PARMATMA EK- आत्मप्रचिती


PARMATMA EK- आत्मप्रचिती    

PARMATMA EK- आत्मप्रचिती
PARMATMA EK- आत्मप्रचिती
         एके दिवशी महानत्यागी बाबा जुमदेवजी नेहमीप्रमाणे काही सेवकांना बरोबर घेऊन मानव जागृती विषयी मार्गदर्शन करण्याकरिता रामटेक तालुक्यातील भंडारबोडी या गावी दौऱ्यावर गेले होते. ते परमात्मा एक सेवक दुग्ध उत्पादक संस्था, सालईमेटा/भंडारबोडी येथे निवासाला थांबले होते. ही संस्था बाबांच्याच मार्गदर्शनाखाली स्थापन झालेली आहे. हे दौऱ्याचे दिवस भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षाचे होते. या कृष्णपक्षास पितृपक्ष असेही म्हणतात. हिंदू धर्मातील लोक या पितृपक्षामध्ये त्यांच्या कुटुंबात मरण पावलेल्या लोकांचे त्या तिथीला श्राध्द करतात. त्यामुळे या पक्षाला अनन्यसाधारण महत्व आहे. भगवत्का्याची चर्चाबैठक आटोपल्यावर बाबांनी त्या ठिकाणी मुक्काम केला.


                              दुसऱ्याच दिवशी सकाळी बाबा आंघोळ वगैरे आटोपून त्या संस्थेच्या प्रांगणात एकटेच बसले होते. त्यावेळेस त्यांना एकाएकी आठवण झाली की, सध्या श्राध्दपक्ष सुरु आहे आणि आज त्यांच्या वडिलांचा मुक्तीदिवस आहे. तेव्हा ते स्वतःच मनाशी विचार करु लागले की, आजच्या तिथीला त्यांच्या वडिलांना देवाज्ञा होऊन या मृत्युलोकांतुन मुक्ती मिळाली होती. ते या पृथ्वीतलाला (जगाला) सोडून गेले होते. ते मनाशीच बोलले, जर मी स्वतःच्या घरी नागपूरला असतो तर वडिलांच्या नावांवर दिवसभर उपवास केला असता आणि सायंकाळी भगवान बाबा हनुमानजीला नैवेद्य दाखवून एकदाच जेवण घेतले असते. पण आता तसे करणे शक्य नाही. या विचारात ते चिंतामग्न झाले आणि या विचारातच देहभान विसरले. ते निराकारात आले. त्यांच्या अंतरात्म्यातुन खालील संवाद बाहेर पडलेत, जे त्यांनी त्यांच्याच कर्णाव्दारे ऐकले  त्यांच्या अंतरात्म्यातून आवाज निघला की,

                   "सेवक, तु पागल हो गया। किस बातकी तु चिंता कर रहा है।" तेव्हा महानत्यागी बाबा जुमदेवजी, भगवान बाबा हनुमानजी ला म्हणाले, "बाबा, आज मेरे पिताजी का मुक्ती का दिन है। अगर मैं अपने घरपर होता तो उनकी याद में एकही समय भोजन करता। लेकीन में बाहरगांव में हूँ। मैं कुछ नही कर सकता।" बाबांचे हे शब्द ऐकून भगवान बाबा हनुमानजी महानत्यागी बाबा जुमदेवजीला म्हणाले, "हे सेवक सून, तेरे पिता का शरीर और मेरा आत्मा एक थी। तु एक भगवान को मानता है, इसलिये तेरे पिता मरने के बाद वह आत्मा तेरे पिता का शरीर छोडकर मुझमे विलीन हो गयी। और तुने तेरे पिता का शरीर जलाकर राख कर दिया। अब बोल सेवक, तु राखकी पुजा करता है या मेरी। भगवंताचे हे शब्द ऐकून महानत्यागी बाबा जुमदेवजी म्हणाले, भगवान आजसे मेरे मन का शुध्दीकरण हुआ। मैं इस तरह के पुराने विचार मेरे दिल में कभी नहीं लाऊँगा और भगवान, मैं तेरीही पुजा हमेशा करुँगा' असेबाबांनी भगवंताला सत्य वचन दिले.


       अशाप्रकारे भगवंताने (बाबा हनुमानजीने) महानत्यागी बाबा जुमदेवजीना आत्मप्रचिती दिली. तेव्हापासून बाबांनी सेवकांना मृत्यु झालेल्या लोकांची पुजा बंद करायला लावले.

No comments

Powered by Blogger.