PARMATMA EK- विणाकारण हसणं पडलं महागात ...!

 

PARMATMA EK-  विणाकारण हसणं पडलं महागात ...!
PARMATMA EK-  विणाकारण हसणं पडलं महागात ...!


!! भगवान बाबा हनुमानजी को प्रणाम !!

 !! महानत्यागी बाबा जुमदेवजी को प्रणाम !!

 !! परमात्मा एक !! 


 सर्वाना नमस्कार ..😊🙏


 विणाकारण हसणं पडलं महागात ...!


खुप दिवसापासून मनात विचार येत होते पण मी दुर्लक्ष करीत होतो .. मी माझ्या जिम्मेदारी पासुन दुर पडण्याचा प्रयत्न करीत होतो .. लिहावं की नाही या संभ्रमात होतो पण शेवटी भगवंताची कृपा की मला लिहावं लागलं ...


आम्हंच्या घराच्या मागे नवीन मार्गात आलेले सेवक श्री गजाननजी पाचे काकाजी राहात होते आणि आजही राहतात ... हि गोष्ट जवळ जवळ बावीस ते पंचवीस वर्ष जुनी आहे परंतु मला यात घडलेल्या घटनेपासुन जे शिकायला मिळाले मी ते आजही विसरलो नाही .


वेळ सायंकाळची .. जवळ जवळ सात ते साळेसात वाजलेले होते .. मी व माझा परिवार सांयकाळची प्रार्थना संपवुन घरी बसलो होतो ... तेव्हा माझी आई अचानक हातात सामान घेउन आली (आता नक्की तो सामान काय याची आठवण नाही माफी असावी .) आणि म्हणाली मी पाचेजींच्या घरी पोहचवुन येतो .. मी बोललो आई मी जातो ना तु कश्याला जाते .. आई बोलली ठिक आहे तुच जा ...


मी पाचे काकाजींच्या घराकडे चाललो होतो .. मनात खुप जिज्ञांसा होती त्यांना भेटण्याची कारण त्यांना दारुचे व्यसन होते आणि रोजच दारुच्या भारात त्यांच्याघरी बरेचदा वादविवाद व्हायचा मनात विचार होता की आता ते सुरळीत असतील अश्या प्रकारचे विचार चालु असतांनाच दोन तीन मिनटात मी त्यांच्या घरी पोहचलो .. तेव्हा ते सहपरिवार प्रार्थना करीत होते व शेवटचा जयघोष सुरु होता ... (जवळ जवळ दोन ते तीनच दिवस झाले होते काकाजी मार्गात येउन) .. त्यांचा परिवार जेव्हा जयघोष करीत होता तेव्हा त्यातील एकही सदस्य तालबद्ध पद्धतीने जयघोष करतांना मला दिसला नाही व मला नकळत हसु आले ते हसु आवरतच नव्हते .


मी हसलो पण त्या हसण्याने मला जगण्याची नवी दिशाच प्रधान केली ... माझ्या हातुन नकळत जरी चुक झाली तरी त्या चुकेची शिक्षा मला मिळाली .. आईने दिलेले सामान मी त्यांना दिलं व जो पर्यंत मी त्यांच्या घरी चर्चा करत होतो तो पर्यंत माझी वाचा मला सोबतीला होती आणि सामान दिल्यानंतर मी त्यांना नमस्कार घेउन जसा मागे फिरलो आपल्या घरी जायला तेव्हा माझी वाचा मला सोडुन गेली .. मी बोलण्याचा खुप पर्यंत करायचो पण पण आवाजच तोंडातुन निघत नव्हता .. मी मोठ्याने ओरडायचा प्रयत्न करायचो पण आवाज काही केल्या निघतच नव्हता .. माझी अवस्था खुपच कठीण झाली होती ..


अश्याच स्थितीत मी घरी पोहचलो .. आई बोलली सामान दिलं का ? .. मी हो बोलायचा प्रयत्न केला पण आवाजच मुखातुन निघत नव्हता ... कसाबसा मी घरच्यांना सामजावुन सांगितलं की माझा आवाजच निघत नाही .. घरचे सर्व घाबरलेत .. विचारपुस करु लागलेत पण सर्व व्यर्थ कारण आवाजच मुखातुन निघेना ..


जवळ जवळ वीस मिनटे सर्व तर्क वितर्क करु लागलेत .. आताच तर हा बोलत होता .. आता काय झालं याला .. मी ही विचार करु लागलो .. की मी कोणतीही चुक केली नसताना माझा आवाज असा एकाएकी बसला कसा .. अश्यातच आई बोलली तु उपादीच आहेस काहीतरी चुक केली असणार नाहीतर असं एकाऐकी आवाज जाणार नाही .. तु अगोदर भगवंताला माफी मांग मग नंतर बघु ..


मी पुजेला बसलो .. ज्योत जळतच होती .. कापुर अगबत्ती लावुन मी मनातल्या मनात सकाळची विनंती केली व योग मांगितला कि भगवान बाबा हनुमानजी माझ्या हातुन कळत नकळत जी चुक झाली असेल त्यासाठी आपण मला क्षमा करा व मी चुक कोणती केली हे लक्ष्यात आणुन द्या .. कापुर विझे पर्यंत मी हाच योग मागत होतो ... कापुर विझल्यावर मी पुन्हा सायकाळची प्रार्थना म्हणुन जेव्हा जयघोष करायला लागलो तेव्हा माझी चुक माझ्या लक्ष्यात आली आणि भगवंताची लिला बघा चुक लक्ष्यात येता बरोबर पुर्ण प्रार्थना मध्ये न निघणारा तोंडातुन आवाज हा जयघोष करतांनी निघत होता .. भगवंताची लिला न्यारी .. भगवंतांनी मला शिक्षा व शिकवण दोन्ही बाजु त्या दिवशी दिल्या .


मला शिक्षा का मिळाली ?

मी पाचे काकाजी यांच्या घरी गेलो तेव्हा ते सहपरिवार जयघोष करीत होते पण त्यांच्या परिवारात ते नवीन सेवक असल्याने जयघोष करण्यात सुसुत्रता नव्हती .. यामुळे मला माझ्या पुजेवर अभिमान झाला व मला हसु आलं .. याही पलिकडे मी त्यांना समजावुन सांगितलं नाही व गर्विष्ठ भाव घेउन आपल्या घराचा रस्ता पकडला म्हणुन मला भगवंतांनी शिक्षा दिली ... कारण ज्या गोष्टींचा मला चांगला अनुभव होता आणि माझ्या सामोर त्या गोष्टींवर पाचेजींचा परिवार एकबद्ध नव्हता ती गोष्ट मी जर त्यावेळी त्यांच्या लक्ष्यात आणुन दिली असती व माझ्या कडुन नकडत घडलेल्या गुन्ह्याची कबुली त्यांना दिली असती तर मला शिक्षा झाली नसती ..


यातुन मला शिकायला भरपुर मिळालं .. आपण कितीही ज्ञानी असा .. आपल्याला जरी वाटत वाटत असेल मी भगवंताची तनमन धनाने पुजा अर्चना करतो ... तरी दुसर्यांच्या पुजा अर्चनावर हसण्याचा मला अधिकार नव्हता ... आपल्या सामोर जर कुणी पुजापाठ करत असेल आणि त्यात जर दोष असेल तर तो दोष दुर करुन मानवधर्माच्या प्रगतीला हातभार लावणे हा माझा व प्रत्येक सेवकांचा कर्तव्य आहे ... परिस्थीती पुर्ण माहीती झाल्याशिवाय .. सत्यता जाणुन घेतल्या शिवाय माणसाने कधीही कुणावर विणाकारण हसु नये व आपले मत लादु नये ही अनमोल शिकवण मला त्या दिवशी मिळाली ...


मी जेव्हा मार्गात आलो आणि त्यागी झालो तेव्हा मला बरेच सेवक हवनकार्य पार पाडायला बोलवायचे .. मी स्वतःला ज्ञानी समजायचो .. एक अभिमानी सेवक झालो होतो पण जेव्हा सदर घटना घडली तेव्हा माझा अभिमान , गर्व सर्व वाहुन गेला आणि राहीला फक्त सेवक .


 मी असो वा दुसरा कोणताही सेवक 👉 कुणालाही उपदेश देण्याअगोदर परिस्थितीशी माणसाने अगोदर अवगत व्हावे .. परिस्थितीनुसारच कथन करावे .. कुणावरही विणाकारण हसु नये .. स्वतःची चुक नेहमी शोधत राहावी .. आपल्याजवळ दुसर्यांना देण्यासाठी जर काही असेलतर ते निस्वार्थ भावनेने कोणतेही स्वार्थ , गर्व , अभिमान जवळ न बगाळता द्यावे .. आणि हे जो करतो तोच खरा सेवक .😊


वरील लिखाण हे सत्य असुन माझ्यावर ओढावलेल्या परिस्थीतीवर आधारित आहे परंतु त्यातुन मी जे सारंश काढले आहेत ते माझ्या बुद्धी नुसार आहात तरी सदर लिखाणापासुन कोणत्याही सेवक दादा व ताईंची मने दुखली असतील तर भगवान बाबा हनुमानजी सर्वप्रथम आपण मला क्षमा करावी आणि ज्यांची ज्यांची मने दुखली असतील त्या सेवक दादा व ताईंनी सुद्धा मला क्षमा करावी ..😊🙏


धन्यवाद ....😊🙏🌹


बाबांचा सेवक 

शिव गभने .

No comments

Powered by Blogger.