PARMATMA EK- मोंगरकशा तलाव


PARMATMA EK-  मोंगरकशा तलाव


PARMATMA EK-  मोंगरकशा तलाव
PARMATMA EK-  मोंगरकशा तलाव

PARMATMA EK-  मोंगरकशा तलाव


          सत्ययुगातील गोष्टी आपण इतिहासात वाचतो. रामायणात असा उल्लेख आहे की, जेव्हा श्रीराम चौदा वर्षे वनवासाला गेले होते, तेव्हा भरताने श्रीरामाच्या पादुका राजसिंहासनावर ठेवून त्यांच्या नावाने राज्यकारभार सुरळीत चालविला होता. हेतु हा की, श्रीराम हा सत्य आचरण करणारा मर्यादा पुरुषोत्तम होता. तीच लक्षणे त्यांच्या पादुकांना होती. त्यामुळेच राज्यकारभार सुरळीत चालला. परंतु या कलियुगात सुध्दा पादुकांना तेवढेच महत्व आहे. महानत्यागी बाबा जुमदेवजींचे रुपात. बाबा जुमदेवजी हे मोंगरकशा तलाव येथे गेले असतानाची ही घटना आहे. एक जोडनाव जी पाण्याने संपूर्ण भरुन सुध्दा तलावात न डुबता तरंगत होती आणि त्यात असलेला सेवक जीवंत राहिला. हा एक परमेश्वराचा साक्षात्कार आहे.


PARMATMA EK-  मोंगरकशा तलाव


१९७८ सालातील एप्रिल महिन्याची गोष्ट. महानत्यागी बाबा जुमदेवजींनी परमेश्वराबद्दल मानवाला जागविण्याकरिता नेहमीप्रमाणे सात सेवक घेऊन रामटेक तालुक्यातील काही गावांत दौरा काढला. १/४/१९७८ ला महानत्यागी बाबा जुमदेवर्जी नागपूरच्या आपल्या सेवकांसोबत नागपूर रामटेकवरुन भंडारबोडी येथील परमात्मा एक सेवक दुग्ध उत्पादक सहकारी संस्थेत पोहचले. तेथे बाबांचे भगवत्कार्यावर मार्गदर्शन झाले.
दुसऱ्या दिवशी दोन एप्रिलला बाबांनी सेवकांना, पाच बैलगाड्या बरोबर घेऊन कांद्री येथे दौरा केला. तेथे भगवत्.कार्याची चर्चा आणि बाबांचे मार्गदर्शन होऊन मुक्काम केला. तीन एप्रिलला पंचाळा येथे दौरा होऊन चार एप्रिलला मंगरली या गावात दौरा केला. या गावाच्या देण्यात नागपूरसह लोहारा, कांद्री, शिवनी, भंडारबोडी, सालईमेटा, पंचाळा, मांद्री या गावातील बरेच सेवक होते. मंगरली हे गाव घनदाट जंगलाच्या मध्यभागी वसलेले १५-२० घरांचे छोटेसे गाव आहे. या गावात या मार्गात आलेले दोन सेवक राहत होते. त्यांपैकी एक सेवक बाहरगावी लग्नाला गेला होता म्हणून बाबांचा मुक्काम दुसऱ्या सेवकाकडे झाला. ज्या सेवकाकडे बाबा थांबले होते त्या ठिकाणी त्या सेवकाचा मामा पण थांबला होता. तो म्हातारा होता. त्याला पंधरा दिवसापासून सारखा ताप येत होता. या गावात भगवत्कार्याची चर्चाठक होऊन बाबांनी मानव जागृतीवर सेवकांना मार्गदर्शन केले.


चर्चबैठकीच्या अगोदर तेथे या दौऱ्यात ज्या बायामंडळी आल्या होत्या त्यांनी संपूर्ण स्वयंपाक केला होता. चर्चाबैठक संपल्यावर भोजनाची तयारी झाली. सर्व सेवक आणि बाबा भोजनास बसले. सोबत आलेल्या बायांनी पंगती वाढल्यात. तो म्हातारा बाबांकडे आला आणि त्याने त्यांना नमस्कार केला. त्या पंगतीतच तो बाबांच्या आदेशानुसार जेवायला बसला. जेवण झाल्यावर तो बाबांजवळ पुन्हा आला आणि बाबांना नम्रपणे म्हणाला की बाबा आपण धन्य आहात. मला पंधरा दिवसापासुन खूप ताप होता. त्यामुळे मी जेवलो नव्हतो. पण आपल्या आगमनाने आणि मार्गदर्शनाने माझा ताप नाहीसा झाला आणि आज मी पोटभर जेवलो. हा किती मोठा चमत्कार आहे की बाबांच्या आगमनाने आणि मादर्शनाने सेवकांनाचे नव्हे तर इतरांना सुध्दा परमेश्वरी कृपेचा लाभ मिळतो आणि त्यांचे दुःख नाहीसे होते. जो सेवक बाहेरगावी लग्नाला गेला होता त्याचे नाव होते शेरकी. तो रात्री लग्नावरुन परत आला. त्या रात्रीला मंगरली या गावातच मुक्काम झाला. 

दुसऱ्या दिवशी पाच एप्रिलला शेरकी नावाच्या सेवकाने बाबा जुरदेवजींना विनंती केली की, बाबा येथून दहा मैलांवर मोंगरकशा नावाचा एक ऐतिहासिक तलाव आहे. त्याच्या चारही बाजूंनी घनदाट जंगल आहे. फार सुंदर दृश्य आहे. आपण तेथे सर्वजण वनभोजनास चलावे. त्यावर बाबांनी संमती दिली. साधारणतः माणसे व बाया मिळून साठ सेवक हजर होते. सर्वांनी चहापाणी, नास्ता घेतला आणि सर्वजण वनभोजनास जाण्याची तयारी करु लागले. सामान घेऊन जाण्याकरिता बैलबंडीची आवश्यकता होती. तेव्हा सेवकाचा म्हातारा मामा म्हणाला, एक बंडी आहे. त्याचे बैल म्हातारे आहेत. त्यांतील एक बैल असा आहे की, तो जुंपल्यावर खाली बसला तर उठतच नाही. त्याच्या अंगावरुन ट्रक गेला तरी तो उठत नाही. हे शब्द बाबांनी ऐकले. तेव्हा बाबा म्हणाले, बंडीला त्या बैलालाच जंपा.काय होईल ते परमेश्वर करील आणि लवकर वनभोजनास चला.

सर्व सेवक तयार झाले.सामानाकरिता एक बैलबंडी आणि सेवकांकरिता खाचर तयार केले. ज्या बंडीत जास्त साहित्य होत. तेथे पाच-सहा सेवक बसले होते आणि त्याच बंडीला तो बैल जुंपला होता. ती बंडी नागपूरचा एक सेवक श्री. जगन्नाथजी सोनकुसरे चालवत होता. तो म्हातारा पण बाबांबरोबर वनभोजनास आला. जाताना तो समोरच्या खाचरामध्ये बसला होता आणि बंडी मागे होती. त्याला सारखी भिती वाटत होती की, बैल चालता चालता खाली बसतो काय? म्हणून तो सारखा मागे वळून पाहत होता. परंतु त्याला तो बैल चालताना दिसत होता. किंबहुना ता बैल त्याच्या जोडीच्या बैलाचे मानाने धावत होता. संपुर्ण प्रवासात तो बैल एकदाही खाली बसला नाही. त्यामुळे त्या बसक्या बैलाचे त्या म्हाताऱ्याला आश्चर्यच वाटत होते. बाबा आणि सर्व सेवक मोंगरकशा तलावापाशी पोहचले. हा तलाव भंडारा जिल्ह्यातील आहे. चांगलीशी जागा पाहून झाडाच्या सावलीत सर्व सामान उतरविले. तेथे स्वयंपाकाकरिता काळ्या दगडांची जमवाजमव केली. चूल तयार केली. दौऱ्यावर आलेल्या काही बाया मंडळी तलावावरुन आंघोळ करुन आल्यानंतर स्वयंपाकाची तयारी करु लागल्या. बायांना बाबांनी सांगितले की तुम्ही या बाजूला आंघोळ करुन या ती पुर्व दिशा होती आणि पुरुष मंडळी डोंगा दिसतो तेथे म्हणजे त्या दिशेच्या विरुध्द दिशेला पश्चिमेला आंधोळ करायला जातील. मुक्काम दक्षिण दिशेला होता. स्वयंपाकाला सुरुवात झाल्यावर बाबा सर्व सेवकांना (पुरुष) म्हणाले की, चारपाच सेवक येथे थांबा आणि बाकीचे सर्व आंघोळ करायला चला. त्याप्रमाणे सर्व सेवक बाबांसोबत डोंगा असलेल्या बाजूला, पश्चिमेला आंघोळ करायला निघाले,

तेथे पोहचल्यावर काही सेवकांना पोहणे माहीत असल्यामुळे त्यांनी पोहण्यासाठी बाबांची परवानगी मिळण्यासाठी त्यांना विनंती केली तेव्हा तेथे वनखात्याचा चौकीदार होता. त्याने त्यांना पोहायला जाऊ नये यासाठी विनंती केली. कारण तलावात सुरुवातीलाच दोन हत्ती, पुढे तीन हत्ती आणि मध्यभागी चार हत्ती पाणी आहे. संपूर्ण तलावात खूप जाळे आहे. त्यामुळे येथे कोणीही कोळी मासोळी पकडायला आत जात नाही, कारण जाळ्यात पाय अडकले तरी तो वर येत नाही आणि बुडून त्याचा अंत होतो, असे तो म्हणाला. त्यावर बाबांनी काठाजवळ पोहायला परवानगी दिली. त्यानंतर सेवक लोक पोहू लागले.

बाजूलाच एक जोडनाव होती. तेव्हा एका सेवकाने ती जोडनाव पाण्यात नेण्याकरिता विनंती केली. तेव्हा बाबा म्हणाले, जर नाव चालवता येत असेल तरच घेऊन जा. त्याप्रमाणे ती नाव बाबांच्या परवानगीने तिची दोरी सोडून आत नेण्यात आली. त्यांत पाच-सहा सेवक होते. त्यावेळेस बाबा किनाऱ्यावर बसूनच आंघोळ करणार होते. म्हणून ते सेवकांना म्हणाले की, मी नावेत येत नाही. नाव थोडी दूर गेल्यावर ज्या सेवकांना पोहता येत होते त्यांनी पटापट नावेतुन पाण्यात उड्या मारल्या. त्यानंतर तेथे श्री. मोतीरामजी हरडे(दिवाणजी) नावाचे सेवक उरले होते. कारण त्यांना पोहता येत नव्हते. दिवाणजीला वाटले की, आपण आता नाव चालवू ते नावेच्या डाव्या भागाला उभे होते. म्हणून त्यांनी वल्हे उचलले आणि त्यांच्या उजव्या भागाला वल्हे पाण्यात टाकले. वल्हे पाण्यात घेतल्यामुळे आणि त्याला खालच्या बाजूला आधार न मिळाल्यामुळे दिवाणजी उजव्या नावेत पडले. हे दृश्य बाबा आंघोळ करता करता पाहत होते. तेव्हा बाबा म्हणाले, दिवाणजी तुम्हाला नाव चालवता येत नाही तर नावेत कशाला गेलात. बाबांना वाटले हे पाण्यात बुडतील म्हणून त्यांनी गडीरामजी डोनारकर या सेवकाला विचारले की, तुला पोहता येते काय? त्याने होकार दिल्याबरोबर बाबांनी त्याला आदेश दिला की, तुम्ही पोहत जा आणि त्या नावेची दोरी ओढून किनाऱ्यावर आणा आणि बांधून ठेवा, त्याप्रमाणे त्यांनी ती नाव आणून किनाऱ्यावर बांधून ठेवली. दादांची आंघोळ आटोपल्यावर बाबा सर्व सेवकांना म्हणाले की, तुम्ही सर्वजण लवकर आंघोळ करुन भोजनास या तोपर्यंत मी मुक्कामाच्या ठिकाणी जातो आहे. त्याप्रमाणे बाबा जायला निघाले. त्यावेळेस ते पायात पादुका घालावयास विसरले होते. त्या तलावाच्या काठावर राहिल्या होत्या. बाबा तेथून गेल्यामुळे काही सेवकांनी बांधून ठेवलेल्या नावेची दोरी सोडली, काही सेवक नावेत बसून कपडे धुऊ लागले. लोहारा या गावचा सेवक श्री. शामरावजी कार याने त्या नावेलाजोराने लाथ मारली. त्यामुळे ती नाव खोल पाण्यात गेली आणि इकडे कार चा पाय चिरला गेला. श्री. श्रीराम डोनारकर भंडारबोडीवाले हे पुन्हा-पुन्हा पोहत त्या नावेपर्यंत गेले आणि नावेला पकडून ते नावेत.

चढतांना ती नाव एका बाजुला वाकली. त्याबरोबर नावेत असणारे लोक पाण्यात भडाभड पडले. नाव जेव्हा सरळ झाली तेव्हा त्या जोडानावेत संपूर्ण पाणी भरले होते. काठावर असलेले १५-२० सेवक जोराने ओरडू लागले की नाव पाण्यात बुडाली हा आवाज स्वयंपाक करणाऱ्या बायांपर्यंत पोहचला. तेथे धर्मापुरी या गावची सौ. चंद्रभागाबाई क्षिरसागर ही सेविका होती. ती जोराने म्हणाली, बाबा असतांना नाव बुडू शकत नाही. त्या बाईला बाबांच्या कृपेबद्दल किती आत्मविश्वास होता हे दिसून येते. बाबा तेव्हा तीनचारशे पावले चालत आले होते. त्यांच्याही कानावर ओरडण्याचा आवाज आला. त्याचक्षणी त्यांच्या पायाला खडे रुतु लागले. तेव्हा बाबांच्या लक्षात आले की, आपण पायात पादुका घातल्या नाहीत, आणि आपण त्या तलावाच्या काठावरच विसरलो आहोत. बाबांनी मनात विचार केला की भगवंता, काय केले या सेवकांनी? बाबांच्या शब्दांवर अंमल न केल्यामुळे या सेवकांवर हा प्रसंग ओढवला होता. परंतु बाबांच्या ऐवजी त्यांच्या पादुका तेथे असल्यामुळे त्यावर मात झाली होती.

बाबा पादुका घालण्याकरिता परत तलावाच्या काठावर आले आणि तलावावरील दृश्य त्यांनी पाहिले. तेव्हा नागपूरचे सेवक श्री. लक्ष्मणराव ऊराडे हे एकटेच त्या जोडनावेत दोन भागात पाय देऊन उभे आहेत. संपूर्ण नाव पाण्याने भरलेली आहे. तरी ती पाण्यात तरंगत आहे असे दिसले. बाबांच्या बाजूला काही सेवक उभे होते. त्यांना बाबा म्हणाले, हे तुम्ही काय केले? तुम्हा सेवकांना सांगूनही तुम्ही बाबांचे ऐकत नाही आणि असे प्रसंग तुम्ही बाबांना दाखवता. तेव्हा त्या सेवकांनी बाबांना संपूर्ण हकीकत सांगितली. त्यानंतर बाबांनी संपूर्ण चौकशी केली. किती सेवक नावेत होते? किती सेवक पोहून बाहेर निघाले? आणि किती आत बुडाले? चौकशी अंती त्यांना कळले की सर्वजण बाहेर निघाले, पण गोपीचंद तुपट या सेवकाला पोहता येत नव्हते. म्हणून तो आतच आहे. त्याला काढण्याकरिता संपत शेरकी पाण्यात गेला. संपत शेरकीने गोपीचंदला काठावर आणले. बाबांच्या बाजूला मांद्री या गावचा कचरु नावाचा सेवक उभा होता. त्याला बाबांनी विचारले, "तुला पोहता येते काय?" त्याने होय म्हटल्याबरोबर त्याला बाबांनी आदेश दिला की, "पाण्याने भरलेल्या नावेची दोरी धरुन काठावर आण." त्याप्रमाणे बाबांच्या आदेशाचे पालन करुन त्याने त्या नावेला पोहत जाऊन काठावर आणले. त्याबरोबर श्री. उराडे हेही काठावर आले. सर्वजण बाहेर, निघाल्यावर बाबांनी त्यांना विचारले की, हे कसे काय घडले? त्यावर त्यांनी खालील माहिती सविस्तरपणे सांगितली.



प्रथम उराडे साहेब म्हणाले, नावेने कलाटणी घेतल्याबरोबर मी नावेला घट्ट धरुन ठेवले. नावेत संपूर्ण पाणी भरल्यावर ती सरळ झाली आणि मी उभा झालो. विचार केला की, मला पोहता येत नाही म्हणून उड़ी मारु शकत नाही. नावेत संपूर्ण पाणी भरल्यामुळे ती नाव बुडणार म्हणजे दोन्ही क्रियांत मी मरणारच आहे. जीवंत राहु शकत नाही. तेव्हा मी भगवंताला प्रार्थना केली आणि म्हटले, "मरे या जिये भगवत् नामपर l बाबा हनुमानजी आप मुझे मारो,या तारो मैं आपके शरण में हूँ। अशी याचना करीत होतो.

"देव तारी त्याला कोण मारी'' या म्हणीप्रमाणे खरोखरच भगवंताने श्री. उराडे यांना जीवदान दिले. नाव संपूर्ण पाण्याने भरुन सुध्दा बुडाली नाही. ती पाण्यात तरंगत राहिली. म्हणजेच भगवंताने त्या नावेला खालून टेका दिला होता हे सिध्द होते आणि हा किती मोठा साक्षात्कार आहे की नावेत पाणी भरुन सुध्दा ती बुडू नये. धन्य आहे तु भगवंता! नाव काठावर आणली असता बादलीने त्या नावेतुन पाणी काढले आणि दोरीने ती काठावर बांधून ठेवली.

दुसऱ्या घटनेत श्री. संपत शेरकी सांगतात की, गोपीचंद ज्या भागातील पाण्यात पडत होता त्याच भागात तो पण पडला आणि त्याला वर आणण्याचे प्रयत्न केले. परंतु गोपीचंदने संपतला पाण्यातच एकदम मिठी मारली. त्यामुळे त्याच्या पोहण्यात अडथळा निर्माण झाला आणि त्याला हात फेकणे अशक्य झाले. तेव्हा त्याच्या मनात आले की, मी आता बुडणार आणि हाही बुडणार म्हणून संपतने भगवंताला प्रार्थना केली, भगवान बाबा हनुमानजी आपण मला या प्रसंगातन वाचवा. मी आता मरतो आहे. तेव्हा परमेश्वराने त्याच्यावरही कृपा केली. त्याने भगवंताला विनंती केल्याबरोबर गोपीचंद हात सुटला. लगेचच त्याने आपले दोन्ही हात पाण्यात मारले व तो वर आला. हात पाण्यावर मारल्याबरोबर संपतच्या हातात गोपीचंदचे धोतर आले. तो धोतर धरुन पोहत पोहत काठावर आला आणि त्याने गोपीचंद आपल्याबरोबर ओढत काठावर आणले. अशाप्रकारे सर्वजण तलावाच्या बाहेर जीवंत सुखरुप निघाले. धन्य तो परमेश्वर! त्या ठिकाणी बाबांच्या पादुकांच्या रुपात परमेश्वर उभा होता आणि त्याने या सर्व सेवकांची त्या वाईट प्रसंगातून मुक्तता केली. त्यानंतर सर्वांनी भगवान बाबा हनुमानजी की जय! समर्थ बाबा जुमदेवजी की जय! परमात्मा एक! सत्य, मर्यादा, प्रेम कायम करनेवाले,अनेक वाईट व्यसन बंद करनेवाले मानव धर्म की जय! असा हर्षकल्लोळात जयघोष केला.

वनखात्याच्या चौकीदार हाही त्या वेळेस तेथे हजर होता. तो म्हणाला, या तलावात जो उडी मारतो तो वर येत नाही. तो मरतोच पण तुम्ही सर्वजण सहीसलामत कसे वर आलात? हे तुमचे गुरु तुमच्याबरोबर असल्यामुळेच त्यांचाच महिमा आहे. येथे कोळी मासोळी धरत नाहीत. ते घाबरतात. पण तुमची हिंमत आणि तुमच्या गुरुने दिलेली परवानगी यामुळे खरोखरच भगवंत तुमच्याजवळ आहे हे सिध्द होते.

त्यानंतर सर्वजण भोजनाचे ठिकाणी आले. सर्वांनी भरपूर भोजन केले. सर्वांच्या आनंदाला पारावर नव्हता. सर्वजण बाबांना म्हणाले, "बाळा आज या प्रसंगातून वाचलो नसतो तर काय झाले असते? केवढा मोठा प्रसंग ओढवला होता आणि सर्व सेवक बाबांसमोर नतमस्तक झाले. त्यानंतर त्या सर्वांनी बाबांना शब्द दिला की, हा प्रसंग बाबांचे न ऐकल्यामुळे, त्यांच्या शब्दाचा अनादर केल्यामुळे ओढवला. यापुढे बाबांचे शब्द नेहमी अंमलात आणू असे सत्य वचन त्या सर्वांनी दिले. बाबांनी त्या सर्वांना क्षमा केली. जेवण आटोपल्यावर सामानाची आवराआवर करुन मंगरली या गावात सायंकाळी सर्व सेवक सुखरुपपणे परत आले. वरील प्रसंगावरुन हे सिध्द होते की, बाबांच्या रुपात परमेश्वर नेहमी सर्वत्र असतो. सर्व सेवकांनी त्यांच्या शब्दांचा आदर करायला पाहिजे. परमेश्वर बाबांच्या पादुकांच्या रुपातही हजर असतो. बाबा परमेश्वराचे रुप आहे हे बसका बैल' म्हणजे जनावराने देखील ओळखले.



No comments

Powered by Blogger.