PARMATMA EK Anubhav
▶️आजचा अनुभव :-
![]() |
| PARMATMA EK Anubhav |
👇🏿👇🏿👇🏿👇🏿
⭕⭕⭕⭕⭕⭕⭕⭕⭕⭕⭕
!!भगवान बाबा हनुमानजी को प्रणाम!!
!!महानत्यागी बाबा जुमदेवजी को प्रणाम!!
!!परमात्मा एक!!
"माझा सत्य अनुभव"
【 "दारूच्या व्यसनामुळे कुटुंबाचा झाला होता सत्यानाश, परमात्मा एक मार्गी येताच दूर झाले सर्व त्रास"】
माझे नाव 'विशाल रामदासजी गौंधरे' असुन मु.घोटी (गोरेगाव)येथे परिवार सह वास्तवत आहे. आज मी मानवधर्म एकता परिवार गृप वर"माझा सत्य अनुभव" या अनुभव मालिकेत माझा प्रथम अनुभव 'मार्गात येण्याचे कारण' आणि मला आलेले भगवंत कृपेचे काही अनुभव सादर करीत आहे.
मार्गात येण्याआधी माझ्या परिवारात आई, वडील, माझ्या तीन बहिणी, मी आणि माझा लहान भाऊ असे एकूण सात सदस्य होते. मार्गात येण्याआधी आमची परीस्थिती खालावलेली होती. कुटुंबात कमावणारे व्यक्ती फक्त माझे वडील होते. ते सायकल रिक्षा चालवायचे तसेच चप्पल, जुते शिवण्याचे काम करायचे आणि गोरेगाव ला आमची थोडी शेती होती. अश्याप्रकारे आमची मिळकत होती. तेव्हा आम्ही खुप लहान होतो. त्यावेळी माझे वडील १०० ते १५० रुपये कमवायचे. यामुळे आमची आर्थिक परिस्थिती हलाकीची होती. हलाकीच्या परिस्थितीमुळे माझ्या वडिलांना दारूचे व्यसन लागले होते. या व्यसनामुळे ते आईला आणि आम्हा बहीण, भावाला दार बंद करून मारहान करायचे. मी तीन ताईंच्या नंतर जन्माला आलो, तर सर्वांना फार आनंद होता, पण दुःखही तेवढेच होते. कारण, सर्वात जास्त पैसे माझ्या प्रकृतीवर खर्च व्हायचे.
माझ्या मोठ्या ताईचे लग्न अगोदर झाले. ताईच्या लग्नाला १४ वर्ष झाले होते, तेव्हा मी ९ वर्षांचा होतो. माझ्या ताईचे लग्न चांगल्या कुटुंबात झाले. माझे भाऊजी हे कधी ही दारूचे व्यसन व मांसाहार करायचे नाही आणि आजपण करीत नाही. मी जस जसा मोठा होत गेलो, तसे आपले शिक्षण आणि काम दोन्ही मी करीत होतो. जेव्हा मी ९ व्या वर्गात होतो, तेव्हा मला चारचाकी गाडी चालविण्याचा छंद लागला. मी गाडी पण चालवणे शिकायचो आणि शाळेत पण जात होतो. तेव्हा मला ५० रुपये मिळत होते. मग मला पैसे कमवायच्या लालचीने जवळ केले आणि मी ऑटो चालवायला लागलो. त्यामुळे थोडे पैसे येणे सुरू झाले, पण मग मला सुद्धा इयत्ता ११ वी पासून दारूचे व्यसन लागले होते. थोड-थोड करत व्यसनाचे प्रमाण वाढले.
माझा लहान भाऊ शाळा शिकत होता. माझे पण १२ वीचे शिक्षण पुर्ण झाले. त्यानंतर मी बी.ए. प्रथम वर्षाला प्रवेश घेतला, पण काही कारणास्थव माझे शिक्षण पूर्ण झाले नाही. नंतर माझ्या दोन्ही ताईंच्या लग्नाची वेळ आली आणि १४ एप्रिल २०१२ ला त्यांचे लग्न झाले. मधले भाऊजी कधी-कधी दारू पित होते आणि लहान भाऊजी हे 'परमात्मा एक' मार्गात आहेत. त्या नंतर मला आणखी दारूचे व्यसन लागले आणि मी लपून-छपून दारू पित होतो, हे कोणाला माहीत नव्हते. एके दिवशी मी दारू पिऊन सायंकाळी सहा ते सातच्या दरम्यान ८ सवारी घेऊन ऑटोने गोरेगाव वरून गोंदिया साठी निघालो व अर्ध्या रस्त्यात माझ्या ऑटोची आणि एस.टी बसची धडक झाली. त्या मध्ये एका स्त्रीचा जीव गेला. सर्वांना थोडे थोडे लागले होते, पण मला मात्र भान नव्हते. सगळे म्हणत होते की, "ऑटो चालक मरण पावला असेल". कारण, माझ्या डोक्यावर सर्वात जास्त मार लागला होता आणि मी रक्ताने पूर्ण भिजून गेलो होतो. माझ्या डोक्याला आठ टाके लागले होते. जेव्हा मला दवाखान्यात भरती केले, तेव्हा डॉक्टर म्हणायचे की, "याला नागपूरला भरती करावे लागेल, पण वाचून जाईल याची काही हमी नाही".
म्हणून त्याच वेळी माझे सर्व नातेवाईक, आई-वडील यांचे रडणे सुरू झाले. कारण, मी लहानपणापासुन सर्वांचा लाडका होतो. भगवंताजवळ कुठे जागा राहली असेल, म्हणून मी आज जीवन जगत आहे. मग गोंदिया मध्येच खाजगी दवाखान्यामध्ये मला भरती केले आणि मग मी ३-४ महिने आराम केला. बर झाल्यानंतर मग मी काम पाहू लागलो आणि त्यासाठी पुणेला गेलो. तेथे ६ महिने राहीलो आणि मग परत आलो. परत आल्यानंतर मग इकडे-तिकडे काम करीत होतो.
माझे वडील म्हणाले होते की, "मी रिक्षा चालवले, पण मी आपल्या मुलांना रिक्षा चालवू देणार नाही". त्यानंतर इकडून तिकडून पैसे जमवून १,४०,००० रुपयांचा एक नवीन ऑटो घेतला आणि मग मी तो ऑटो चालवू लागलो. त्यामुळे माझ्या जवळ पैसा तर येऊ लागला, पण माझे दारूचे व्यसन खुप जास्त वाढले होते. त्यामुळे माझ्याकडे काहीही पैसे शिल्लक राहत नव्हते. मी गाडीच्या किस्तानचे पैसे भरू शकत नव्हतो. माझा लहान भाऊ १२ वी झाल्या नंतर नागपूरला कामधंदा करायचा आणि तिथूनच तो ऑटोची कीस्त भरायचा. मी आणि आई सोबत गावी राहत होतो. दारूमुळे अशी परिस्थिती होती की, ऑटो खराब झाला तर त्याला दुरूस्त करायला पैसे राहत नव्हते. त्यामुळे भाऊ आणि वडील माझ्या पासून वैतागून गेले होते. मला त्यांनी पैसे देणे बंद केले व त्यामुळे माझा ऑटो पण घरीच उभा राहत होता.
त्यामुळेच एक दिवस वडिलांसोबत माझे खूप भांडण झाले, म्हणून मी नागपूरला पळून आलो. नागपूरला जाऊन चप्पल-जोडे शिवण्याचे काम करीत होतो. मग दिवाळी जवळ होती आणि मी दिवाळीच्या दिवशी पण घरी गेलो नव्हतो. मग माझ्या आई-वडिलांनी विचार केला की, "हा असा सुधारू शकत नाही, तर याचे लग्न केले पाहिजे". मग दुसऱ्या दिवशी माझ्या काकांचा मला फोन आला की, "जर तू आज घरी परत आला नाही, तर तुला मी नागपूर वरून मारत घरी घेऊन येईल".
आमच्या परिवारा मध्ये सर्वात जास्त मी माझ्या काकाला भीत होतो. त्यानंतर मी लगेच घरी परत आलो आणि मग ऑटो दुरूस्त केली. काही दिवसांनी मुलगी पाहणे सुरू झाले. त्यावेळी पण माझे दारूचे व्यसन सुरूच होते. मग साकोली तालुक्यातील सुकळी या गावातील मुली सोबत माझे लग्न ठरले. माझे सासरे श्री. उमरावजी चौबे हे 'परमात्मा एक' मार्गाचे सेवक आहेत आणि त्याचे मार्गदर्शक स्व. सार्वेजी आहेत. माझे लग्न जुळले तेव्हा माझी वय फक्त २१ वर्षे होती. १५ एप्रिल २०१५ ला माझे लग्न थाटामाटात पार पडले.
मग मी आपल्या गृहस्थीला लागलो आणि लग्ना नंतर २ महिन्यानंतर माझ्या पत्नीला दिवस राहले. त्यामुळे आम्हा सर्वांना खूप आनंद होता. मी दारू पीत होतो, पण पुष्कळ कमी आणि ती सेवकांची मुलगी होती तर तिला दारू काय होते हे कळत नव्हते. मी जन्माआधी पासून आमच्या घरी एक प्रतिमा स्थापित करीत होतो. आमच्या घरी एक देव पण होता आणि नवरात्री मध्ये अष्टमीला मोठी पूजा राहत होती. मी पुर्ण ९ दिवस उपवास करीत होतो आणि देवी, देवतांची पूजा करीत होतो. पण आमच्यावर दुःख असे आले की, "सर्व देवी-देवता केले आणि डॉक्टरी उपचार करून सुद्धा ३ महिन्यांच्या वर माझ्या पत्नीला दिवसच जात नव्हते". मी त्या काळजीमुळे आणखी जास्त दारू प्यायला लागलो. कोणी म्हणायचे की, "मरत वेल लागला म्हणून अस होत असेल", पण माझा भूतबाधेवर कधीही विश्वास होत नव्हता. मग मी दारूचे व्यसन सोडले.
माझ्या वडिलांचे दारूचे व्यसन सुरुच होते. काही दिवसांनी माझ्या पत्नीला आणखी दिवस राहिले आणि असे दोनदा झाले. पण यावेळी एक महिना जास्त म्हणजे ३ महिने झाले. पण पुन्हा रक्तस्त्राव सुरू झाला आणि सोनोग्राफी काढली, तर डॉक्टरांनी सांगितले की, "गर्भपात करावे लागेल". माझ्या पत्नीची अवस्था खूप नाजूक झाली होती, त्यामुळे तिला रक्ताची गरज भासली तर मी स्वतःचेच O+ रक्त दिले. डॉक्टरांनी गर्भ पिशवी साफ केली. या दोन वेळा मध्ये माझे ३० ते ४० हजार रूपये खर्च झाले.
मग माझा पूर्ण देवी-देवता वरून विश्वास उठून गेला आणि मी पुन्हा जास्त व्यसन करायला लागलो. आपले समोरचे जीवन कसे होणार म्हणून माझी पत्नी खूप रडायची. त्यातच माझा लहान भाऊ पण दारूचे व्यसन करायला लागला. यामुळे माझ्या घरी दु:ख येणे सुरू झाले. माझे मित्र त्यांचे ऑटो दुरुस्तीचे काम आहेत, ते पण आमच्या सोबत कधी काळी दारू प्यायचे, पण आज ते 'परमात्मा एक' मार्गात आले व आज ते मार्गाचे त्यागी सेवक आहेत आणि त्यांचे दुःख दूर होऊन, त्यांची गृहस्थी ऊंच आलेली आहे.
एके दिवशी अशी वेळ आली की, आम्हाला एका भगवंताच्या चरणी यावेच लागले. माझ्या आईची प्रकृती खुप गंभीर झाली होती, ती शेवटच्या स्थानावर होती. तिला सकाळी ४ वाजता पासून संडास आणि उलट्या सुरू झालेल्या होत्या. आम्ही सगळे झोपलो होतो. मग आमच्या घराच्या जवळ बोअरवेल आहे, तर तिथे एक बाई पाणी भरायला आली. तर त्यांनी आवाज दिला की, तुझी आई मेली म्हणून. तर तसेच आम्ही तिकडे धावलो. आईला उचलले आणि घरा जवळ दवाखान्यामध्ये भरती केले, तर डॉक्टर म्हणाले की, "बी.पी. फार कमी झालेली आहे".
म्हणून मग त्यांनी ५ ग्लुकोजचे बॉटल लावले आणि इंजेक्शन लावले, पण काहीही आराम मिळाला नाही. तेव्हा डॉक्टर म्हणाले की, "गोंदियाला घेऊन जा". पण आम्ही आईला गोंदियाला न नेता आमच्या गावीच पी.एच.सी. ला भरती केले. तेव्हा डॉक्टर रागावले की, "गावी पी.एच.सी. राहून तुम्ही बाहेर नेता" आणि मग त्यांनी भरती करून घेतले. पुढे ते म्हणाले की, "काही झाले तर आम्ही जबाबदारी घेणार नाही". मग एक फॉर्म आणला व त्यावर माझी सही घेतली आणि आईला भरती घेतले.
तेव्हा मला खरी 'परमात्मा एक' मार्गाची आठवण आली व मी आपल्या मनात विचार केला की, "माझी आई चांगली झाली तर 'परमात्मा एक' मार्गात प्रवेश करील". तर आईला लगेच आराम झाला आणि २ दिवसा नंतर सुटी पण मिळाली. मग मी म्हणालो की, "मला 'परमात्मा एक' मार्गात प्रवेश करायचा आहे". पण, माझ्या गोष्टींचा कोणीही विश्वास करत नव्हते. माझी पत्नी पण माझ्यावर विश्वास करीत नव्हती. तर मी ज्या ठिकाणी ऑटो दुरुस्ती करीत होतो, त्यांना विचारले की, "मला 'परमात्मा एक' मार्गात यायचे आहे". तर ते म्हणाले की, "अगोदर पूर्ण घरच्या लोकांना विचारले पाहिजे. हा मार्ग सहकुटुंब मिळतो कारण, मार्ग हा कोणा एकाला मिळत नाही". मग त्यांना मी घरी बोलावले. 'परमात्मा एक' मार्ग घेण्याच्या १ दिवसा अगोदर मी खूप दारू प्यायलो. ते पुढे घरी आले व त्यांनी सर्वांना समजावले आणि मला एक संधी द्या म्हणाले. मग सर्वांनी पक्का विचार करून सकाळी आंघोळ करून श्री. किशनजी कापसे यांनी आम्हाला आमच्या घरा जवळचे मार्गदर्शक श्री. भोजराजजी राऊत आहेत, पण आम्हाला माहीत नव्हते, तर त्यांच्या निवासस्थानी नेले. मग मार्गदर्शक काकाजींनी विचारले की, "मार्गात कशासाठी येत आहेत, तर आम्ही त्यांना आपले संपूर्ण दुःख सांगितले". मग ते म्हणाले की, "या मार्गात मरावे लागते". मग आम्ही म्हणालो की, "असेही मरतच आहोत". मग त्यांनी आम्हाला सविस्तर आणि योग्य मार्गदर्शन केले आणि ३ दिवसांचे कार्य दिले. कार्याच्या पहिल्या दिवसापासून आम्हाला सुख समाधानी मिळायला लागली. मग आम्ही जसजसे कार्य करत गेलो तसतसे आम्हाला समाधान मिळत गेले. योग मागितला की, "जुना ऑटो विकायचा आणि नवीन ऑटो घ्यायचा आहे". मग एक ग्राहक आला आणि ७० हजार रुपयांत जुना ऑटो विकला आणि लगेच त्यांनी आम्हाला ४० हजार रुपये दिले आणि बाकी १ महिन्यात देतो म्हणाले. त्यावेळी आमच्याकडे फक्त तेवढेच पैसे होते, पण भगवंत कधी आपल्याला दु:खी ठेवत नाही.
तर आम्ही शब्द ठेवला आणि लगेच आमच्याकडे पैसे येणे सुरू झाले. आमच्याकडे १ लाख १० हजार रुपये जमा झाले आणि आम्ही लगेच १ लाख ८० हजार रुपयांचा दुसरा ऑटो विकत घेतला आणि धंदा जोमात होऊ लागला. मग आम्ही भगवंताला बाळाचा योग मागितला आणि तो ही योग पूर्ण झाला. आम्ही जेव्हा ४ थ्या महिन्याला सोनोग्राफी काढली, तेव्हा डॉक्टर म्हणाले की, "बाळाचे वजन कमी आहे". तेव्हा आम्ही मार्गदर्शकांना सांगितले आणि त्यांनी मार्गदर्शन केले की, "सकाळी व सायंकाळी दोन्ही वेळा तीर्थ बनवायला सांगितले". जेव्हा ७ महिन्यात सोनोग्राफी काढली, तेव्हा बाळ निरोगी आणि स्वस्थ आहे असे डॉक्टरांनी सांगितले. यावेळी मला दर महिन्यात काहीही जास्त पैसे लागले नाही. फक्त २०० ते ३०० रुपये खर्च झाले. ही सर्व भगवंतांची कृपा आहे आणि आज आम्ही सर्व गावी एकत्रित राहतो. माझा लहान भाऊ घरची गाडी चालवितो आणि मी बाहेरची गाडी चालवितो व कार खरेदी विक्रीचे काम करतो. आता आम्ही सर्व सुखी समाधानी जीवन जगत आहोत. आज वर जे पैसे वाचत नव्हते, ते पैसे घरात वाचत आहेत व गृहस्थी उंचावत आहे. आमच्यावर भगवंताची कृपा अशीच सदैव राहो ही विनंती.
लिहिण्यात काही चुक-भुल झाली असेल तर "भगवान बाबा हनुमानजी" व "महानत्यागी बाबा जुमदेवजी" यांना क्षमा मागतो.
नमस्कार...!
नाव:- श्री. विशाल रामदासजी गौंधरे
पत्ता:- मु+पो. घोटी, ता. गोरेगाव, जि. गोंदिया.
मार्गदर्शक:- श्री. भोजराजजी राऊत,मु. घोटी.
परमपुज्य परमात्मा एक सेवक मंडळ,वर्धमाननगर,नागपूर.
•••••••••••••••••••••••••••••••••
--------------------------
--------------------------
[टिप :- वरिल अनुभवाची कुणिही काँपी करु नये, त्यापेक्षा जास्तीतजास्त शेअर करावा.]
भगवतकार्याच्या या गृपला जुडण्याकरिता व आपले परमेश्वरिकृेचे अनुभव सेवकांपर्यत पोहोचवीण्याकरिता खालील सेवक दादांशी संपर्क साधावा...
गणेश दादा बिडकर :-9766573410
मोहन दादा आस्वले:-9764989883
रोशन दादा काटेकर :-8956656210
•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
सौजन्य :-
"अॅडमिन,सेवक,सेविका",
मानवधर्म एकता परिवार,
[Watts app group & Facebook page ,Sharchat group}
युवा आणि जेष्ठ सेवकांचा समुह,
परमपुज्य परमात्मा एक सेवक मंडळ, वर्धमाननगर, नागपुर.
©®
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••

Leave a Comment