमुख आहेत. दोन-तीन दिवस तपासणी करुन दि.२३ डिसेंबर १९८५ रोजी बाबांच्या छातीवर शस्त्रक्रिया (L.A.D.) करण्यात आली. त्याच देवशी बाबांना बघण्याकरिता आई दवाखान्यात गेल्या होत्या बाबांना बेशुद्धावस्था, तपून त्या स्वतःच शुष्क हरवून बसल्यात. (शस्त्रक्रिया झाल्यावर रुग्ण काही काळ बेशुध्दावस्थेत असतो.) त्यानंतर आईवर औषधोपचार करुन त्यांना घरी आणण्यात आले. बाबांना दवाखान्यातून ३० डिसेंबर १९९८९ ला सुटी झाली आणि ते पण डॉ. मनोकडे घरी आले. परंतु आईची प्रकृती दिवसेंदिवस बिघडत होती. शेवटी ३१ डिसेंबरला आईना त्याच दवाखान्यात भरती करण्यात आले.
डॉ. मोंनी आणि त्यांच्या कुटुंबातील लोकांनी आईची खूप सेवा केली, पण आई मात्र बेशुध्दावस्थेतच राहिल्यात. जवळजवळ पाच महिने अमेरिकेला वास्तव्य केल्यावरही आईच्या प्रकृतीला आराम पडला नाही. त्यांना त्याच अवस्थेत नागपूरला आणण्यात आले. त्यांच्यावरोबर बाबा आणि एक मेडीकल अटेन्डन्ट म्हणून मेरी नावाची नर्स आली होती. कोणताही पेशन्ट (रुग्ण) बेशुष्दावस्थेत असतांना मेडिकलची तरतूद असल्याशिवाय विमानाने आणता येत नाही. परंतु या गोष्टींची तरतुद नसतानाही कोणत्याही प्रकारची अडचण निर्माण न होता त्या सुखरुपपणे नागपूरला पोहचल्यात. आईना आणि बाबांना घेण्याकरिता मुंबईला नागपूर वरून मंडळातर्फे सर्वश्री वामन कुंभारे, क्रिष्णा बुरडे, रमेश ठुब्रीकर आणि बाळु शेळके हे सेवक गेले होते. काहीही त्रास न होता बेशुध्दावस्थेतील रुग्ण इतक्या लांबचा प्रवास करुन घरी सुखरुपपणे पोहचणे यामागे कोणती तरी दैवी शक्ती त्यांना साथ देत होती हे यावरुन सिध्द होते. म्हणजेच बाबा परमेश्वररुपी मानव आहेत.
आई नागपूरला विमानतळावर पोहचल्यावर त्यांना सरळ डॉ.टावरी यांच्या दवाखान्यात भरती करण्यात आले. तेथे त्यांच्यावर वैद्यकीय उपचार करण्यात आले. परंतु डॉक्टरांना यश मिळाले नाही. त्यानंतर बाबांच्या निवासस्थानी आईला तशाच बेशुध्दावस्थेत आणण्यात आले. घरीसुध्दा वैद्यकीय उपचार सुरु होतेच. परंतु घरी सुध्दा कोणताही आराम पडला नाही. दिवसेंदिवस त्यांची प्रकृती खालावतच होती. त्यांना शुध्दीवर आणण्याचे प्रयत्न सर्वतोपरी करुनही त्यांना शुध्दीवर आणणे शक्य झाले नाही आणि ३१ जुलै १९९० रोजी सकाळी ६ वाजुन २० मिनिटांनी त्यांनी शेवटचा श्वास सोडला. आई सर्व सेवकांच्या हृदयाचे ठोके एका क्षणाकरिता बंद करुन, सर्वांना सोडून आणि जगाला शेवटचा नमस्कार करुन निघून गेल्यात. त्यांचा आत्मा परमेश्वरात विलीन झाला. सर्व सेवकांच्या मनाला चटका देऊन त्या सर्वांपासून दूर निघून गेल्या. आई फार दयाळू होत्या. त्या प्रत्येकाची जातीने चौकशी करीत असत. सर्वांना आपुलकीच्या भावनेने समजावत असत. सर्व सेवकांना आजही त्यांच्याबद्दल नितांत आदर आहे. आईने प्रत्येक सेवकाच्या हृदयात त्याच्या स्वतःच्या आईपेक्षा जास्त जवळचे स्थान निर्माण केले आहे. त्या गेल्यामुळे सर्वाचे हृदय उचंबळून आले.
महानत्यागी बाबा जुमदेवजी यांनी सेवकांना मार्गदर्शन करताना सांगितले की, खरे तर बाबा हेच जग सोडून जायला पाहिजे होते. त्यांचे आयुष्य संपलेले होते.
परंतु सर्व सेवकांच्या आग्रहाखातर बाबांनी निराकार बैठकीत सेवकांना शब्द दिला होता की बाबा सेवकांना सहयोग देऊन पुढील आदेशापर्यंत सेवकाबरोबर राहून मार्गदर्शन करतील. परंतु बाबांचे आयुष्य पूर्ण झाले होते आणि परमेश्वराने शब्द दिला होता. मग बाबांना पुढील आयुष्य कोतुन देणार कारण विधीलिखीत अशी म्हण आहे की माणूस जन्माला येताना त्याच्या आयुष्याचा कार्यकाल अगोदरच ठरविलेला असतो. म्हणून बाबांनी सेवकांची जास्त दिवस सेवा करुन सेवकांना परमेश्वरी कृपा मिळवून देण्याचे आणि दैवीशक्तीच्या प्रती जागृती निर्माण करण्याचे कार्य सतत करावे असे आईला सतत वाटत होते. म्हणून बाबांचे ऑपरेशन झाल्यावर बाबांना जीवनदान मिळाले आणि आई त्याचवेळेस बेशुध्द झाल्या त्या नेहमीकरिताच. आईचे आयुष्य पूर्ण झाले नव्हते. पण हा भगवंताचा घडविलेला योगायोग आहे. आईने आपले उर्वरित आयुष्य बाबांना दिले हे यावरुन सिध्द होते. धन्य त्या आम्हां सेवकांच्या आई ज्यांनी आपले आयुष्य सेवकांच्या कल्याणाकरिता आणि सहयोगाकरिता बाबांना दिले. त्यामुळेच आज बाबांच्या मार्गदर्शनाचा लाभ सेवकांना त्यांचे आयुष्य सुखसमाधानाने जगण्याकरिता मिळत आहे. अशाप्रकारे आईच्या उर्वरीत आयुष्याची परिणती बाबांच्या आयुष्याला जीवनदान करण्यात झाली.
आई गेल्यानंतर बाबांचे चिरंजीव डॉ. मनो ठुब्रीकर यांनी बाबांना विनंती केली की, बाबा आपण इथे एकटे राहण्यापेक्षा माझ्याबरोबर अमेरिकेत चला. तेव्हा बाबांनी त्याला स्पष्टपणे सांगितले की, माझे परमेश्वरी कार्य इथेच असुन माझ्या मार्गदर्शनाची सेवकांना तसेच मानवांना अत्यंत आवश्यकता असल्यामुळे मी तुझ्याबरोबर येऊ शकत नाही. आई गेल्यानंतर बाबा एकटेच असल्यामुळे त्यांचा सांभाळ करण्याची जबाबदारी त्यांचे लहान बंधु श्री. मारोतरावजी ठुद्रीकर यांच्या परिवाराने घेतली. तेव्हापासुन त्यांनी बाबांचा सांभाळ केला.
परमेश्वरी कृपेचा लाभ मानवांना मिळावा व त्याकरिता बाबांनी सतत सेवकांना मार्गदर्शन करावे मानवाचे उत्थान करावे या दृष्टीने आईने बाबांना आपले उर्वरीत आयुष्य दिले. त्यावेळी बाबांचे वय ७० वर्षांचे होते. बाबांना आधीच हृदयविकार, मधुमेह, रक्तदाबाचा सुध्दा त्रास होता. हा त्रास असणाऱ्यांना आधीच आराम व संतुलीत जिवन जगणे आवश्यक असते. परंतु बाबानी त्यांची काहीच पर्वा न करता सेवकांना सतत मार्गदर्शन करीत. त्यांना वेळेचे भानसुध्दा राहत नसे. सेवकांना मार्गदर्शन करण्याकरिता बाबा खेडोपाडी सुध्दा जाऊन परमेश्वरी कार्य करु लागले. त्यामुळे त्यांच्या शरिरावर वाईट परिणाम झाले. तरीसुध्दा बाबा परमेश्वरी कार्य करण्याकरिता स्वतःच्या शारिरीक त्रासाला महत्व देत नसत.
त्यामुळे त्यांचा शारिरीक त्रास दिवसेंदिवस वाढतच होता. अखेर त्यांचा मधुमेहाचे प्रणाम वाढल्यामुळे त्यांना डॉ. शरद पेंडसे यांच्या दवाखान्यात भर्ती करण्यात आले. त्रास कमी झाल्यानंतर त्यांना घरी आणण्यात आले. त्याच सुमारास त्यांच्या पायाला जखम झाल्यामुळे त्यांचा पायाचा त्रास वाढतच गेला. अशाही परिस्थितीत बाबांनी परमेश्वरी कार्य सतत सुरु ठेवले. उतार वयात अधिक श्रमाने त्यांच्या शरीरावर वाईट परिणाम होवुन त्यांची प्रकृती जास्त खालावल्यामुळे १९९६ च्या सप्टेंबर महिन्याच्या शेवटी त्यांना डॉ. टावरी यांच्या सिम्स हॉस्पीटलमध्ये भर्ती करण्यात आले. त्यावेळी त्यांच्या कुटुंबातील सर्वांनी तसेच सर्वांनी, कार्यकर्त्यांनी सर्वोतोपरी त्यांची काळजी घेतली. तरीसुध्दा बाबांच्या प्रकृतीत कोणत्याही प्रकारची सुधारणा झाली नाही. अखेर ३ ऑक्टोंबर १९९६ ला रात्री ११.३० वा. बाबांची प्राणज्योत परमेश्वरात विलीन झाले व बाबा आम्हा सर्वांना सोडुन गेले.
बाबांचे पार्थिव त्याच रात्री सिम्स हॉस्पीटल मधुन बाबांच्या निवासस्थानी आणण्यात आले. तसेच बाबांचे चिरंजीव डॉ. मनो ठुब्रीकर यांना कळविण्यात आले. दुसऱ्या दिवशी सकाळी बाबांचे पार्थीव सेवकांच्या तसेच त्यांच्या चाहत्यांच्या अंतीम दर्शनाकरिता परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ, वर्धमान नगर येथील मानव मंदिरात ठेवण्यात आले. डॉ. मनो यांना वेळेवर विमान उपलब्ध न झाल्यामुळे ते लगेच येऊ शकले नाही. ६ ऑक्टोंबर १९९६ ला सायंकाळी डॉक्टर साहेबांचे आगमण झाले. तोपर्यंत बाद यांचे पार्थीव मानव मंदिरात ठेवण्यात आले होते. सतत चार दिवस बाबांचे पार्थीव दर्शन घेण्याकरिता सेवकांची रीघ लागली होती. दि.७ ऑक्टोंबर ला सकाळी ७ वाजता बाबांचे पार्थीव शरीर बाबांचे निवासस्थान टिमकी येथे आणण्यात आले व दुपारी १२ वाजता दादांची अंतीम यात्रा काढण्यात आली. या अंतीम यात्रेत जवळ-जवळ ४० हजार लोकांचा जनसमुदाय उपस्थित होता.
त्यावेळी 'भगवान बाबा हनुमानजी की जय, महानत्यागी बाबा जुमदेवजी की जय, परमात्मा एक, तसेच महानत्यागी बाबा जुमदेवजी अमर रहे या जयघोषाने नागपूर नगरी दुमदुमत होती.

Leave a Comment