PARMATMA EK- परमात्मा एक सेवक मानवधर्म आश्रम,मौदा, पावडदौना


PARMATMA EK- परमात्मा एक सेवक मानवधर्म आश्रम,  मौदा, पावडदौना :-


PARMATMA EK- परमात्मा एक सेवक मानवधर्म आश्रम, पावडदौना
PARMATMA EK- परमात्मा एक सेवक मानवधर्म आश्रम, पावडदौना 


Check Location :- परमात्मा एक सेवक मानवधर्म आश्रम, पावडदौना

 Name :- Parmatma Ek Sevak Manavdharm Aashram, Mouda

परमात्मा एक सेवक मानवधर्म आश्रम, मौदा

Category :- धार्मिक स्थळ 

Location :- MH SH 253, Mauda, Maharashtra 441104

परमात्मा एक सेवक मानवधर्म आश्रम, पावडदौना


      भारतात अनेक धर्म, पंथ आहेत तसेच अनेक साधू संत आहेत. ते ४ वेद,६ शास्त्र, पुराण, रामायण व महाभारत या ग्रंथाच्या आधारावर प्रवचन देऊन मानवाला परमेश्वराबद्दल जागविण्याचे कार्य करतात. अशा प्रवचनाला सर्व स्तरावरील लोकांचा सहभाग असतो. त्याला मोठमोठे धनाढ्य लोक मदत करीत असतात. अशापैकी काही साधू संतांचे भारतात निरनिराळ्या ठिकाणी आश्रम आहेत.


           महानत्यागी बाबा जुमदेवजींनी सृष्टी निर्मात्या एका परमेश्वराची कृपा प्राप्त केल्यानंतर चार तत्व, तीन शब्द व पाच नियम याव्दारे गरीब, दुःखी व नानाविध व्याधीने पिडीत लोकांना मार्गदर्शन करुन मानव स्वतःच मोह, माया, अहंकाराचा त्याग करुन जिवनात तत्व, शब्द व नियमाचे पालन केल्याने परमेश्वरी कृपा प्राप्त करता येते. तसेच त्यांना असलेल्या दुःखातुन व नानाविध व्याधीतुन मुक्ती मिळून ते आपले जिवन स्वतःच्या कर्तव्याने सुखी व समाधानाने जगू शकतात. त्यांना कोणत्याही आशिर्वादाची आवश्यकता नाही. हे बाबांनी सिध्द करुन दाखविलेले आहे. 


            बाबांनी केलेल्या मार्गदर्शनाचा लाखो लोकांनी अंगिकार केल्यामुळे त्यांचे जीवन सुखमय झालेले असून त्यांना त्याचा अनुभव आलेला आहे. बाबांचे मार्गदर्शनाप्रमाणे चालणारे सेवक परमेश्वरी कृपेने स्वतः आपले दुःख दूर करतोच व इतरांना सुध्दा समाधान देण्याचे कार्य करु शकतो, हे बाबाने अनुभवाने सिध्द करुन दाखविलेले आहे. बाबांनी प्राप्त केलेल्या परमेश्वरी कृपेचा लाभ लोकांना मिळावा म्हणून सतत मार्गदर्शन करीत आलेले आहेत. परंतु त्यांनी कधीही येणाऱ्या लोकांकडून कोणतीही अपेक्षा ठेवली नाही आणि निष्काम भावनेने मार्गदर्शन केलेले असून कधीही गुरुपुजा घेतली नाही किंवा कोणासही पाया सुध्दा पडु दिले नाही. अशा या महान व्यक्तीने स्थापन केलेल्या मानव धर्माचा आश्रम असावा तसेच त्या आश्रमांत येणाऱ्या मानवाला परमेश्वराप्रती जागृती व्हावी असे परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळाच्या पदाधिकारी, मार्गदर्शक व सेवकांना वाटू लागले. हे विचार मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी महानत्यागी बाबा जुमदेवजी यांचे समोर मांडले. बाबांनी त्यांना त्याबाबत मंजुरी दिली. त्यानुसार मंडळाचे पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांनी आश्रमाकरिता जागा पाहावयास सुरुवात केली.



            लाखनी येथील सेवक श्री. रमेशजी धनजोडे यांची नागपूर-भंडारा हायवे जवळ मौदा तालुक्यातील पावडदौना येथे १२.५ एकर(साडेबारा एकर) जागा असून त्यांनी शेती विक्रीला काढली असल्याचे कळल्यामुळे मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांचेशी संपर्क साधला व ही शेती आश्रमाकरिता योग्य असल्याबाबत कार्यकर्त्यांच्या सभेत सांगण्यात आले. महानत्यागी बाबा जुमदेवजींना परमेश्वरी कृपा प्राप्त करण्याचा मंत्र मौदा येथील व्यक्तीकडून मिळालेला होता. तसेच ही जागा हायवे पासून जवळच असल्यामुळे आश्रमाकरिता ही जागा खरेदी करण्यात यावी. यास सर्वांनी मंजुरी दिल्यामुळे विश्वस्त मंडळाचे दिनांक १४/९/१९९७ च्या सभेत १२.५ (साडेबारा) एकर शेती खरेदी करण्याचा करारनामा करण्यास एकमताने मंजुरी देण्यात आली. त्यानुसार परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ, नागपूर च्या नावाने विक्रीपत्र करण्यात आले. ह्या जागेदर आश्रमाचे बांधकाम सुरु करण्याकरिता महानत्यागी बाबा जुमदेवजी यांचे चिरंजीव डॉ. मनो ठुब्रीकर यांचे हस्ते दिनांक २१ जुन १९९८ रोजी भुमीपुजन करण्यात आले व आश्रमाच्या बांधकामाला सुरुवात करण्यात आली.


           आश्रमस्थळी प्रार्थनास्थळ, बाबांची कुटी, निराधार आश्रमाचे बांधकाम तसेच सौ. वाराणसीबाई ठुब्रीकर उद्यानाचे काम पूर्ण झाल्यानंतर त्या ठिकाणी भव्य सेवक संमेलन घेण्यात यावे असे ठरविण्यात आले. त्यानुसार दिनांक २६ जानेवारी २००० पासून दरवर्षी प्रजासत्ताकदिनी आश्रमस्थळी हवनकार्य, झेंडावंदन व भव्य सेवक संमेलन घेण्यात येत असून या हवनकार्याला लाखो सेवक आप-आपले डबे घेऊन येतात व कार्यक्रमानंतर वनभोजनाचा आस्वाद घेतात.



       दिवसेंदिवस सेवकांची वाढती संख्या बघता आश्रमाचे विस्तारीकरण करण्याचे दृष्टिकोनातुन जास्तीची जागा खरेदी करण्यांत येऊन सध्या आश्रमाची ३५ एकर जागा आहे. महानत्यागी बाबा जुमदेवजींच्या मार्गदर्शनानुसार आश्रमांत अंधश्रद्धा निर्मूलन, व्यसनमुक्ती अभियान तसेच मानव कल्याणाचे कार्यक्रम आयोजित करण्यात येत असते. महानत्यागी बाबा जुमदेवजी यांनी स्थापन केलेल्या मानव धर्माचे हे आश्रम असून लाखो सेवक व भाविक या ठिकाणी येत असून या आश्रमाला तिर्थक्षेत्राचे स्वरुप प्राप्त झोलेले आहे. त्यामुळे महाराष्ट्र शासनाने त्यांचे ग्रामविकास व जलसंधारण विभाग मंत्रालय, मुंबई यांचे दिनांक १७ डिसेंबर २००९ चे पत्र क्रमांक तिर्थवि २००९/प्र.क्र.५३/योजना ७ नुसार मानवधर्म आश्रम, पावडदौना यांस राज्यस्तरीय तिर्थक्षेत्र "व" वर्गस्थळ म्हणून घोषित केले आहे. यामुळे या आश्रमाला विदर्भातील एक प्रमुख तिर्थक्षेत्राचे स्थान प्राप्त झालेले आहे.


या आश्रमाच्या दक्षिण-पूर्व भागात भव्य प्रार्थना स्थळ उभारण्याचे कार्य सेवकांकडून मिळत असलेल्या आश्रम निधीतून करण्यात येत असून त्यांस सेवकांकडून मोठ्या प्रमाणांत सहकार्य मिळत आहे. तसेच आश्रमाचे सौंदर्यीकरणाकरिता महाराष्ट्र शासनाकडून सहायता मिळणार असून त्याकरिता शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात आलेला आहे. सेवकांच्या सहकार्याने तसेच शासनाचे मदतीने मानवधर्म आश्रम एक प्रेक्षणिय तिर्थक्षेत्र म्हणून लवकरच तयार होत आहे.


परमात्मा एक सेवक मानवधर्म आश्रम, पावडदौना व्हिडिओ  :- 













No comments

Powered by Blogger.