PARMATMA EK ANUBHAV आजची अनुभव मालिका
![]() |
| PARMATMA EK ANUBHAV आजची अनुभव मालिका |
▶️ आजचा अनुभव मालिका…
👇👇👇👇👇👇👇👇👇
⭕⭕⭕⭕⭕⭕⭕⭕⭕
भगवान बाबा हनुमानजी को प्रणाम !
महानत्यागी बाबा जुमदेवजी को प्रणाम !!
परमात्मा एक !!!
मानव धर्म एकता परिवार गृपवर मी,
👉 "माझा सत्य अनुभव" 👈
आपल्या समोर आज सादर करीत आहे.
माझे नाव : संतोष मंसारामजी बोपचे आहे.
माझे जन्म गाव : मु. पो. मिटेवानी, ता. तुमसर, जि. भंडारा.
मी शिक्षणासाठी 1975 पासून आपले नातेवाईकाकडे राहत होतो, त्यांचे शिक्षण संस्थेत खजरी (डोंगरगाव) च्या हायस्कूल मधे 1983 पासून नोकरीला लागलो. त्यानंतर 1986 ला गोंदियाच्या ज्यु. काॅलेजमधे बदली झाली.
मी, पत्नी, दोन मुले व एक मुलगी या परिवार सह संतोष सदन, सुर्याटोला रोड, रामनगर, गोंदिया. येथे वास्तव्यास आहे.
मला वर्ष- 1987 पासून सायटिकाचा (तिडक्या वात) त्रास होता. त्रास वाढल्याने K.T.S. हास्पीटल मधे 15 दिवस भर्ती होतो, नंतर डॉ. गाडेकर कडून एक वर्ष उपचार केल्यानंतर नागपूरच्या डाक्टरांकडून उपचार करूनही काही लाभ मिळाला नाही,
मला चालायला फारच त्रास होत होता. मी एका जागेवर पाच मिनिटे बसू शकत नव्हतो. त्यामुळे नोकरीवर जाणे बंद केले. त्रासामुळे जीव नकोसा वाटत होता, पत्नी व मुलांना दुःखाची जाणीव होऊ द्यायची नाही हे ठरवून उपचार करून दुःख सहन करत रहायचे. हे ठरविले.
आगष्ट 1995 ला माझा मोठा मुलगा दिप्तेशची प्रकृती बिघडली. गोंदियाचे प्रसिद्ध डॉ. बाहेरचा उपचार सुरू असताना अचानक जेवण कमी होऊन हळूहळू बंद झाले, त्याची तब्येत रोजच्या रोज खालावत चालली होती. त्यामुळे त्याच्या शरीराची वाढ होणे थांबले होते. त्याला बसायला - उठायला - चालायला त्रास होत असल्याने त्याचे शाळेत (9 व्या वर्गात होता) जाणे बंद झाले. डॉ. बाहेकर च्या उपचाराचा लाभ मिळत नव्हता, तेंव्हा त्यांनी मुंबई वरून ब्लड रिपोर्ट मागवली, त्यावरून त्यांनी हायपो थायराइट झाल्याचे सांगितले व तब्येत बरी व्हायला वर्षभर लागेल आणि याला आयुष्यभर औषध घ्यावे लागेल, अन्यथा शरीराची वाढ होणार नाही, आता आहे याच स्थितीत राहील, असे सांगितले.
माझ्या पत्नीला सुध्दा शारीरिक त्रास होता.
एकंदरीत आमचा पुर्ण कुटुंबच दुःखी होता.
माझ्या जन्मापासून कान्होबा (कृष्ण) मांडत होते. गणपतीची मुर्ती मांडत होतो आणि नवरात्रात घट मांडत होतो. त्या कालावधीत घरचा कोणी ना कोणी बिमार असायचा. एका बाईच्या अंगात दुर्गा, भवानी, शक्ति, काली या सारख्या देवी यायच्या, तिच्या जवळ सेवादार होतो. स्वयंपाक खोलीत मंदिर बनवले होते. घरासमोर हनुमानजींची मुर्ती खुल्या जागेत मांडलेली होती, तेंव्हा घराचे बांधकाम सुरू असतांना स्वखर्चाने मिस्त्री कडून मंदिर बनवून गुंबज बनविले. गावातील घरात घरदेव होते, त्याची दरवर्षी आषाढी पौर्णिमा, दसरा व शिवरात्रीला पुजा होत होती, परंतु कोणत्याही देवी-देवतांनी आमचे दुःख दुर केले नाही.
पुर्वीच्या युगात नारदमुनी दुःखीतांचे दुःख निवारणार्थ पृथ्वीवर यायचे व उपाय सांगायचे, अशा कथा-कहाणीया ऐकल्या होत्या, पण या… कलियुगात भगवंताच्या कृपेने बाबांचे सेवक माननिय गोपीचंद जी गायधने यांच्या पत्नीने माझ्या पत्नीला मुलांविषयी विचारपूस केली, कारण त्यांच्या कुटुंबाचे व आमचे चांगले संबंध आहेत व मुले सोबत शिकत होते. त्यांनी मार्गाविषयी माहिती दिली.
माझ्या पत्नीने मला सांगितले, तेंव्हा आम्हाला नवेगाव (आंधळगाव) येथील 10-15 वर्षांपूर्वीच्या चौदावी निमित्त घडविलेल्या हवन कार्याची आठवण आली. ज्या मधे 'बाबा हनुमानजी' स्वाहा हा शब्द ऐकायला मिळाला होता,
माझ्या पत्नीने मला गायधने बाईचे विचार सांगितले तेंव्हा मी म्हणालो, तु सकाळ-संध्याकाळ पुजा पाठ करते मग कसे करावे, ती म्हणाली मी साकोलीवरुन आल्यापासून सर्व पुजा बंद केले आहे.
(माझी पत्नी दिवाळीला भावाकडे साकोली ला गेली होती,) तिने सांगितले की भाऊं कडे देवींचा ठाणा होता, त्यांनी सर्व देव्हाऱ्याचे विसर्जन केले आणि बाबांचा मार्गात आले. तेंव्हा पासून वहीनीची तब्येत चांगली झाली आहे, म्हणून आता या देवांवर माझा विश्वास नाही, असे ती बोलली, तेंव्हा मी विचारात पडलो. आता काय करावे...
लोक म्हणतात, एकाच ठिकाणी तीन वर्ष पुजा पाठ केले, त्या ठिकाणाला देवत्व येते, मग विसर्जन केल्यावर दुःख न येता, बाबा हनुमानजी शब्दांवर भगवंताची कृपा मिळाली. या शब्दाचा तिर्थ मानवाचे दुःख दुर करतो, याचा सेवकाकडून आम्हाला ज्ञान मिळाला.
दि. 19/11/1995 रविवार ला गायधनेजींनी आम्हाला कार्य घेण्याकरिता नखातेजी कडे नेले. त्यांनी मार्गाचे नियम, बंधन व शिकवणीची संपूर्ण माहिती दिली व आमची विचारपूस व दुःखाच्या कारणांची तपासणी करून भगवंतासमोर बाबांच्या आदेशाचे पालन करण्याचे वचन द्यायला सांगितले.
दि. 20/11/1995 सोमवार पासून 11 दिवसाचे कार्य सुरू केले.
प्रथम कार्यात मुलाला 75 टक्के आराम मिळाला. माझा सायटिका सटकला. व पत्नीलाही भगवत कृपेचा लाभ मिळाला........
अवघ्या एका महिन्यातच भगवंताच्या कृपेने आमच्या कुटुंबाचे सर्व दुःख दुर झाले. आम्हाला सुख-समाधानी मिळाली. बाबांच्या आदेशानुसार 5 महिने साधे कार्य केल्यानंतर…....
दि. 20 / 04 / 1996 शनिवार पासून बाबांच्या आदेशानुसार ४१ दिवसाचे त्यागाचे कार्य करून 42 व्या दिवशी दि. 31 / 05 / 1996 शुक्रवार ला समाप्ती केली. व त्याच दिवशी बाबांच्या आदेशानुसार बाबांचे दिवानजी साहेबांच्या उपस्थितीत त्यागाचे हवन कार्य केले. हा आम्हाला एक भगवंताच्या कृपेचा मिळालेला अनुभव आहे.
अनुभव सागतांनी चुकी झाली असेल तर भगवान बाबा हनुमान जी मला क्षमा द्या, महानत्यागी बाबा जुमदेवजी मला क्षमा द्या, तसेच आपणास सर्वांना मी माफी मागतो, सर्वांना माझा सप्रेम नमस्कार जी...........|
नाव :- संतोष मंसारामजी बोपचे.
पत्ता :- संतोष सदन, सुर्याटोला रोड , रामनगर, गोंदिया. जिल्हा. गोंदिया. महाराष्ट्र
जन्म गाव : मु. पो. मिटेवानी, ता. तुमसर, जि. भंडारा.
सेवक क्रं:-७४१४
मार्गदर्शक :- मा.श्री प्रभाकरजी वैरागडे, गुरुजी, मु. भंडारा
परमपुज्य परमात्मा एक सेवक मंडळ, वर्धमान नगर, नागपूर.
•••••••••••••••••••••••••••••••••
-------------------------------
-------------------------------
[ टिप :- वरिल अनुभवाची कुणीही काँपी करु नये, त्यापेक्षा जास्तीत जास्त शेअर करावा. ]
भगवत् कार्याच्या या गृपला जुडण्याकरिता व आपले परमेश्वरी कृपेचे अनुभव सेवकांपर्यत पोहोचविण्याकरिता खालील सेवक दादांशी संपर्क साधावा...
गणेश दादा बिडकर :-9766573410
मोहन दादा आस्वले:-9764989883
रोशन दादा काटेकर :-8956656210
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
सौजन्य :-
"अॅडमिन,सेवक,सेविका",
मानवधर्म एकता परिवार,
[Watts app group & Facebook page ,Sharchat group}
युवा आणि जेष्ठ सेवकांचा समुह,
परमपुज्य परमात्मा एक सेवक मंडळ, वर्धमाननगर, नागपुर.
©®
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••

Leave a Comment