PARMATMA EK- असाध्य रोग परमात्मा एक
PARMATMA EK- असाध्य रोग
![]() |
| PARMATMA EK- असाध्य रोग परमात्मा एक |
मानवधर्म हा मार्ग मानवाने आत्मसात केल्यास त्याला झालेले असाध्य रोग नष्ट होतात. उदाहरणार्थ-हृदयविकार, कोड, महारोग कॅन्सर, टी.बी., मुळव्याध, कावीळ, मधुमेह इत्यादी. यांची अनेक उदाहरणे म्हणून या मार्गातील सेवकांचे अनुभव सांगता येतील. या असाध्य रोगांत वंश परंपरागत आणि संसर्गजन्य असे अनेक रोग आहेत. या मार्गात हे सर्व प्रकारचे रोग नष्ट होतात, जेव्हा वरीलपैकी कोणताही रोग.
उदा. टी.बी., महारोग, कोड, मधुमेह, मुळव्याध, हृदयविकार मानवाला झाल्यानंतर जेव्हा तो डॉक्टरांकडे जातो प्रथमच डॉक्टर चौकशी करतात की त्यांच्या घराण्यात हा रोग यापूर्वी कधी झालेला आहे काय? त्यामागील कारण हेच की, हे रोग वंशपरंपरागत आहेत म्हणून हे रोग होतात आणि औषधोपचार केला तरी तो रोग त्या घराण्यात पुढे कोणालाही होणार नाही याची शाश्वती डॉक्टरांकडून मिळत नाही. याला कारण 'रक्ताचे नाते' म्हणून ते सांगतात.
महानत्यागी बाबा जुमदेवजी यांनी यावर बरेथ संशोधन केले आहे आणि या असाध्य रोगांवर मात करुन या मार्गात ते साध्य केलेले आहेत. त्यांचे संशोधन पुढीलप्रमाणे आहे. डॉक्टरांच्या निदानाप्रमाणे वंशपरंपरागत रोग होण्याचे कारण "रक्ताचे नाते" असेल तर तो त्या कुटुंबात प्रत्येकालाच थोड्याफार प्रमाणात असला पाहिजे. परंतु तसे होत नाही. तो एखाद्यालाच असतो. काही वेळेस दोन-तीन पिढ्यानंतर येतो. त्या कुटुंबात तो रोग ज्या व्यक्तीला झाला असेल ती व्यक्ती मरण पावल्यावर त्याच्या आत्म्याला शांती मिळत नाही आणि मोक्ष न मिळाल्यामुळे तो भटकत असतो. तो आत्मा ज्या कुटुंबातून बाहेर पडतो त्या कुटुंबात तो पुनः जाण्याचा प्रयत्न करतो आणि शक्यतोवर तो तेथेच जातो.
तेव्हा त्या कुटुंबात तो आत्मा गेल्यावर ज्याला तो स्पर्श करतो त्याला हा रोग जडतो आणि जोपर्यंत त्या आत्म्याला शांती किंवा मोक्ष मिळत नाही तोपर्यंत रोग त्या कुटुंबातील वंशजात होत असतो. ज्या व्यक्तीला असा रोग आहे ती व्यक्ती या मार्गात आल्यावर त्यावर ही देवीशक्ती कार्य करते आणि ज्या आत्म्याचा त्याला स्पर्श झाला असेल त्यावर मात करते आणि त्या आत्म्याला या लक्ष चौऱ्यांशी भोगातुन मुक्त करते. ती भटकती आत्मा मुक्त माल्यावर त्याला मोक्ष मिळतो. त्यामुळे तो पुन्हा भटकत नाही आणि त्यापुढे तो आत्मा कोणालाही स्पर्श करीत नाही. म्हणून त्या कुटुंबात ते दुःख पुन्हा कोणालाही होत नाही.
अशा प्रकारे वंशपरंपरागत रोग नष्ट होतात आणि त्या कुटुंबाची त्या रोगापासून मुक्तता होते, हाच सिद्धांत संसर्गजन्य रोगांकरिता लागू होतो. काही संसर्गजन्य रोग उदा. कावीळ हे धुळीच्या कणांमुळे होतात. वातावरणात बदल झाल्यास अनेक रोग उदभवतात, वातावरण बदलविणे हे सुध्दा त्या सृष्टिनिर्मात्या परमेश्वराचे कार्य आहे. तीच दैवीशक्ती यावर मात करु शकते. म्हणून हेही रोग या मार्गात त्या दैवीशक्तीमुळे बरे होतात.

Leave a Comment