PARMATMA EK- परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळाचे कार्य

  परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळाचे कार्य:- 


PARMATMA EK- परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळाचे कार्य
PARMATMA EK- परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळाचे कार्य



          महानत्यागी बाबा जुमदेवजींचे परमेश्वरी कृपा प्राप्त केल्यानंतर दुःखी, कष्टी व नानाविध व्याधीने पिडीत मानवाला तत्व, शब्द व नियमाचे पालन करुन परमेश्वरी कृपा प्राप्त करुन जिवनात सुख, समाधान मिळविता येते हे सिध्द करुन दाखविले. त्यामुळे बाबांच्या मार्गदर्शनाने चालणाऱ्या मानवाचे दुःख दूर होऊन त्यांना सुख समाधान मिळू लागल्यामुळे त्यांच्याकडे येणाऱ्या सेवकांची संख्या दिवसें-दिवस वाढू लागली. सेवकांची वाढती संख्या विचारांत घेता सेवकांनी एकता निर्माण करुन संघटना निर्माण करावी व त्याव्दारे सेवकांच्या उन्नतीकरिता कार्य करण्यात यावे. जेणेकरुन सेवकांना शारिरीक, मानसिक समाधानासोबत सामाजिक स्थैर्य लाभेल. याकरिता कार्य करता येईल या उद्देशाने ४ डिसेंबर १९६९ ला परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळाची स्थापना करण्यात आली.


           महानत्यागी बाबा जुमदेवजींच्या मार्गदर्शनाने शारिरीक व मानसिक समाधान मिळालेल्या नागपूर शहर व खेडोपाडी राहणाऱ्या सेवकांना परमेश्वरी कृपावंत जागविण्याकरिता बाबांचे मार्गदर्शन सतत लाभत राहावे याकरिता मंडळाच्या वतीने चर्चा बैठक आयोजित करण्याचे कार्य मंडळाव्दारे होऊ लागले. त्याप्रमाणे सेवकांच्या आर्थिक व सामाजिक उन्नतीकरिता सेवकांच्या आर्थिक सहकार्यातुन निरनिराळ्या संस्था स्थापन करुन त्याचा लाभ सेवकांना व समाजातील लोकांना मिळू लागला.


              १९८८ च्या जानेवारी महिन्यात बाबांना साक्षात्कार झाला की, त्यांचे आयुष्य संपत आले असुन आता जास्त काळ ते जगू शकणार नाही. त्यांनी ही गोष्ट सेवकांना सांगितली. त्यामुळे परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळाच्या सभागृहात दिनांक २० जानेवारी १९८८ ला कार्यकर्त्यांची सभा बोलविण्यात आली. त्या सभेत बाबांना झालेल्या साक्षात्काराची माहिती देण्यात आली. सभेत महानत्यागी बाबा जुमदेवजी सुध्दा उपस्थित होते. तेव्हा सर्व सेवकांच्या वतीने श्री मेघराजजी कोहाड यांनी बाबांना विनंती केली की, "बाबा आम्ही अनाडी सेवक असल्यामुळे दैवी शक्तीबद्दल तसेच मानव जागृतीच्या कार्याकरिता बाबांचे आम्ही सेवकांना नियमित मार्गदर्शन मिळण्याकरिता आणखी काही वर्ष सहयोग पाहिजे." तेव्हा बाबांनी मार्गदर्शन केले व सांगितले की, "भगवंत सेवकों की इच्छा पुरी करेंगे और अगले आदेशतक मार्गदर्शन करेंगे।"


'विधीलिखित टळत नसते' असे म्हणतात. त्याप्रमाणे महानत्यागी बाबा जुमदेवजी यांचेवर आलेले संकट व आपल्या मातोश्री. सौ. वाराणसीबाई ठुब्रीकर यांचे दिनांक ३१ जुलै १९९० रोजी झालेल्या निधनापर्यंतचा परिणती या प्रकरणात सविस्तरपणे देण्यात आलेला आहे.


       मातोश्री सौ. वाराणसीबाई यांची इच्छा होती की बाबांनी सेवकांना व मानांना करुन परमेश्वरी कृपा मिळवून देण्याचे व दैवी शक्तीच्या प्रती जागृती निर्माण करण्याथे कार्य सतत करावे. त्यामुळे आपले उर्वरीत आयुष्य बाबांना दिले. आई गेल्यावर वाबांचे चिरंजीव डॉ. मनो यांनी बाबांना विनंती केली की "बाबा आपण इथे एकाकी राहण्यापेक्षा अमेरिकेला चला" परंतु बाबांनी अमेरिकेला जाण्यास नकार दिला. तसेच आईने केलेला त्याग लक्षात घेता सेवकांना मार्गदर्शन करण्याकरिता ते इथेच राहिले. त्याप्रमाणे त्यांनी आईची इच्छा पुर्ण केली. आई गेल्यावर बाबांचा सांभाळ त्यांचे लहान बंधु श्री. मारोतरावजी ठुब्रीकर यांचे कुटुंबाने केले. तसेच मठाधिपती म्हणून बाबांना परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळाने सर्वोतोपरी सहकार्य केले.


           आईचे आयुष्य जरी बाबांना मिळाले असले तरी, महानत्यागी बाबा जुमदेवजी त्यावेळी ७० वर्षाचे होते. तसेच सतत सेवकांना परमेश्वरी प्राप्ती करण्याकरिता तसेच मानव धर्माचा प्रसार प्रचार करण्याकरिता सतत नागपूरात तसेच बाहेरगावी मंडळामार्फत चर्चा बैठक घेऊन सेवकांना जागविण्याचे कार्य बाबा आपल्या मार्गदर्शनाने करीत होते. स्वतःच्या प्रकृतीचा विचार न करता सततच्या परिश्रमामुळे त्यांच्या तब्येतीत फरक पडू लागला. त्यामुळे कार्यक्त्यांना व सेवकांना चिंता वाटु लागली की, बाबांच्या नंतर या मार्गाची धुरा सांभाळण्याकरिता सत्य, शब्द, नियमाने चालुन बाबाप्रमाणे निष्काम कर्मयोगी व समक्ष व्यक्ती असणे आवश्यक आहे. त्यामुळे परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळाच्या दिनांक ८/११/१९९० च्या संचालन मंडळाने सभेत चर्चा होऊन त्याकरिता सर्व कार्यकर्त्याची दिनांक २/१२/१९९० ला बैठक बोलविण्यात आली. त्या बैठकीत महानत्यागी बाबा जुमदेवजी सुध्दा उपस्थित होते. 


            कार्यकर्त्यांच्या बैठकीत चर्चा होऊन बाबांनी स्थापन केलेल्या मानव धर्माचा तसेच परमेश्वरी कृपेचा प्रचार व प्रसार करुन मानवाना अंधश्रद्धा व व्यसनमुक्त करुन सुयोग्य समाज निर्माण करण्याचे कार्य करण्याकरिता एखादा व्यक्ती असणे आवश्यक आहे असे विचार समोर आले. यावर बाबांना आम्हाला मार्गदर्शन करावे अशी कार्यकर्त्यांनी बाबांना विनंती केली. त्यावर मार्गदर्शन करतांना बाबांनी सांगितले की, "हे सेवक बाबाने भगवंत कृपा प्राप्त करने से लेकर आजतक मानव को जगाने का कार्य निष्काम भाव से किया है। मानव यह गृहस्थी होने से पुरी तरह से बाबाकी तरह मोह, माया, अहंकार का त्याग करेगाही यह कहना मुश्कील है। बाबाने परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडल की स्थापना की तबसे मंडल बाबा के मार्गदर्शननुसार इस मानव धर्म का प्रसार व प्रचार और सेवकों के कल्याण के लिए कार्य कर रहा है। मंडल यह व्यक्ती नही एक शक्ती है। आगेभी मंडल यह कार्य करता रहेगा। फिर भी सेवकों की इच्छा बाबाने सुनी। आप सब सेवक २१ दिन के साधे कार्य करो और भगवान से विनंती करो। भगवान को क्या घडाना है वह घडायेंगा।" बाबांच्या आदेशाप्रमाणे दिनांक २१/१२/१९९० पासून २१ दिवसांचे कार्य सर्व सेवकांनी केले ते खालीलप्रमाणे होते.


          "भगवान बावा हनुमानजी आणि महानत्यागी बाबा जुमदेवजी यांना आम्ही विनंती करतो की, महानत्यागी बाबा जुमदेवजी यांच्या सारखे निष्काम कार्य करणारे व्यक्ती मानव धर्माचा निरंतर प्रचार करण्याकरिता बाबांच्या 'हयातीत' उपस्थितीमध्ये तयार करावे. अशी आम्ही भगवान बाबा हनुमानजी व महानत्यागी बाबा जुमदेवजी आपणास विनंती करतो."


        वरीलप्रमाणे कार्य केल्यानंतर सुध्दा बाबांच्या हयातीत म्हणजेच महानत्यागी बाबा जुमदेवजी परमेश्वरांत विलीन होईपर्यंत(३ ऑक्टोंबर १९९६ पर्यंत) बाबाप्रमाणे त्यागी व निष्काम कार्य करणारा व्यक्ती तयार झाला नाही. याचाच अर्थ वर दिल्याप्रमाणे बाबांनी स्थापन केलेल्या मानव धर्माचा तसेच परमेश्वरी कृपेचा प्रचार व प्रसार करण्याचे कार्य बाबांनी परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळाकडे सोपविलेला असून मंडळ ते कार्य करीत आहे.


  • भगवत कार्याची चर्चा बैठक:-

            परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळाची स्थापना केल्यानंतर बाबांनी परमेश्वरी कृपेचा प्रचार व प्रसार करण्याचे दृष्टीने सेवकांना आलेले अनुभव तसेच महानत्यागी बाबा जुमदेवजींचे मार्गदर्शन सेवकांना मिळत राहावे म्हणून बाबांनी नागपूर शहरात विभागवार गट तयार करुन प्रत्येक गटांत चर्चा बैठक घेण्याबाबत आदेश दिलेत तसेच खेडोपाडी सुद्धा चर्चा बैठक घेण्यात यावी असे बाबांनी सुचविले. त्यानुसार चर्चाबैठक होऊ लागली. मंडळाच्या वर्धमान नगर येथील मानव मंदिरांत सुध्दा दर शनिवारी सायंकाळी चर्चा बैठकीचे आयोजन करण्यात येते. 


        याशिवाय बाहेरगांवी सुध्दा जवळपासचे खेडे विभागतील सेवकांच्या सहकार्याने हवन कार्य तसेच परमेश्वरी कृपेचा व मानव धर्माचा प्रसार व प्रचार करण्याकरिता मंडळाचे सहकार्याने सेवक संमेलन व जनरल चर्चबैठक घेण्यात येत असून महानत्यागी बाबा जुमदेवजी असे पर्यंत ते सेवकांबरोबर या कार्यक्रमांत उपस्थित राहून सेवकांना मार्गदर्शन करीत असत. बाबा परमेश्वरांत विलीन झाल्यानंतर सुध्दा मंडळाचे सहकार्याने हवनकार्य, सेवक संमेलन व जनरल चर्चा बैठकीचे आयोजन करण्यात येत असून मंडळाचे पदाधिकारी, मार्गदर्शक ल्या कार्यक्रमाला उपस्थित राहून मानव धर्माचा प्रसार व प्रचार करण्याकरिता मार्गदर्शन करतात. त्यामुळे दुःखी कष्टी, अंधश्रध्देने पिडीत व व्यसनाधीन लोकांना परमेश्वरी कृपेचा लाभ मिळून ते सुखी समाधानी तसेच व्यसनमुक्त होत असून दिवसेंदिवस सेवकांची संख्या वाढत आहे. 


  •  मानवधर्माची शोभायात्रा:-

          भारत हा देश बहुधर्मिय देश असून प्रत्येक धर्माचे लोक आपआपल्या धर्माचा प्रसार करण्याच्या उद्देशाने निरनिराळे कार्यक्रम राबवित असतात. त्यांत रामनवमी खालीलप्रमाणे होते.


           "भगवान बावा हनुमानजी आणि महानत्यागी बाबा जुमदेवजी यांना आम्ही विनंती करतो की, महानत्यागी बाबा जुमदेवजी यांच्या सारखे निष्काम कार्य करणारे व्यक्ती मानव धर्माचा निरंतर प्रचार करण्याकरिता बाबांच्या हयातीत' उपस्थितीमध्ये तयार करावे, अशी आम्ही भगवान बाबा हनुमानजी व महानत्यागी बाबा जुर्देवजी आपणास विनंती करतो." वरीलप्रमाणे कार्य केल्यानंतर सुध्दा बाबांच्या हयातीत म्हणजेच महानत्यागी बाबा जुमदेवजी परमेश्वरांत विलीन होईपर्यंत(३ ऑक्टोंबर १९९६ पर्यंत) बाबाप्रमाणे त्यागी व निष्काम कार्य करणारा व्यक्ती तयार झाला नाही. याचाच अर्थ वर दिल्याप्रमाणे बाबांनी स्थापन केलेल्या मानव धर्माचा तसेच परमेश्वरी कृपेचा प्रचार व प्रसार करण्याचे कार्य बाबांनी परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळाकडे सोपविलेला असून मंडळ ते कार्य करीत आहे.


  • परमपूज्य परमात्मा एक सेवक :-

          परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळाची स्थापना केल्यानंतर बाबांनी परमेश्वरी कृपेचा प्रचार व प्रसार करण्याचे दृष्टीने सेवकांना आलेले अनुभव तसेच महानत्यागी बाबा जुमदेवजींचे मार्गदर्शन सेवकांना मिळत राहावे म्हणून बाबांनी नागपूर शहरात विभागवार गट तयार करुन प्रत्येक गटांत चर्चा बैठक घेण्याबाबत आदेश दिलेत. तसेच खेडोपाडी सुध्दा चर्चा बैठक घेण्यात यावी असे बाबांनी सुचविले. त्यानुसार बैठक होऊ लागली. मंडळाच्या वर्धमान नगर येथील मानव मंदिरांत सुध्दा दर शनिवारी सायंकाळी चर्चा बैठकीचे आयोजन करण्यात येते. याशिवाय बाहेरगांवी सुध्दा जवळपासचे खेडे विभागतील सेवकांच्या सहकार्याने हवन कार्य तसेच परमेश्वरी कृपेचा व मानव धर्माचा प्रसार व प्रचार करण्याकरिता मंडळाचे सहकार्याने सेवक संमेलन व जनरल चविठक घेण्यात येत असून महानत्यागी बाबा जुमदेवजी असे पर्यंत ते सेवकांबरोबर या कार्यक्रमांत उपस्थित राहून सेवकांना मार्गदर्शन करीत असत. 


          बाबा परमेश्वरांत विलीन झाल्यानंतर सुध्दा मंडळाचे सहकार्याने हवनकार्य, सेवक संमेलन व जनरल चर्चा बैठकीचे आयोजन करण्यात येत असून मंडळाचे पदाधिकारी, मार्गदर्शक या कार्यक्रमाला उपस्थित राहून मानव धर्माचा प्रसार व प्रचार करण्याकरिता मार्गदर्शन करतात. त्यामुळे दुःखी कष्टी, अंधश्रध्देने पिडीत व व्यसनाधीन लोकांना परमेश्वरी कृपेचा लाभ मिळून ते सुखी समाधानी तसेच व्यसनमुक्त होत असून दिवसेंदिवस सेवकांची संख्या वाढत आहे.


  •  मानवधर्माची शोभायात्रा -

          भारत हा देश बहुधर्मिय देश असून प्रत्येक धर्माचे लोक आपआपल्या धर्माचा प्रसार करण्याच्या उद्देशाने निरनिराळे कार्यक्रम राबवित असतात. त्यांत रामनवमी शोभायात्रा, झुलेलाल शोभायात्रा, मुस्लीम समाजाची शोभायात्रा वगैरे सर्व धर्माचे लोक आप-आपल्या ध्माचा प्रसार करण्याकरिता शोभायात्रेचे आयोजन करीत असतात.


                 महानत्यागी बाबा जुमदेवजी यांनी परमेश्वरी कृपा प्राप्त करुन बाबांच्या मार्गदर्शनाप्रमाणे चार तत्व, तीन शब्द व पाच नियमांचे पालन करणाऱ्या मानवाला त्यांच्या दुःखातुन, अंधश्रध्देतुन तसेच व्यसनातुन मुक्ती मिळून त्यांची गृहस्थी सुखी व समाधानी झालेली आहे. बाबांचे हे कार्य मानव कल्याणाचे असून त्याव्दारे हजारो लोकांनी त्याचा फायदा घेतलेला आहे. बाबांनी स्थापन केलेल्या या मानव धर्माचा सुध्दा प्रसार व प्रचार करण्याकरिता शोभायात्रा काढण्यात यावी असे कार्यकर्त्यांना वाटू लागले. कार्यकर्त्यांनी आपले विचार बाबांपुढे मांडले. बाबांनी सेवकांचे विचार व सेवकांची इच्छा लक्षात घेऊन शोभायात्रा काढण्यास संमती दिली. 


            त्यानुसार दिनांक २४/२/१९९१ ला प्रथमच मानव धर्माची भव्य शोभायात्रा महानत्यागी बाबा जुमदेवजी यांच्या टिमकी, नागपूर येथील निवासस्थानातुन काढण्यात येऊन ती गोळीबार चौक, गांजाखेत, शहीद चौक, गांधी पुतळा, टेलीफोन एक्सचेंज, सुभाष पुतळा, हरीहर मंदिर मार्गाने वर्धमान नगर येथील मानव मंदिरात आल्यानंतर त्या ठिकाणी चर्चबैठक होऊन महानत्यागी दाबा जुमदेवजींनी सेवकांना मार्गदर्शन केले. या शोभायात्रेत हजारो सेवक स्त्री, पुरुष सम्मिलीत झालेले होते. तसेच बाबांचे मार्गदर्शन व सेवकांना आलेल्या अनुभवावर आधारित असंख्या झांकीचा सुध्दा समावेश होता.


              महानत्यागी बाबा जुमदेवजी परमेश्वरांत विलीन झाल्यानंतर बाबांची जयंती निमित्त ३ एप्रिल ला मानव मंदिर येथे कार्यक्रम आयोजित करण्यात येऊ लागले. श्री. गणपतराव टाकळीकर यांचे अध्यक्षतेखाली दिनांक २२/३/१९९८ ला परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळाच्या संचालकांच्या सभेत महानत्यागी बाबा जुमदेवजी यांच्या जयंतीनिमित्त भव्य शोभायात्रा काढण्याबाबत विचार करण्यात आला व त्यास सर्वानी मंजुरी दिल्यामुळे लगेच कार्यकर्त्यांची सभा बोलविण्यात येऊन त्यांत विचार मांडण्यात आले असता मागे दिनांक २४/२/१९९१ ला काढण्यांत आलेल्या शोभायात्रेप्रमाणेच दरवर्षी ३ एप्रिल ला महानत्यागी बाबा जुमदेवजी यांचे जयंतीनिमित्त शोभायात्रा काढण्यात यावी, यांस सर्वांनी संमती दिली. त्याप्रमाणे दरवर्षी ३ एप्रिल रोजी महानत्यागी बाबा जुमदेवजी यांचे निवासस्थान टिमकी येथून शोभायात्रा काढण्यात येत असून त्यांत लाखो सेवक व असंख्य झांकी त्यात सहभागी होत असून शोभायात्रेचे समापन वर्धमान नगर येथील मानव मंदिर येथे होत असते. तसेच त्यानंतर मानव जागृती, अंधश्रद्धा व व्यसनमुक्तीवर चर्चासत्र आयोजित करण्यात येते.


  •  एका भगवंताचा प्रगट दिन:-

       

             महानत्यागी बाबा जुमदेवजींनी स्वतःच्या कुटुंबात असलेल्या भुतबाधेचा त्रास व त्यामुळे त्यांच्या कुटुंबात वारंवार येणाऱ्या दुःखातुन मुक्त होण्याकरिता बाबांना मिळालेल्या मंत्राव्दारे विधीवत ४२ दिवसांची साधना करुन भगवान बाबा हनुमानजीची कृपा प्राप्त केल्यामुळे बाबांच्या कुटुंबात असलेला भुतबाघेचा त्रास पूर्णतः नष्ट होऊन त्यांच्या कुटुंबात समाधान मिळाले. लोकांना याबाबत जसजशी माहिती होऊ लागली तसतसे दुःखाने व भूतान पिडीत लोक बाबांकडे येऊ लागले. गाबा मंत्राव्दारे कुक मारुन त्यांचे दुःख दूर करु लागले. परंतु भुतबाधेने पिडीत लोकांना तात्पुरताच फायदा मिळत असे. त्यामुळे बाबांनी विचार केला की हनुमानजीची कृपा प्राप्त केल्यानंतरही भुतबाधेवर पुर्णतः मात करु शकत नाही. तेव्हा त्यांनी हनुमानजी समोर प्रश्न ठेवला की, "हे हनुमान जी संसार में ऐसी कौनसी शक्ती है, जो सैतान को एक पल में निकाल सके। भूत किसे कहे और भगवान किसे कहे। इसका स्पष्टीकरण हमे समझा दो।" तेव्हा हनुमान जी ने बाबांना सांगितले की,"यह एकही परमेश्वर है वह चौबीस घंटे चैतन्य है।

उसे प्राप्त करने के लिसे पांच दिन हवन करना पडेगा।" तो दिवस रक्षाबंधनाचा होता.


                   हनुमानजी यांनी केलेल्या मार्गदर्शनानुसार बाबा घरच्या मंडळींना उद्देशुन म्हणाले, "परिवार के लोग सुनो, हम कल से पाच दिन हवन करेंगे। ठरल्याप्रमाणे दुसऱ्या दिवसापासून बाबाने पाच हवनाला सुरुवात केली. तो दिवस श्रावण वद्य प्रतिपदा असून तारीख २० ऑगस्ट १९४८ होती. दररोज एक याप्रमाणे सायंकाळी हवन करु लागले. पाचव्या दिवशी हवन संपताक्षणी बाबा निराकार अवस्थेत आले त्यावेळी बाबांच्या मुखकमलातुन शब्द बाहेर पडले, "घरवाले सुनो, मैं कहा आ गया हूँ। सेवक भगवान बन गया।" काही वेळाने बाबा निराकार अवस्थेतुन बाहेर आले. परंतु ते गुंगीतच होते.


               दुसऱ्या दिवशी म्हणजे सहाव्या दिवशी २५ ऑगस्ट १९४८ रोजी बाबा गुंगीतच असल्यामुळे घरच्या लोकांनी हवन करुन कार्याची समाप्ती केली. हवन समाप्त होताच बाबांचे ब्रम्हांड चढले व ते पुन्हा निराकार अवस्थेत आले. त्यावेळी बाबांच्या मुखकमलातुन उद्गार निघाले की, "मै सबका एक भगवान हूं। सेवक, तु मुझे कहा ढुंढ राहा है। मै चौबीस घंटे तेरे पास हूँ। जो क्षण मैं तुझसे छुट जाऊंगा, तेरा शरीर मृत हो जायेगा।" काही वेळाने पुन्हा उद्गार निघाले की, "हे सेवक मैं भगवान हूँ। तु मानव है। मै जानता हूँ, मानव यह बेइमान है। उनमें से तु एक मानव है। भलेही तुने मुझे प्राप्त किया, मैं भगवान हूँ। मैं मानव पर कदापिही विश्वास नही करता।" तेव्हा बाबांनी परमेश्वराला वचन दिल्यानंतर थोड्या वेळाने पुन्हा बाबांच्या मुखकमलातुन शब्द निघाले की, "दुःखदारी दूर करते हुए उद्धार", "इच्छा अनुसार भोजन" हे दोन वचन परमेश्वरने दाबांना दिले. 


         वरील चार वचन बाबांनी परमेश्वरी कृपा प्राप्त करण्याकरिता तत्व रुपांत स्विकारून या मार्गात येणाऱ्या दुःखी-कष्टी लोकांनी या तत्वाचे पालन केल्यास त्यांचे दुःख नष्ट होऊन त्यांना समाधान मिळेल असे बाबांनी सेवकांना मार्गदर्शन केले. त्याप्रमाणे तत्वाचे पालन करणाऱ्या लाखो सेवकांना सुख समाधानी मिळालेली आहे. ते तत्व दादांना रक्षाबंधन नंतर सहाव्या दिवशी मिळाले असल्यामुळे दरवर्षी तो दिवस एक भगवंताचा प्रगट दिवस म्हणून साजरा करण्यात येतो.


        दुःखी-कष्टी, अंधश्रध्देने ग्रासलेल्या तसेच व्यसनाधीन व्यक्तीच्या कुटुंबातील दुःख दुर करण्याकरिता औषधोपचार, तांत्रिक, मांत्रिकांचे नानाविध प्रयत्न करुनही त्यांचे दुःख नाहिसे न झाल्यामुळे ते या मार्गावर येऊन महानत्यागी याया जुमदेवजी यांचे मार्गदर्शनाने व बाबांनी दिलेल्या तत्व, शब्द व नियमांचे आपल्या गृहस्थीमध्ये पालन केल्यामुळे त्यांच्या कुटुंबात असलेले दुःख नाहीसे होऊन त्यांना सुख समाधाल मिळालेले आहे व ते आपले जीवन समाधानाने जगत आहेत व ते बाबांचे सेवक झालेले आहेत. त्यामुळे दसरा, दिवाळी या सणापेक्षाही हा दिवस त्यांना फार महत्वाचा असल्यामुळे त्या दिवशी सर्व सेवक आपआपल्या घरी हवन करून सण साजरा करतात. तसेच मंडळाच्या वर्धमान नगर येथील मानव मंदिर सभागृहात आदल्या दिवशी भगवंताच्या प्रगट दिनानिमित्य कार्यक्रम घेण्यात येत असून त्यांत परमेश्वरी कृपा, महानत्यागी बाबा जुमदेवजींचे मार्गदर्शन, अंधश्रध्दा निर्मुलन तसेच व्यसनमुक्ती यावर चर्चासत्र आयोजित करण्यात येते. तसेच १०वी, १२ वी व पदवी परिक्षा प्राविण्य श्रेणीत उत्तीर्ण केलेल्या सेवकांच्या मुला-मुलींना पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात येत असुन या कार्यक्रमांत हजारो सेवक स्त्री-पुरुष उपस्थित राहून कार्यक्रमाचा लाभ घेतात.


  •  ३ ऑक्टोबर पुण्यतिथी कार्यक्रम: -

          महानत्यागी बाबा जुमदेवजींनी परमेश्वरी कृपा संपादन करून मानवाला परमेश्वराची ओळख करुन देऊन त्यांची कृपा संपादन करण्याकरिता मानवाने सत्य, मर्यादा, प्रेमाचे आपल्या जीवनांत अंगिकार केल्यास तसेच तत्व, शब्द व नियमाने चालल्यास त्याला कधीही दुःख येणार नाही असा बाबांनी जगाला संदेश दिला असून याचा अनुभव हजारो लोकांना आलेला आहे. मानवाने आपल्या जिवनांत मानवतेचे व्यवहार करणे म्हणजेच मानव धर्मचे पालन करणे होय व त्याकरिता सत्य, मर्यादा व प्रेमाची वागणुक अत्यावश्यक आहे. सध्या कलीयुग सुरु असले तरी मानवाने मानव धर्माचे पालन केल्यास तो सत्ययुग निर्माण करु शकतो. बाबांच्या मार्गदर्शनाप्रमाणे हजारो सेवक मानव धर्माचे पालन करीत असल्यामुळे बाबांनी सत्ययुगाची सुरुवात केलेली आहे. महानत्यागी बाबा जुमदेवजी युगपुरुष असुन ३ ऑक्टोबर १९९६ ला परमेश्वरांत विलीन झाले.


        महानत्यागी बाबा जुमदेवजींनी जगाला एक नविन मार्ग दाखविलेला आहे. अशा महान युगपुरुषाची दरवर्षी ३ ऑक्टोबर ला पुण्यातिथी साजरी करण्यात येत असून मंडळाच्या वर्धमान नगर येथील मानव मंदिरात बाबांची पुण्यतिथि निमित्य मानवधर्मावर चर्चासत्र व मार्गदर्शन आयोजित करण्यात येते. त्याचप्रमाणे रक्तदान शिबीर, नेत्र तपासणी शिबीर सुध्दा घेण्यात येत असते. या पुण्यतिथी कार्यक्रमांत हजारो सेवक स्त्री, पुरुष उपस्थित राहून कार्यक्रमाचा लाभ घेतात.


  • १५ नोव्हेंबर वार्षिक हवन कार्य: -

         

          महानत्यागी याबा जुमदेवींनी त्यांना मिळालेल्या सन्याशाच्या मंत्राव्दारे ४२ दिवसांची साधना करून भगवान बाया हनुमानजीची कृपा प्राप्त केली. बाबांकडे येणाऱ्या दुःखी मानवाला मंत्राव्दारे फुक मारुन त्यांचे दुःख दूर करु लागले. परंतु भूतवाधेने पिढीत लोकांचे दुःख पुर्णपणे दूर होत नव्हते. त्यामुळे बाबांनी हनुमानजीना मार्गदर्शन करण्याची विनंती केली. त्यावर मार्गदर्शन करतांना हनुमानर्जीनी बाबाला सांगितले की "सृष्टी निर्मात्या एका परमेश्वराची कृपा संपादन करावी लागेल. त्याकरिता दररोज सायंकाळी एक याप्रमाणे पाच दिवस हवन करावे."


           हनुमानर्जीनी केलेल्या मार्गदर्शनाप्रमाणे बाबांनी हवनाला सुरुवात केली. पाचव्या दिवशी हवन संपल्याबरोबर बाबा निराकार अवस्थेत आले व देहभान हरवले. तसेच त्यांना विदेह स्थिती प्राप्त झाली होती. बाबांची ही स्थिती पाहून कुटुंबातील मंडळी काळजीत पडली. सहाव्या दिवशी कुटुंबातील लोकांनी हवन करुन कार्याची समाप्ती केली. त्यावेळी बाबाच्या मुखकमलातुन चार वचन निघाले. तेच चार वचन म्हणजे परमेश्वर प्राप्तीचे चार तत्व होय. दुसऱ्या दिवशी मंडळींनी बाबांना विनंती केली की, "हे भगवन् आप सेवक को इस विदेह स्थिती से मुक्त करो. सेवक की गृहस्थी है। बच्चा है।" तेव्हा परमेश्वराने बाबांच्या मुखकमलातुन उत्तर दिले की, "अगर आपका भाई आपको इतना प्यारा था, आपको उससे इतनी हमदर्दी थी तो आपको उसे भगवान की सेवा करने क्यो लगाई? उससे हमदर्दी थी तो आपने उसे रोकना था। अब सेवक भगवान का हो गया, न की किसी का रहा है और भगवान सेवक का हो गया है। मेरा सर सेवक का धड और सेवक का सर मेरा घड ऐसा विलीन हो गया है। इस तरह दोनो की आत्मा एक हो गयी है।" थोड्या वेळाने भगवंताने पुन्हा घरच्या मंडळींना उद्देशुन बाबांच्या मुखकमलातुन शब्द काढले की, "सेवक भगवान बन गया। इसलिसे सेवक एक ही समय थोडासा साधा भोजन करेंगे। और कोई भी औरत, घर की हो या बाहर की, उसकी छांव सेवक पर ना पडे। नही तो सेवक कही का नही रहेगा। जिंदा नहीं रहेगा अशाप्रकारे भगवंताने सेवकाला(बाबांना) दैवी शक्तीची जागृती

दिली.


              बाबांची ही विदेहस्थिती पाहून काळजीत असलेल्या कुटुंबातील लोकांना एके दिवशी बाबांनी मार्गदर्शन केले की, "घरवाले सुनो, आप सब लोग तीन महिनेतक भगवान से विनंती करो की, हमारे भाई की यह अवस्था समाप्त कर, उसे गृहस्थी में रखो। भगवान को दया आयेगी तो बाबा गृहस्थी में रहेंगे।" बाबांनी केलेल्या मार्गदर्शनानुसार कुटुंबातील लोकांनी दररोज सकाळी सुर्योदयापुर्वी विनंती करण्याचे कार्य सुरु केले. जवळ-जवळ तीन महिने बाबा विदेह स्थितीत होते. बाबांची विदेहस्थिती संपून ते पुर्णतः शुध्दीवर आले तो दिवस म्हणजे १५ नोव्हेंबर १९४८, सन्यासाच्या मंत्राव्दारे परमेश्वरी कार्य करणे म्हणजे सन्याशी होऊनच परमेश्वरी फुक मारुन इतरांचे दुःख दूर करु शकतो. 


          गृहस्थीमध्ये राहणारा व्यक्ती ती कृपा प्राप्त करु शकत नाही. परंतु महानत्यागी बाबा जुमदेवजींनी सन्यासाच्या मंत्राव्दारे प्राप्त केलेली परमेश्वर कृपा आपल्या त्यागाने व निष्काम कर्मयोगी व्दारे गृहस्थाश्रमात असलेल्या दुःखी-कष्टी लोकांच्या कल्याणाकरिता उपयोगात आणून त्यांना समाधान मिळवून दिलेले आहे. जर बाबा विदेह स्थितीतून बाहेर आले नसते तर गृहस्थीमध्ये मानवाला या कृपेचा लाभ घेता आला नसता. त्यामुळे बाबांची विदेह स्थिती संपुन शुध्दीवर आले त्यामुळे तो दिवस सुध्दा सेवकांच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा आहे. त्याची आठवण म्हणून दरवर्षी १५ नोव्हेंबरला मंडळाच्या मानव मंदिर सभागृहात वार्षिक हृदन कार्य करण्यात येत असतो. त्यांत सहभागी होणारे सेवक आप-आपले जेवणाचे डबे आणत असून हवन कार्य झाल्यानंतर, भगवत कार्याची चर्चाबैठक होऊन सर्व सेवक सहभोजनाचा आनंद उपभोगतात. त्यानंतर सेवकांच्या सांस्कृतीक कार्यक्रम ठेवण्यात येतो. या वार्षिक हवन कार्यातसुध्दा लाखो सेवक स्त्री-पुरुष आप-आपल्या डब्यासह उपस्थित राहून या परमेश्वर कार्याचा लाभ घेतात.

No comments

Powered by Blogger.