PARMATMA EK- आजचा सुविचार ३ऑक्टोबर महानत्यागी बाबा जूमदेवजी यांची पुण्यतिथी |
🌄🙏 आजचा सुविचार 🙏🌄.
![]() |
| PARMATMA EK- आजचा सुविचार ३ऑक्टोबर महानत्यागी बाबा जूमदेवजी यांची पुण्यतिथी |
महानत्यागी बाबा जुमदेवजी यांनी सेवक मार्गदर्शिका व नियमावली या पुस्तिकेत उपदेश दिला आहे : सेवक बाबांनी दिलेल्या शिकवणीचे पूर्णतः स्वतः आचरण करीत असेल, तरच त्या सेवकाने मार्गदर्शन करावे, अन्यथा करू नये, कारण कथनी व करनी मधे फर्क पडल्यास जीवन धोक्यात येऊ शकते, असे सांगितले आहे,
बाबांनी स्वतः आचरण, कर्म करून कृपा प्राप्त केली म्हणूनच आम्हाला तसे कार्य दिले, ज्यामुळे आम्हाला कृपा मिळाली. म्हणजेच बाबांची कथनी व करनी सत्य आहे, म्हणून बाबा महान कर्मयोगी बनले. यामुळे बाबांना आपण सतगुरु म्हणत नाही तर महानत्यागी म्हणतो. या पदवीच्या योग्य जगात कोणी झाला नाही व होण्याची किंचितही संभावना नाही.
या पृथ्वीतलावर महान कार्य करणाऱ्यांनाच महानतेची पदवी मिळत असते. त्यांचे कार्यक्षेत्र वेगवेगळे असते. तसे आज ज्यांनी भारताच्या स्वातंत्र्यासाठी महानतम कार्य केले म्हणून त्याना महात्मा गांधीजी म्हणून संबोधले जाते.
गांधीजी कडे एक सद्गृहस्थ आपल्या मुलाला घेऊन आले, गांधीजींनी नमस्कार घेतल्यावर त्यांना येण्याचे कारण विचारले.ते म्हणाले : माझा मुलगा हा दररोज दिवसभर गुळ खात असतो, आमचे ऐकतच नाही, बापू हा आपणास आपला आदर्श मानतो. आपले मार्गदर्शन याला खूप आवडते, आपल्या शब्दावर याचा विश्वास आहे, म्हणून याला मार्गदर्शन करावे.
बापू म्हणाले : एक आठवड्यानंतर या मग काय करायचे ते सांगतो. एक आठवड्यानंतर ते बापूला भेटायला आले. बापू त्या मुलाला उद्देशून म्हणाले : तु आजपासून गुळ खायचे नाही.
मूलगा म्हणाला : हो बापू, नाही खाणार.त्याच्या वडिलाने बापूकडे आश्चर्याने बघत विचारले : बापू फक्त हे सांगण्यासाठी एक आठवड्यानंतर कां बोलावले, हे तेव्हाही सांगितले असते.
बापू म्हणाले : तुमचे म्हणणे बरोबर आहे परंतू त्या दिवसापर्यंत मी सुद्धा कधीकधी गुळ खात होतो, मग मुलाला खायला मनाई केली असती तर कथनी व करनी त फर्क पडला असता आणि माझे म्हणणे चुकीचे झाले असते. मी त्या दिवसापासून गुळ खाने बंद केलेले आहे म्हणूनच त्याला आज सांगितले आहे. असे सत्य आचरणाचे व्यक्तिमत्व असल्याने देशासाठी सत्याग्रहाचे कार्य केल्याबद्दल महात्मा ही पदवी त्याना मिळाली आहे.
आपल्या महानत्यागी बाबा जुमदेवजी यांनी स्वतः आचरणात आणून आम्हाला जुनी पुजा, जुने विचार व वाईट व्यसन, अंधश्रद्धा, अंधविश्वास, भावना, कल्पना या सर्वांच्या तावडीतून, गुलामगिरी तून मुक्त करून स्वावलंबी बनविले आहे. बाबांनी सत्याची प्राप्ती करून आपल्या समोर उभे असल्याची जाणीव करून दिली आहे.
बाबांनी कधीही, केंव्हाही, कोणाशीही खोटे व्यवहार केले नाहीत. म्हणून दैवी शक्तीला बाबांनी टिकवून ठेवले आहे.
बाबांचा उपदेश : खोटे व्यवहार केल्यास दैवी शक्ती साथ देत नाही आणि दुःख निर्माण होतात.
सुखी, समाधानी जीवन जगण्यासाठी बाबांचे आदेश सत्य, मर्यादा, प्रेम, चार तत्व, तीन शब्द, पाच नियम जीवनात पाळीन असे मी सत्य वचन देतो याला जीवनात कधीही विसरणार नाही,
🙏🏻🙏🏻 नमस्कार🙏🏻🙏🏻
🙏 सप्रेम नमस्कार दादा व ताई 🙏

Leave a Comment