PARMATMA EK ANUBHAV | परमात्मा एक अनुभव

 ▶️आजचा अनुभव :-     


👇🏿👇🏿👇🏿👇🏿


⭕⭕⭕⭕⭕⭕⭕⭕⭕⭕⭕




*!!भगवान बाबा हनुमानजी को प्रणाम!!

PARMATMA EK ANUBHAV | परमात्मा एक अनुभव
PARMATMA EK ANUBHAV | परमात्मा एक अनुभव 

*!!महानत्यागी बाबा जुमदेवजी को प्रणाम!!

           *!!परमात्मा एक!!



                         "माझा सत्य अनुभव"


        माझे नाव दिपक डोमाजी पेटकुले असुन मु. मारोडी  ता. मौदा जिल्हा नागपूर या गावी परिवारासह वास्तवत आहे आणि मी मानवधर्म एकता परिवार गृपवर मला मार्गात आलेला दुसरा सत्य अनुभव आपल्या समोर सादर करित आहो.


या मार्गात आम्ही परिवारासह २००५ला मार्गात आलो.तेव्हापासुन आम्ही सुखसमाधानाने जीवन जगत आहोत . परंतू वर्ष २०१४मधे आमच्या बोलण्यात, वागण्यात काय चूक झाली तर माहीत नाही अचानक माझ्या लहान मूलीच्या  *( त्यावेळी तिची वय दोन वर्ष होती नाव  प्रियांशी आहे)* तिचा छातीला छोटिशी फूंशी झाली.तर मी गावातील डॉक्टर कडे घेऊन मुलीला दवाखान्यात गेलो.डाॅक्टरांनी औषध दिली व म्हणाले या औषधीने २/३दिवसात आराम मिळेल.

                 परंतू आराम मिळाला नाही ती फूंशी उलट वाढतच गेली. नंतर औषध उपचार करण्यासाठी मी पेट्रोल पंप ठाणा येथे डॉ.मणी यांच्या कडे घेवून गेलो तर यांनीही औषध दिली व म्हणाले या  औषधीने ती फूंशी दबुन जाईल. २/३ दिवस औषधी दिली तरी ती फूंशी कमी न होता उलट फूंशीचे रुपांतर बेन्डामधे झाले.तो बेन्ड इतका मोठा झाला की माझी मुलगी तो दुःख सहन करू शकत नव्हती.लसनाची गाठ एवढा तो बेन्ड झाला आणि माझ्या मुलीला हसने ,खेळणे,रडने,जेवन करणे ह्या सर्व क्रिया बंद झाल्या कारण छातीला बेन्ड असल्याने ती हसली तर दुःख लागत होता रडली तरीही ,जेवण करायचे तर जेवणं चाऊ शकत नव्हती . कारण जेवन चावते वेळीही छातीला दुःख होत असे यामुळे हसणं तर विसरून च गेली. आम्हालाही खूप विचार आला. आणि काय करावे कळत नव्हते. नंतर दुसऱ्या दिवशी सकाळी पून्हा डाॅ. मणी कडे घेऊन गेलो आणि मुलीला दवाखान्यात डॉक्टर ला दाखवले तर डॉक्टर म्हणाले या मुलीला तूम्ही भंडारा येथे डॉक्टर रंगारी यांच्या कडे घेऊन जा.या मुलीला भर्ती करून आणि बेहोश करून तो बेन्डला चीरा मारून फोडून त्यातला  पस  काढावा लागेल कारण मुलगी लहान आहे व   दुःख  छातीला आहे   ती हे दुःख सहन करणार नाही व हे काम माझ्याने जमनार नाही. म्हणून मणी डॉक्टर नी आम्हाला भंडाऱ्याच्या दोन डॉक्टरचे ऍड्रेस लिहून दिले १) रंगारी डाॅ. २) मेघरे डॉक्टर. नंतर मी माझ्या पत्नीसोबत मुलीला भंडारा येथे डॉक्टर रंगारी यांच्या कडे   घेऊन गेलो रंगारी डॉ.ला मुलीला दाखवलं तर ते म्हणत होते या मुलीला बेहोश करून इलाज करावा लागेल आणि त्यासाठी खर्च २५०० रू.लागतील  .मी म्हणालो साहेब काही कमी होणार काय? कारण त्यावेळी माझ्या कडे फक्त २३०० च रूपये होते.

डॉक्टर म्हणाले दादा मी आधीच कमी रक्कम सांगितली आहे यापेक्षा कमी होणार नाही.

मी मनात विचार करू लागलो की, डॉक्टर नी २५०० रू. सांगितले व बाकी औषध वगैरे पकडलं तर ३००० ते ३५०० हजार रुपये लागतील.भंडारामधे माझ्या कोणीही ओळखीचे नाही व माझ्या कडे मोबाईल नाही .मारोडीला जाऊन कुणाला पैसे उसने मागून आनूही शकत नव्हतो .असे केल्यास वेळ भरपूर लागला असता त्या मूळे मी खूप विचारात पडलो होतो.


          नंतर आम्ही पती पत्नी विचार केला की आता आपण भगवंताचा धावा केल्या शिवाय आपल्याला पर्याय नाही म्हणून आम्ही दोघेही भगवंताला विनंती करू लागलो .हे भगवान बाबा हनुमान जी आम्हच्या हातुन ज्या काही चुका झाल्या असतील किंवा बोलताना काही चुकले असेल तर आम्हाला माफ करावे व माझ्या मुलींचे दुःख दुर करा असं म्हणून जयघोष केला व  मणी डॉक्टर नी दिलेला दुसरा   एड्रेस मेघरे डॉक्टर कडे रिक्षा ने भगवंताचा नाव घेत  घेत गेलो.तेव्हा दुपारचे २/२.३० वाजले होते  मेघरे डॉक्टर त्यावेळी ऑपरेशन मधे बीजी होते . म्हणुन मुलीला घेऊन आम्ही वरांड्यामधे बसून भगवंताचा नाव घेत डॉक्टर ची वाट पाहत होतो.


   काही वेळाने डॉक्टर आले मी मुलीला दोन्ही हाताने उचलून डॉक्टर कडे घेऊन गेलो आणि डॉक्टरला सांगतच  होतो,तर डॉक्टर म्हणाले बेन्ड दाखवा,तर माझी पत्नी जवळ आली व हळूच मुलीचा कपडा वर उचलून डॉक्टर ला दाखवत आहे तर अचानक तो बेन्ड आपोआप फुटला व पस नीघू लागला. डॉक्टरने कैची लाऊन पूर्ण पस (कप भर)  काढला व   त्याला पूर्ण साफ केले व औषधी लावून  पट्टी  करून दिले. व काही औषध आणायला सांगितले आणि हा सर्व खर्च ३५०( तिनशे पन्नास रूपये) रूपयात पुर्ण झाला.  व मुलीला बेहोश ही करावे लागले नाही अशा प्रकारे भगवंत हाकेला धावून आला आणि माझ्या मुलीला जे दुःख होते ते दुःख दुर झाले व सायंकाळ पर्यंत आम्ही घरी पोहोचलो.

अशी ही भगवंताची कृपा आम्हाला मिळाली की ती जीवनभर विसरू शकणार नाही प्रत्येक सेवकांच्या विनंती ला भगवंत धावून. येतो फक्त आपण भगवंताच्या मागे धावायला पाहिजे .आपला भगवंत आपला धनी आहे म्हणून सेवकांनो धनी मागे धावा धनाच्या मागे धावू नका यावर विश्वास करा.


त्यावेळी पासून माझ्या परिवारात मुलींना शिस्त लावली की दुःख कोणतेही असो अथवा कुठल्याही प्रकारची इजा असो.अगोदर रक्षा लावायची कींवा तिर्थ बनवून घ्यायचा. आज माझा मुलगा दोन वर्षांचा आहे त्याला जर् काही इजा झाली तर अगोदर त्याला रक्षा लावायला सांगतो आणि तो लावतेही.


          कारण आज बरेच सेवक सेविका आहेत त्यांना  रक्षेवर विश्वास नाही मी त्यावेळी माझ्या मूलीला रक्षा किंवा ज्योती मधला तेल लावून दिलं असतं तर माझ्या मुलीला इतकं दुःख व मला इतका त्रास सहन करावा लागला नसता इतका भगवान बाबा हनुमान जी व महानत्यागी बाबा जुमदेवजी वर विश्वास आहे. चुकले असेल तर मला क्षमा करा.लिहण्यामधे काही चूका असतील तर मला क्षमा करा.

नमस्कार जी सर्व सेवक दादा आणि सर्व सेविका ताईला

•••••••••••••••••••••••••••••••••


नाव:-दिपक डोमाजी पेटकुले

मु.पो.:-मारोडी तर.मौदा जि.नागपुर

सेवक क्रं.:-४०८५३

मार्गदर्शक:-मा.श्री.पाण्डुरंगजी मदनकर मु.मौदा

परमपुज्य परमात्मा एक सेवक मंडळ,वर्धमाननगर,नागपूर.


•••••••••••••••••••••••••••••••••

--------------------------

--------------------------

[टिप :- वरिल अनुभवाची कुणिही काँपी करु नये, त्यापेक्षा जास्तीतजास्त शेअर करावा.]


भगवतकार्याच्या या गृपला जुडण्याकरिता व आपले परमेश्वरिकृेचे अनुभव सेवकांपर्यत पोहोचवीण्याकरिता खालील सेवक दादांशी संपर्क साधावा...


 गणेश दादा बिडकर :-9766573410

 मोहन दादा आस्वले:-9764989883

 रोशन दादा काटेकर :-8956656210

•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••


सौजन्य :-

"अॅडमिन,सेवक,सेविका",

मानवधर्म एकता परिवार,

[Watts app group & Facebook page ,Sharchat group}

युवा आणि जेष्ठ सेवकांचा समुह,

परमपुज्य परमात्मा एक सेवक मंडळ, वर्धमाननगर, नागपुर.

©®


••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••

No comments

Powered by Blogger.