PARMATMA EK- परमात्मा एक मानवधर्मामध्ये तिर्थाचे महत्व काय आहे.

 

PARMATMA EK- परमात्मा एक मानवधर्मामध्ये तिर्थाचे महत्व काय आहे.
PARMATMA EK- परमात्मा एक मानवधर्मामध्ये तिर्थाचे महत्व काय आहे. 

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

 |भगवान् बाबा हनुमानजी को प्रणाम|

||महानत्यागी बाबा जुमदेवजी को प्रणाम||

||परमात्मा एक।।


🍃🍃🍃🍃🍃🍃🍃🍃

🌻मानवधर्म एकता परिवार व्हाट्सअप ग्रुप तर्फे दिनांक २३/०९/२०२० बुधवार दिवशी घेण्यात आलेल्या चर्चा बैठकिचा  विषयावर गृप मधील आलेले विचार एकदा अवश्य वाचावे🌻

🌿🌿🌿🌿🌿🌿🌿

👉परमात्मा एक मानवधर्मामध्ये तिर्थाचे महत्व काय आहे 👈


 विचार क्रमांक 1:-


नमस्कार जी सर्वाना,

           आजचा विषय छान आहे या विषयावर मी माझे विचार व्यक्त करीत आहे परमात्मा एक मार्गात तीर्थ म्हणजे एका ग्लासा मध्ये पानी घेवून भगवंतला ज्योत लावून योग मागून बाबा हनुमानजी फु म्हणत ग्लासातील पाण्यावर फुक  मारने आणी हे पानी म्हणजेच तीर्थ होय.


            परमात्मा एक मार्गात तीर्थ म्हणजे एक साधारण पाणी नव्हे तर ते सेवकांकरिता अमृतसमान आहे जेव्हा एक सेवक आपले दुख घेवून या मार्गात येन्याचा विचार करतो व तो मार्गदर्शका कड़े जातो तेव्हा मार्गदर्शक सेवक त्याला सर्व प्रथम बाबा हनुमानजी फु नावाचा तीर्थ बनवून देतो आणि या तीर्थ ग्रहण करताच दुःखी सेवक यांचे दुख दूर होते हाच या तीर्थचा चमत्कार आहे सेवक तीर्थ हे 3, 11, 21, 41,101,आणि 108 फुकाचे बनवू शकतो.


             परमात्मा एक सेवकांच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्य तीर्थ बनवू शकतो जेव्हा एखादा अनेकातील व्यक्ति आपल्याला तीर्थ बनवून माँगतो तेव्हा आपण त्यांना तीर्थ बनवून देवू शकतो फक्त लक्षात ठेवावे की तो व्यक्ति व्यशन केलेला नसावा तीर्थ सेवकांकरिता हे अमृतसमान आहे जेव्हा सेवक तीर्थ बनवून प्राशन करतो तेव्हा त्यांचे दुख दूर होते कारण या तीर्थमधे स्वयं बाबा हनुमानजी नावाचा मंत्र आपण फूँकलेला असतो म्हणून हे  साधारण दिसत असलेले पानी एक अमृत बनते अनेकातील लोक हे हरिद्वार ला जाऊन गंगा जल आनतात आणि त्याला विधिवत पूजा अर्चना होम यज्ञ करुण त्याचे तिर्थरूपात रूपांतर होते परन्तु बाबा जुमदेव जी यांनी सेवकांना कुठेही न जाता आपापल्या घरी घरातील सदस्यांनी हे अमृत बनवू शकतात परमात्मा एक सेवक हे प्रत्येक बोरवेल, विहीर, ओढ्यातील पाण्याचे रूपांतरण एका क्षणात तीर्थात करू शकतो आणि आपले दुख दूर करू शकतो.


         परमात्मा एक मार्गात तीर्थाचे महत्व आपण यावरून समझू शकतो की जेव्हा बाबा जुमदेवजी हे पचमढ़ी ला गेलेले होते तेव्हा बाबाना तेथे खाई मधे खुप सारी आत्मा भटकताना दिसली तेव्हा बाबा नी बाबा हनुमानजी फु  नावाचा तीर्थ बनविला आणि खाइत त्या आत्म्यवरती शिम्पला या तीर्थमुळे त्या सर्व अतृप्त आत्म्याना मोक्ष मिळाला आणि त्यांची भूतलवरुन मुक्ति झाली फक्त या तीर्था मुळे आणि असे अमृत परमात्मा एक मार्गातील सेवकच करू शकतो असे परमात्मा एक मार्गात तीर्थाचे महत्व आहे माझा लीहण्यात काही चूक झाली असेल तर मला माफ करावे इतके लिहून मी माझे विचार संपवत आहे. 

सर्व सेवक दादा आणि ताईला माझा नमस्कार


 🙏 नमस्कार जी 🙏

मानवधर्म एकता परिवार

रोशन विनोद राव काटेकर

न्यू गणेश नगर बहादूरा रोड नागपूर

सेवक क्र. 597 ---5799


विचार क्रमांक-२:-


🙏      महानत्यागी बाबा जुमदेवजींनी खुप कष्ट करून एका भगवंतांची प्राप्ती केली व आपल्या सारख्या गोर  गरीब सेवकांना दुःखातून मुक्त केले. व मानवाचे दुःख दूर करण्यासाठी मानव धर्माची स्थापना केली. या मानव धर्माचा उद्देश हाच की *मानवाने मानवासारखे वागावे* या करिता बाबांनी सकाळ ची विनंती व सायंकाळची प्रार्थना दिली व चार तत्व, तीन शब्द, पाच  नियम यांची आपल्या सेवकांना शिकवण दिली. जो सेवक बाबाच्या शिवकांनी प्रमाणे *सत्य, मर्यादा, प्रेमाने, चारणार तो सेवक कधीही दुःखी राहणार नाही. सेवक कार्य करीत असताना त्याच्या हातातून काही चुका होत असतात. त्याच चुकीची माफी आपल्याला मानव धर्मात स्वतःचे दुःख स्वतः दूर करावे असे सेवकांना स्वतत्र बनविले आहे . बाबा नी सर्व सेवकांना समान अधिकार, समान शिकवण व समान नियम दिले आहे. जसे दुःख दूर करण्यासाठी बाबा हनुमानजी फु असे म्हणून पाण्यावर 7, 11, 41, 101, अस्या प्रमाणे पाण्याचा तीर्थ बनवून आपले दुःख दूर करावे व आपल्या जीवनात बाबाच्या आदेशाचे वेळोवेळी पालन करावे.


असे माझे मत आहे.माझ्या लिहिण्यात काही चूक झाली असेल तर मला माफ करावे. 


          🙏धन्यवाद जी🙏


 ☘️सर्वांना माझा नमस्कार जी☘️


     मानवधर्म  एकता परिवार

 मोरेश्वर दादा देशमुख मु. दहेगाव पोस्ट धानला

 ता. मौदा जिल्हा नागपूर

 सेवक क्र. 3159


☘️🙏☘️🙏☘️🙏☘️🙏☘️🙏☘️


 विचार क्रमांक 3:-


             बाबांनी  आम्हाला मानवधर्माची शिकवण एकसारखी  दिली आहे.  एक भगवंत एक भगवंत कृपा  एक विनंती  एक प्रार्थना  एकच नियमांची नियमावली ह्या  सर्व  तत्व शब्द नियम व नियमावली  बाबांनी  आम्हाला  एकतेत बांधुन मर्यादेत राहण्यासाठी  दिले आहे  .बाबांनी  जेव्हा  भगवंत कृपा  प्राप्त  केली  तेव्हा  ते दुःखी  मानवाला  तिर्थच करून  देत होते ."बाबा हनुमानजी "हा मंत्र  बाबांनी  जाप केला.व "बाबा हनुमानजी  फू "हे तिर्थ बनविण्याकरिता मंत्र आम्हाला दिला आहे.🌷🌷🌷🌹🌹🌹


               बाबांनी  आम्हाला  योग  मागितले  नंतर  विनंती प्रार्थनात तिर्थ  करायला सांगितले आहे  .सहसा दररोज  3/7/11फुकाचा  तिर्थ  केला  जातो .बाबा  हनुमानजी  फू या मंत्रात जागृत  परमेश्वरी  कृपा  शब्दावर  शक्तीरूपाने काम करते.एखाद्याचा प्राण तळमळत  असेल विज्ञान  ज्या  ठिकाणी  काम करत नसेल इतकेच नव्हे तर  ऑक्सिजन  शरीर  घेतनसेल तिथे बाबांच्या आदेशानुसार  जे तिर्थ  आपण करतो ते अमृताचा  काम करते .म्हणजेच बाबांनी  आम्हाला  स्वावलंबी  बनविले  आहे .बाबा  सर्व  मेडिकल  डाॅक्टरचे  सर्वात मोठे  अनुभवी डाॅक्टर आहेत हे आजही आपण अनुभवतो.🌹🌹🌷🌷🌷💐


             म्हणून  बाबांनी  जे केल ते सर्व  आपल्याला शिकविले आहे  कर्म  आपले आहे. तिर्थ आमच्या  साठी  अमृत  आहे....................जरी आम्ही  ग्लास किंवा  कोणत्याही  वस्तूत  साध पाणी  घेऊन  बाबा  हनुमानजी  फू मंत्राने फुक मारली तर अमृत  सागर  बाबा जुमदेवजी आम्हाला  दिला  आहे  .परमेश्वरी  शक्ती भक्तीने जवळ  राहते .त्यासाठी  बाबांनी दिलेल्या तत्व शब्द नियम व नियमावली प्रमाणे चालायचे आहे  मी माझ्या जीवनात तत्व शब्द नियम व नियमावली प्रमाणे चालण्याचा प्रयत्न करिन .एवढे बोलून मी माझ्या शब्दाला थांबवितो माझ्या लिहिण्यात काही चुकी होऊ शकतात त्या चुकिची मी भगवंताला व बाबांना व समस्त सेवकांना व ताईंना माफी मागते...🌸🌸🌸🌸🌸🌸💐💐💐💐💐


🌹🙏 सर्वांना माझा नमस्कार जी 🙏🌹


💐🌸 🌹🌷🌷

गुड्डू दादा नेरकर🌹🌹🙏🏻🙏🏻🙏🏻🌹🌹


विचार क्रमांक 4:-


       मानव धर्मात आलेला प्रत्येक व्यक्ती हा "एक भगवान" आपले दुःख दुर करेल आणि आपण व आपले कुटुंब सुखी होईल फक्त या विचाराने बाबांच्या या मार्गात आलेला आहे.


        टि. बी., कँसर, अल्सर, महारोग, एड्स, किडनी, लिव्हर, वाल्व खराब झाला, असे अनगिनत बिमारी ने त्रस्त झालेलेच नव्हे तर मरणासन्न अवस्थेत असलेलेच नाहीतर मृत्यूच्या दारातून परत आलेले लोक सुध्दा या मार्गात येऊन सुखी झाले व सेवक बनले, हे फक्त आणि फक्त @ बाबा हनुमानजी @ या नावाची फूक मारून प्राशन केलेल्या तिर्थाने.एवढेच नव्हे  बाबा हनुमानजी फू" या नावाच्या शब्दाची फूक मारल्यावर कोल्हा, कुत्रा, सर्प, विंचू चा जहर/विष उतरतो. हे सत्य अनुभव या मानव धर्मातील एका भगवंताला मानणार्‍या सेवकांनीच नव्हे तर दुसर्‍यांनी सुध्दा अनुभवले आहे.


           गोंदिया वरून 19 कि. मी. वर दांडेगाव आहे. तेथे वडेगावचे कार्यकर्ता चौधरी गुरूजी यांची मुलगी खुर्शीपारला (तिरोडा) येथील कार्यकर्ता डॉ. रहांगडाले, यांची मुलगी अंबुलेजी (सध्या मार्गात असून गोंदिया शाखा अध्यक्ष आहेत) यांचे येथे दिली आहे, ती आमच्या गावी तुम्ही भेटायला येत नाही म्हणायची म्हणून आम्ही एका कार्यक्रमातून येतांना सेवकाच्या मुलीला भेटण्यासाठी गेलो. तेंव्हा अंबुलेजी दांडेगावचे सरपंच होते. मार्गात आले नव्हते.


           त्यांच्या घरी गावातील काही लोक आपल्या कामानिमित्त आले होते. त्यांनी अंबुलेजींना आमच्या विषयी हे कोण पाहुणे आहेत, हे विचारले. त्याच्या लहान भावाने सांगितले की, हे एका भगवंताला मानणारे मार्गाचे सेवक आहेत, आमची वहिनी सेवकाची मुलगी आहे, म्हणून भेटायला आले आहेत. हे ऐकून एका व्यक्तीने विचारले की एका भगवंताचा म्हणजे कसा? तेंव्हा त्यांनी सांगितले की यांच्या मार्गात एका शब्दाने दुःख दुर होते. हे मी अनुभवले आहे. मला शेतावर एक दिवस मेहदल (मोठा विंचू) चावली त्या ठिकाणी मला खुप अंगार होत होती, त्रास सहन होत नव्हता, तेंव्हा सर्व मजूर गोळा झाले व मला म्हणाले, मेहदल चावलेला तोंडातून फेस टाकतो आणि लवकर उपचार नाही झाला तर वाचत नाही. माझी अवस्था विघडत चालली होती. मी मरतो की काय, आता वाचणार नाही, असे वाटत होते.


           तेंव्हा मला माझी वहिनी सेवकाची मुलगी आहे, आणि यांच्या मार्गात फूंक मारल्याने जहर उतरते, हे माझ्या लक्षात आले, तेंव्हा मी वहिनीला फूंक मारून द्या म्हटले. वहिनीने "बाबा हनुमानजी फू" अशी काही वेळा फूंक मारली, ती जसजसी फूंक मारत होती तसतसा माझा त्रास कमीकमी होत होता आणि आश्चर्य म्हणजे शेवटी पुर्णच दुःख दुर झाले, असे त्यांनी उपस्थित असलेल्यांना आमचा परीचय देतांना सांगितले, तेंव्हा अंबुलेजी मार्गात यायला होते. आता ते मार्गात आहेत. ही घटना अंदाजे 20 वर्षांपूर्वीची आहे.


        मानव धर्माचे बाबांच्या आदेशानुसार एका भगवंताला मानणारेच नाही तर इतर लोकांना "बाबा हनुमानजी फू" या शब्दाच्या तिर्थात असलेली दैवी शक्तीच्या प्रभावाचे गुणाची महत्ता कळून चुकलेली आहे. म्हणून मी आपले विचार सांगतो…

 गंगाजल नी मुक्ती मिळते, म्हणती लोक अनेक,

  परंतु बाबांच्या आदेशाने, "बाबा हनुमानजी" शब्दाच्या तिर्थाने         दुःखमुक्त करतो, परमात्मा एक !

  "बाबा हनुमानजी" हा एक नाम तारी,

   दुःखी मानवाचे सर्व दुःख हारी !


  • आपण मार्गात येण्यापूर्वी कोजागिरी पौर्णिमेला अमृत मिळेल म्हणून मानत होतो. मग अमृत मिळाला का? याचा उत्तर आहे : नाही.
  • मग अमृत कोणी दिला, केंव्हा दिला, कां दिला हे आमच्या लक्षात आहे काय ?
  • जर लक्षात आहे, तर आम्ही जुन्या विचाराचे सणाला कां मानतो, कोणत्या अमृता साठी ?
  • या आमच्या सध्याच्या आचरण व विचारावरून आपण तिर्थाला किती महत्व देतो याचा विचार करण्याची गरज आहे.


        आजही दुःख आल्यावर प्रथम तिर्थ घ्यायची नाही तर प्रथम डाक्टर कडे जायची प्रवृत्ती असल्याचे सेवकाकडून ऐकायला मिळते. आमच्या कडे येवून जेंव्हा सेवक दुःख सांगतो तेंव्हा कळत की तिर्थ घ्यायला विसरलो. पण डाक्टर कडे जायला नाही विसरला.


  प्रथम धाव डाक्टरच्या दवाखान्याकडे,

  दुःख दुर नाही झाले तर तिर्थाकडे !

 सर्व डाक्टरांना डाक्टर बनवणारा स्पेशालिस्ट, त्यांना उपचार करण्याची बुद्धी देणारा विद्वान, सर्वज्ञानी आपल्या जवळच आहे, हे लक्षात कोण ठेवणार, आणि कशाला, काय गरज आहे, नाही का.


  दुःख में सभी तिर्थ पियें,

  सुख में पियें न कोय !

  जब सुख में तिर्थ पियें,

  तब दुःख काहेको होय !!


बाकी आपकी मर्जी.

बस इतनी है अर्जी,

 

जो अच्छा लगे उसे अपना लो,

जो बुरा लगे उसे जाने दो !


मेरी कोई गलती है तो

माफ करना, समझ के अपना !

मेरे कहे हुए गलत शब्दों को

भूल जाना समझकर सपना !!


   भूल-चूक क्षमस्व.


🙏आपका संतोष🌷हमारा विश्वास🙏

🙏बोपचे परिवारका सप्रेम नमस्कार🙏

       सुर्याटोला रोड, गोंदिया से … 💐


विचार क्रमांक 5:-


                  महान त्यागी बाबा जुमदेवजी  ने इस मार्ग मे सेवक को सुबह की विनंती शाम की प्रार्थना दी है  तब सेवक विनंती ,प्रार्थना को समझकर अपने परिवार व सेवक मे सत्य मर्यादा प्रेम का आचरण करता है.और अपने गृहस्थी उच्च स्तर पर लाने का परिपूर्ण प्रयास करता है बाबा ने हमें तत्व शब्द नियम दिये है !


      जिसका हमें परिपूर्ण पालन करके अपने आपको साध्य करने का परिपूर्ण पालन करना चाहिए. ठीक उसी प्रकार इस मार्ग मे तीर्थ को बहुत महत्व है बाबा ने सेवक को दुख आने पर तीर्थ बनाकर अपने दुख को दूर करने की शक्ति सभी सेवक को प्रदान की है !


              अगर सेवक एक चित,एक लक्ष्य,एक भगवान को सामने रखकर संकट के समय ध्येय से एक भगवान को ये तो भगवान उसकी मदद करने के लिए खुद खड़े रहते है  . इस मार्ग मे सभी सेवक को अच्छा अनुभव है .तीर्थ के क्या मायने हैं  भगवान के नाम का तीर्थ बनाकर इस मार्ग मे कई प्रकार की बीमारी दूर हुई है और लौटकर कभी वापस नहीं आई .उसी प्रकार रक्षक से शरीर के कई प्रकार के घाव भर जाते हैं.बाबा ने शांता बाई का शैतान तीर्थ का छिडकाव करके उसके शरीर के शैतान को दूर किया और रक्षक से उसके गाल के घाव को दूर किया. तीर्थ बनाकर पीने से तीर्थ में साक्षात शक्ति विराजमान रहती है जो हमारे दुख को पल भर में दूर करती है. तीर्थ बनाकर पीने से साँप का जहर उत्तर जाता है इतनी शक्ति तीर्थ में है !


        जो बाबा ने हमें तीर्थ के महत्व बताये हैं. इस मार्ग मे जल यह साधारण जल नहीं है जल मानो तो पानी है नहीं तो बहता पानी है लेकिन हम बाबा के तत्व शब्द नियम से जल को तीर्थ व तीर्थ को अमृत बना सकते है  और इस मार्ग में तीर्थ यह अमृत है जो भगवान ने हमें अपने आप की अपने शरीर की रक्षा करने के लिए खुद को तीर्थ बनाकर अमृत करना है  .और अंत में मैं यही कहना चाहता हूँ !     


    "बाबा की है अमृत वाणी, सत्य मर्यादा प्रेम की है निशानी , त्याग बलिदान की है यह कहानी,समझो बाबा की है अमृत वाणी.        

        सेवक ने बाबा की अमृत वाणी को समझकर तत्व शब्द नियम का पालन करके सत्य मर्यादा प्रेम स्थापित करने की जरूरत है और अच्छे आचार विचार रखकर निःस्वार्थ कार्य करना चाहिए तो बाबा हनुमानजी के नाम की फुंक मारकर हम जो तिर्थ बनाते हैं वह इस मार्ग के प्रत्येक सेवक के लिए एक अमृत का काम करता है इस मार्ग के सेवक के लिए तिर्थ एक वरदान है !

    

             इस मार्ग मे तत्व शब्द नियम से चलकर सत्य मर्यादा प्रेम का आचरण करके मार्गदर्शक जी ने दिये हुए कार्य दिये हुए समय पर स्टीक कार्य करके हमारे जीवन में जो भी संकट हैं उसको भगवान के सामने रखकर लोटे में ग्लास में एक साधारण जल लेकर बाबा हनुमानजी यह फूँक मारकर तिर्थ बनाते हैं तो वह तिर्थ अमृत बन जाता है तो सोचो कि इस तिर्थ में कितनी शक्ति है ठीक उसी प्रकार बाबा जुमदेवजी का आदेश मानकर तत्व शब्द नियम से सत्य मर्यादा प्रेम का आचरण करे तो भगवान बाबा हनुमानजी व महान त्यागी बाबा जुमदेवजी हमारे सारे दुःख एक पल में दुर करते हैं ।


         मेरे विचारों में कुछ गलती हुई हो तो भगवान बाबा हनुमानजी व महान त्यागी बाबा जुमदेवजी मुझे क्षमा करे वैसे ही सभी दादा व ताई मुझे माफ करें ऐसी विनंती है !


 परमात्मा एक सेवक

ओमप्रकाश कुथे


विचार क्रमाक-६:-


नमस्कार, 

          आजचा विषय छान आहे. माझे विचार सांगत आहे. आम्ही मार्गात यासाठी आलो की मला डोक्याचा म्हणजेच एक प्रकारचा मानसिक त्रास होता. तो त्रास खूप खूप कमी झाला. परंतु काही दिवसांनी १ वर्षांनी दुसरे दुःख आले. ते दुःख म्हणजे माझे पतीदेव दुसऱ्या गावी कामावर जात असल्यास तिथे एका वाईट बाईच्या मोहात पडले. त्या कारणाने त्यांची वागणूक बदलली माझ्यावर रागवणे,  मुलीवर रागवणे आमच्या चुका काढणे घरी न थांबणे अशी वागणूक होऊ लागली. 


          भगवंतांनी हे सत्य मला काही दिवसा अगोदर स्वप्नात येऊन तात्काळ मला दाखवले. मला खूप बेकार वाईट वाटायचे मला या गोष्टीवर स्वप्नावर विश्वास बसत नव्हता. मी लक्ष दिले नाही आठ दिवसानंतर माझी आत्या त्या गावी राहायची तिलाही गावातून माहित झाले. ते मला एक दिवस सांगायला आंगवनिने ने आली तेव्हा मला विश्वास झाला. असे स्वप्न पडणे आणि पती देवाचे वागने का बदलले. मला आत्याकडून माहीत झाल्याबरोबर माझे पूर्ण भान हरवून गेल्या. मी पीसारल्यावानी होऊ लागली. आणि मी एकदम तिच्या घरी गेली. आणि तिला मारले केस ओढले. आणि बाजारात ही मारले यामुळे माझे पतीदेव आणखी तिच्या मोहात पडले. तिचा मोह खूप वाढला. कार्यकर्ते काकाजिंना ही घटना सांगितली. काकाजिंना मला रागावले. तिला मारायला नाही पाहिजेण. मला सांगायला पाहिजेण. आता मी काही करू शकत नाही. कार्य देने बंद करते. मी माफी मागितली माझ्या चुकीची. 


           काकाजिनी त्यांना विचारले त्यांनी नाकारले असे काहीही नाही माझ्या पत्नीची चुकी आहे. असे सांगितले. ज्या दिवशी त्यांचे संबंध  जुडले तो दिवस ही सांगितला. त्याला त्याच्या मताने वागू दे त्यांना काहीही म्हणू नको. भगवंत पाहिल. तरीही मी कधीकधी खूप वाईट बोलत असते. त्यांना खरं का नाही बोलत म्हणून या कारणाने माझ्या मुलीची तब्येत बिघडते मी क्षमा मागते. तब्येत पुन्हा चांगली होते. एक दिवस तर आम्हाला इतकी गाढ झोप लागली तीही ८ वाजता  कधीही न लागणारी. आणि मधातून उठून ११ वाजता गावाबाहेरच्या कल्लिकडे जाऊन आई आई करून रडू लागली. त्यादिवशी एका शेजारी उठून बसले होते. त्यांनी घरी आणून दिले. तेव्हाही रागावले काकाजी माझे पतीदेव वाईट बाईला विसरण्याचा खूप प्रयत्न करते पण माझ्या चुकीने ते आणखी मोहात पडतात. आणि पुन्हा तसेच वागणूक होते. त्यांचा स्वभाव चांगला आहे. दुसऱ्यांना मदत करायचे घरी हि आम्हाला खाण्यापिण्याला कमी नाही करत फक्त आम्हाला वेळ कधी ही नाही देत. भगवंत चरणी हीच विनंती आहे. की माझ्या पतीसाठी जो मोह आहे. तो थोडा कमी करा. आणि माझ्यापासून त्रास होणार नाही अशी सद्बुद्धी द्या. अशी विनंती करते. माझ्या लिहिण्यात चुका झाल्यास मला माफ करावे. 


नमस्कार जी.....


हिरा ताई रविन्द्र येलेकर

मु.पो.ता.सेलु,जी.वर्धा

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 


[टिप :- वरिल विचार कुणिही काँपी करु नये, त्यापेक्षा जास्तीतजास्त शेअर करावा.]


      भगवतकार्याच्या या गृपला जुडण्याकरिता व आपले परमेश्वरिकृेचे अनुभव सेवकांपर्यत चर्चा बैठकी चा लाभ व प्रश्न मंजुषा मध्ये पोहोचवीण्याकरिता खालील सेवक दादांशी संपर्क साधावा...


गणेश दादा बिडकर :-9766573410

मोहन दादा आस्वले:-9764989883

रोशन दादा काटेकर:-8956656210

•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••


सौजन्य :-

"अॅडमिन,सेवक,सेविका",

मानवधर्म एकता परिवार,

[Wats app group & Facebook page}

युवा आणि जेष्ठ सेवकांचा समुह,

परमपुज्य परमात्मा एक सेवक मंडळ, वर्धमाननगर, नागपुर.

©®


••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••

No comments

Powered by Blogger.