परमात्मा एक माझा सत्य अनुभव
▶️ आजचा अनुभव ▶️
👇🏿👇🏿👇🏿👇🏿
⭕⭕⭕⭕⭕⭕⭕⭕⭕⭕⭕
!!भगवान बाबा हनुमानजी को प्रणाम!!
!!महानत्यागी बाबा जुमदेवजी को प्रणाम!!
!!परमात्मा एक!!
"माझा सत्य अनुभव"
""मि मार्गात येण्याचे कारण आणि मला मार्गात आलेला सत्य अनुभव सांगत आहे...
माझे नाव अमर चैतराम दिघोरे असुन मी मु.बोदरा तर साकोली जि.भंडारा येथे परिवारसह वास्तवत आहे मानवधर्म एकता परिवार गृप मध्ये या अनुभव मालिकेत हा माझा पहिला अनुभव असून मि माझे मार्गात येण्याचे कारण आणी मार्गात आलेला सत्य अनुभव सांगत आहे.
"
[झालं संसाराच वाटोळ दारू पायी ,गेला संसार वाया दारू पायी--आम्हा लागलं पीसं एका भगवंताचा दुःख दूर केले हात जोडुनी विनंती करुन]
माझ्या परिवारात आम्ही माझे आई ,बाबा, मि आणि माझ्या दोन बहिनी होत्या. आणि माझे आजी आजोबा सुद्धा होते. माझे बाबा मछली पकडायला बाहेर गावी जायचे. माझे वडील वर्षातुन एकदा किंवा दोनदा च घरी यायचे. त्यामुळे आम्हाला वडिलांचे प्रेम खुप कमी मिळालं. माझे बाबा खुप दारू प्यायचे. जेव्हा पन घरी यायचे त्यांच्या जवळचे पैसे संपेपर्यंत दारू प्यायचे आणि पैसे संपले की आईला पैसे मागायचे. आई कसी तरी मजूरी करून आम्हाच पालन करत होती. मग आई कडे पन पैसे नाही राहायचे. तर माझी आई त्यांना पैसे देऊ शकत नव्हती. मग माझे बाबा आईला खुप मारायचे. रोज घरी भांडण व्हायचे. तेव्हा मि इयत्ता सातवी वर्गामध्ये शिकत होतो. माझ्या बाबा ना घरून पैसे नाही मिडाले की ते घरचेे कोणतेही सामान नेऊन विकत होते . माझे बाबा एवढी दारू पित होते की कुठे पन पडून राहत होते. कारण माझ्या बाबांना दारुवर बाहेरची बाधा लावण्यात आली होती. तर माझ्या बाबांना दारू प्यायची खुप ललत होती. बाबांना आम्ही रोज आनायला जायचो. आणि मग आम्ही त्यांना घरी आनलो की आम्हालाच खुप मारायचे. आणि आई ला पन मारायचे. आणि आजी आजोबाना पन मारायचे. रोज आम्हाला झोपेतुन उठवुन कधी पन मारायचे.आमच्यासाठी काय रात्र आणि काय दिवस. माझी मोठी ताई इयत्ता १० वी वर्गामध्ये शिकत होती . तर तिचा अभ्यास होत नव्हता. तर आई आम्हाला घेऊन दुसऱ्यांच्या घरी झोपायला नेत होती. कारण जर आम्ही घरी झोपलो तर बाबा रात्रि उठून पैशासाठी मारहाण करायचे. या कारणाने रात्रिच आम्ही आपल्या म्हशी च्या किंवा शेळी च्या गोठयात झोपुन कशीतरी रात्र काटायचे. एवढंच नाही तर आम्ही धानाच्या कोठरीत सुद्धा झोपुन दिवस काढले . एक दिवस घरी खुप भांडण झाल तर आई आम्हाला घेऊन दुसऱ्यांच्या घरी झोपायला गेली. माझे बाबा खुप दारू पिऊन आले आणि घरच्या अंगणात पडले. आम्ही तेव्हा बाबांना दुसऱ्यांच्या घरुन बघत होतो. बाबांना आम्ही उचलून घरी नेऊ शकत नव्हतो. कारण बाबा आम्हाला मारतील याची आम्हाला खुप भीती वाटत होती. मग आम्हाला वाटल की बाबा रोजसारखे उठून घरी जातील. ते पावसाळ्याचे दिवस होते . आणि त्यादिवशी खुप पाऊस आला. तेव्हा बाबा तिथेच पडून होते. पूर्ण पाऊस बाबांच्या शरिरावर गेले. आणि जेव्हा आम्ही सकाळी उठलो तर बाबा मरून होते. घरी खूप दुःखाचे वातावरण झाले. काही दिवसांनी आई ची तबियत पण खुप खराब होऊ लागली. आईच्या उपचारासाठी खुप डॉक्टर झाले. खुप काही केल पन आईची तबियत काही ठीक होत नव्हती. आणि आम्ही सर्व आईवर अवलंबून होतो. तर आमच्यावर उपाशी राहायची वेळ आली होती. त्यावेळी आमच्या गावी वैद्य होते. त्यांनी माझ्या बाबांना उठवुन दुसऱ्या लोकांच्या शरीरावर लावले होते. मग आम्ही खुप घाबरायचो की आम्हाला पण लावेल म्हणून.. आईची तबियत ला आराम होत नव्हते. तेव्हा मी इयत्ता आठवी वर्ग मध्येच शिकत असतानाच घरची सर्व जिम्मेदारी उचलली. आणि मी बेलदारी कामावर पन्नास रुपये रोजीने मजुरी करायला जायचो. आठवड्यातून तीन दिवस शाळेत तर तीन दिवस कामावर जायचो. पन हे कधी पर्यंत चालणार होत. कारण मला माझ शिक्षण पूर्ण करायचे होते. म्हणून आम्ही परमात्मा एक मार्गात येण्याचे ठरवले. माझे काका परमात्मा एक मार्गात होते. त्यांनी आम्हाला साकोली या गावी राहत असलेले कार्येकर्ता मार्गदर्शक श्री . सारवे बाबूजी यांच्या कडे नेले. आणि आम्ही मार्गात आलो. आणि आम्हाला दिलेल्या कार्यानुसार ३ , ७ ,११ , २१ दिवसांचे असे कार्य सुरु केले. काही दिवसांनी माझ्या आईची तबियत एकदम ठीक झाली. आणि आम्ही सुखी समाधानी झालो. मी आता मला मार्गात आलेले आपले अनुभव सांगत आहे. माझे या चौथ्या महिन्यामध्ये मधे कार ने एक्सीडेंट झाल होते. मी आणि माझा मित्र सायकल ने जात असतांनी आम्हाला मागून कार ने धडक दिली. त्यात मला आणि माझ्या मित्राला खुप मार लागला होता. आम्ही हॉस्पिटल मध्ये आठ दिवस आय .सी .यु मध्ये भरती होतो. आमचे वाचणे खूप मुश्किल होते. कारण माझ्या डोक्यात रक्ति गोठली होती. आणि मला रक्ताच्या उलट्या होत होत्या. माझ्या उपचारासाठी खुप खर्च आला पण माझी तबियत काही ठीक होत नव्हती. पण शेवटी बाबा च्या नावाच्या तीर्थानी आणि ज्योतिच्या तेलानी मला जे काही माझ्या डोक्याला मार लागले होते आणि छातीला मार लागले होते ते आराम झाले. डॉक्टर ने सांगितले होते की छातीला आणि डोक्याला तान देऊ नको म्हणून पण मी सतत आठ दिवस आय.सी.यु मध्ये असतांनी मला चैन पडत नव्हतं कारण मी रिसेप्शन चे प्रोग्राम घेतले होते. पैसे पण एडवांस घेतले होते . पण माझ्या मनात श्रध्दा आणि बाबा वर एवढा विश्वास होता . कि जे डॉक्टर च्या औषधि ने नाही झाले ते माझ्या बाबा च्या तीर्थानी करून दाखविले. माझा जो मित्र होता त्याला बाहेरची बाधा होती. आणि एक्सीडेंट झालेल्या च्या दिवशी त्याची मृत्यु निश्चित होती. पण मी आणि माझ्या सोबत बाबाची दैवी शक्ति होती . कि त्या समोर तो शैतान माझे काय माझ्या मित्राला सुद्धा काही करू शकला नाही. मी धन्य आहे की माझ्या सोबतीला माझे भगवंत आहेत माझे बाबा आहेत. ज्यावेळी मी इयत्ता वर्ग आठवी मध्ये होतो. तेव्हा मला खुप गायनाचं छंद होता. कुठं पण कशाचेही कार्यक्रम असले की मी त्यांना रिक्वेस्ट करत होतो की मला गायनाचं एक चांस दया म्हणून.. माझ्यावर सर्व लोक हसत होते. पण आज माझ्या बाबांच्या कृपेने तेच लोकं पैसे देऊन माझे प्रोग्राम ठेवतात. आम्ही आपल्या जीवनात खूप हाल अपेष्टा सहन केले. आणि बाबांच्या आशीर्वादाने आता आम्ही खुप सुखी आहोत. जीवनात खुप अडचणी आल्या तरी माझे भगवंत माझे बाबा जो पर्यंत सोबतीला आहेत. तोपर्यंत मी कधीच घाबरनार नाही. आता माझा सर्व परिवार सत्य मर्यादा प्रेमाचा आचरण करतो. आणि बाबांच्या चार तत्व , तीन शब्द ,आणि पाच नियमांवर चालतो. आणि समोर पन चालत राहीन. असे मी सत्य वचन देतो. आणि सर्व सेवकांना अशी विनंती करतो. की त्यांनी सुद्धा सत्य, मर्यादा, प्रेमाचा पालन करावे. कारण परमेश्वर हा आपल्या मध्येच आहे त्याला जागृत करा. आणि एक दुसऱ्यांला सांगन्यासाठी सेवक बनु नका तर मानवाची सेवा करून खरं सेवक बना. अशी महान कृपा महानत्यागी बाबा जुमदेवजीची. मार्गात आल्यापासून आमचा परिवार पूर्णपणे सुखी समाधान आहे. एवढे बोलून मि माझ्या शब्दाना इथेच विराम देतो.
माझ्या लिहिन्यात किंवा बोलण्यात काही चूक झाली असेल तर मि भगवान बाबा हनुमानजी व महानत्यागी बाबा जुमदेवजी ला आणि मातोश्री आई वाराणसी ला माफी मागतो. तसेच सर्व सेवकाना माफी मागतो मला माफ करावे.
*🌹🙏🏻नमस्कार जी🙏🏻🌹*
============================
*सेवक :- अमर चैतरामजी दिघोरे*
*पत्ता :- मु बोदरा,त साकोली जिल्हा भंडारा*
*सेवक क्र. :-24258*
*मार्गदर्शक :-मणिरामजी सार्वे, मु.साकोली*
परमपुज्य परमात्मा एक सेवक मंडळ,वर्धमाननगर,नागपूर.
*•••••••••••••••••••••••••••••••••*
*--------------------------*
*--------------------------*
*[टिप :- वरिल अनुभवाची कुणिही काँपी करु नये, त्यापेक्षा जास्तीतजास्त शेअर करावा.]*
*भगवतकार्याच्या या गृपला जुडण्याकरिता व आपले परमेश्वरिकृेचे अनुभव सेवकांपर्यत पोहोचवीण्याकरिता खालील सेवक दादांशी संपर्क साधावा...*
*गणेश दादा बिडकर :-9766573410*
*मोहन दादा आस्वले:-9764989883*
*रोशन दादा काटेकर :-8956656210*
•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
सौजन्य :-
"अॅडमिन,सेवक,सेविका",
मानवधर्म एकता परिवार,
[Watts app group & Facebook page ,Sharchat group}
युवा आणि जेष्ठ सेवकांचा समुह,
परमपुज्य परमात्मा एक सेवक मंडळ, वर्धमाननगर, नागपुर.
©®
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
============================

Leave a Comment