आपल्या परमात्मा एक मानवधर्मातील युवा सेवक मार्गाविषयी........PARMATMA EK MAHITI

आपल्या परमात्मा एक मानवधर्मातील युवा सेवक मार्गाविषयी........PARMATMA EK MAHITI


🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

 |भगवान् बाबा हनुमानजी को प्रणाम|

 ||महानत्यागी बाबा जुमदेवजी को प्रणाम||

    ||परमात्मा एक।।      


🌻 मानवधर्म एकता परिवार व्हाट्सअप ग्रुप तर्फे दिनांक ११/११/२०२० बुधवार दिवशी घेण्यात आलेल्या चर्चा बैठकिचा  विषयावर गृप मधील आलेले विचार एकदा अवश्य वाचावे🌻

🌿🌿🌿🌿🌿🌿🌿


"आपल्या परमात्मा एक मानवधर्मातील युवा सेवक मार्गाविषयी कमी ओढ का बरं ठेवतात.? यावर पालकांनी काय उपाययोजना करायला पाहिजे."❓


 विचार क्रमांक १ :- 


             आपण या मार्गात येण्याच्या आधी दुखी होतो म्हणून या मार्गात प्रवेश केला. आणि आपले दुख दूर झाले आणि आपण परमेश्वराला विसरत जातो पन अस न करता परमेश्वराला आवडनारे कार्य करावे. पालकानी मुलाला चर्चा बैठक मधे नेले पाहिजे जेणे करुन मार्गदर्शन सेवक करतात ते एकुण त्याला वाटेल की खरोखर हा मार्ग चांगला आहे. युवा सेवक हे जो पर्यंत त्याना अनुभव येत नाही तो पर्यंत त्याला कळत नाही.


            कारण माझ्या गावात एक युवा सेवक त्याने वाईट संगत केली दारु पेली आणि दुख आले त्यावेळी तो चर्चा बैठक मधे आला आणि त्याने सांगितले की मी दारु पेली म्हणून सेवकांना विनंती आहे की संगत चांगल्या मानसाशी करावी. युवा पिढीला त्यांचे पालक कशा प्रकारे सांगतात हे महत्वाचं आहे. कारण पालकच बैठक ला येत नाही तर मुल कसे येणार म्हणूण सर्वाना विनंती आहे भगवंताला विसरु नका नाहीतर भगवंत तुम्हाला विसरल्या शिवाय रहाणार नाही.

काही चुक भुल माफ करावे.

                             
 नमस्कार........||| 


नाव:आकाश निशाने

से.नं:16196


विचार क्रमांक २ :- 


     महानत्यागी बाबा जुमदेवजींनी म्हटले आहे की, सामोर मानवधर्माला पुढे नेण्याची जिम्मेदारी युवा पिढीवर येणार आहे. मग आजचा युवा सेवक मागे का आहे..? याच कारण असे की युवा सेवकाला मानवधर्मा विषयी असलेला कमी ज्ञान आहे. किव्हा त्या सेवकाला दैवी शक्तीचे अनुभव नसावेत. दैवी शक्ती विषयी ज्ञान नसावा. दैवी शक्तीच्या महत्वाची जाणीव नसावी. त्यासाठी पालकांनी काय करावे. 


           आजचा युग हा विज्ञान तंत्रज्ञान चे युग आहे. यामध्ये मानवाने खूप प्रगती केलेली आहे. म्हणून पालकांनी आपल्या मुलांकडे लक्ष देणे खूप गरजेचे आहे. ते काय करतात के नाही. त्यांना वेळोवेळी अनुभवच्या माध्यमातून दैवी शक्तीचे माहिती देत राहावे. दैवी शक्तीचे चमत्कारिक अनुभव सांगावे. त्यांना नेहमी तत्व, शब्द, नियमांच्या माध्यमातून आपण मानवधर्माचे सेवक आहोत याची जाणीव करून द्यावी. भगवंताच्या कार्यात नेहमी तत्पर राहायला सांगावे. मुलांना नेहमी चर्चाबैठक हवनकार्यात घेऊन जावे. चर्चाबैठकीमध्ये गेल्याने मुलांना नवीन नवीन अनुभव मिळतात. त्यामधून मूल खूप काही शिकत असतात. आणि लहानपणापासून त्यांच्या मनात भगवंताविषयी गोडी निर्माण होते. म्हणून प्रत्येक पालकांनी मुलांना चर्चा बैठकीत घेऊन जायला पाहिजे.

एवढे बोलून मी माझ्या विचारांना विराम देते. लिहण्यात चूक झाली असेल तर क्षमा करावे.

बाबांचा सेवक= नंदलाल चंदनबटवे


नमस्कार........||| 




विचार क्रमांक ३ :-


        आजचा विषय युवा सेवकांसाठी अतिशय महत्वाचा असून सत्य परिस्थिती वर आधारित आहे यावर मी माझे विचार देण्याचा प्रयत्न करतो. महानत्यागी बाबा जुमदेवजी यांनी अथक परिश्रम करून २४ तास जागृत असणाऱ्या दैवी शक्तीची प्राप्ती करून मानव धर्म स्थापन केला.


        महानत्यागी बाबा जुमदेवजी यांनी आपल्याला खूप अनमोल शिकवण दिलेली आहे जी इतर कुठल्याही धर्मात मिळणार नाही. या शिकवणीमुळे मानवाला खऱ्या अर्थाने मानवासारखे जगण्याची प्रेरणा आपल्याला मिळत असते त्यासाठी त्या शिकवणीला आचरणात आणने महत्वाचे आहे.


       आता आजच्या विषयानुसार युवा सेवक मानव धर्माकडे कमी ओढ का बरं ठेवतात? या गोष्टीचे अनेक कारण असू शकतात. जसे आपण जेव्हापासून मार्गात प्रवेश करतो तेव्हापासून भगवत कार्याप्रति आपली ओढ नसणे, परिवारातील वागणूक सुद्धा याला कारणीभूत ठरू शकते, आपली संगत सुद्धा कारणीभूत ठरू शकते, कारण मार्गातील अनुभवी लोकांच्या संगतीत राहून आपण चांगले गुण शिकू शकतो, चर्चा बैठकीचा सहवास नसणे, असे बरीच कारणे असू शकतात.


     पण या सर्व गोष्टीवर मात करण्यासाठी पूढे आपल्याला आपले भविष्य उज्वल करण्यासाठी वरील सगळ्या गोष्टी करणे गरजेचे आहे. कारण महत्वाची गोस्ट म्हणजे आपण मानव धर्माचे सेवक आहोत म्हणून आपण बाबांची शिकवण आचरणात आणून कर्म केले तर यश नक्कीच मिळेल आणि त्या शिकवणीचे उल्लंघन केले तर यश मिळने सोडाच जे मिळणार होत तेही मिळणार नाही.

   आता यावर पालकांनी काय उपाययोजना करायला पाहिजे? खरतर पालकांनी आधी स्वत:च्या घरीच मुलांना मानव धर्माबद्दल योग्य ती माहिती द्यायला हवी, लहाणपणासुन मुलांना चर्चा बैठक मध्ये घेणे आपल्या सोबत घेऊन जाणे ज्यामुळे त्यांना भगवत कार्याप्रति ओढ लागेल.

   नेहमी परिवारात सेवकांत तत्व शब्द नियमांचे पालन करून मानव धर्माच्या प्रचार व प्रसार कार्यास सहकार्य केले पाहिजे.


लिहिण्यात काही चुक-भुल झाली असेल तर "भगवान बाबा हनुमानजी" व "महानत्यागी बाबा जुमदेवजी" यांना क्षमा मागतो.


🙏🏼🌹 सर्वांना नमस्कारजी...! 🌹🙏🏼


विचार क्रमांक ४ :- 


          विषय छान आहे माझे विचार ठेवण्याचा प्रयत्न करतो. ज्यांनी दु:ख काय असते ते कसे अनुभवले व त्यातुन सुटका कशी मिळणार ? स्वतःच्या जिवाची पर्वा न करता एक परमेश्र्वराची प्राप्तीसाठी महाणत्यागी बाबा जुमदेवजी परिस्थितीला सामोरे जाऊन आपल्या सेवकांना सुख हि सुख आपल्या पदरीं दिलं माझ्या बाबांनी काय केले विचार करून डोळ्यात पाणी येतं अशी जागृत कृपा आपल्या सेवकांना दिली.

           विचार आपल्याला करायचा आहे महाणत्यागी बाबा जुमदेवजी यांनी जी शिकवण दिली त्या शिकवणीचे आचरण आपल्या परीवारात होत आहे की, नाही.  माझ्यावर दु:ख होते म्हणून मी मार्गावर आले पण माझ्या मुलाला यांची जानिवच नाही दु:ख म्हणजे काय ?

        महाणत्यागी बाबा जुमदेवजी यांनी मानव जातीला जागविले आपण आपल्या परिवारास जागवायचे आहे. बाबांनी चर्चा बैठक दिली मार्गदर्शन,सेवक संमेलन, अनुभव ह्या सर्व माध्यमातून आपल्याला आपल्या परीवार जागवृन बाबांनी दिलेल्या शिकवणीचे नक्किच आजरण करेल स्वतः सुखी समाधानी होवृन नक्की एखाद्या दु:खी परीवाराला सुखी समाधानी करण्यासाठी तो मार्गदर्शन करेल असे मला वाटते.

 नमस्कार जी.........||||


लिखाणात चुकीचे झाल्यास कुणाचे मण दु:खल्यास सर्वांना क्षमा मागतो क्षमा कराल अशी विनंती करतो. नमस्कारजी 🙏

बाबांचा सेवक= अर्जुन दादा हातआगरे🙏🏻😊


विचार क्रमांक ५ :-

भगवान बाबा हनुमानजी,

    महानत्यागी बाबा जुमदेवजी यांनी मानवाचे दुःख दुर करणाऱ्या एक भगवंताची प्राप्ती करून मानवाला सुखी जीवन जगण्यासाठी कोणते कर्म (कार्य) करावे, हे समजण्यासाठी, सुखी जीवनाचे आचार-विचार धारण करण्यासाठी मानवाचा धर्म  "मानव धर्म"  स्थापन केले.

   आपण कोणतेही वस्त्र, आभूषण धारण करतो, शरीराला सजवितो. त्या वस्तूची जोपासना, सांभाळ करतो. व आवश्यक तेंव्हा धारण करतो. प्रत्येक युगात भगवंतानी मानवाला सदाचरण, सत्कर्म करुन सुखी जीवन कसे जगावे हे शिकविण्यासाठी मानव रूपात जन्म घेऊन अनुभवाव्दारे ज्ञानार्जनाची शिकविण्याचे कार्य केलेले आहे.

       आजची तरुण पिढी आधुनिक युगात प्रगती पथावर चालतांनी फक्त स्वतः भोवती, स्वतःच्या विचारानुसार, स्वतः पुरता, स्वतःला आवडेल, पसंत पडेल, या भोवतीच वावरत असतात.

    

       आजच्या परिस्थितीत कुटुंबातील लोकांनी वेळ मिळेल तेंव्हा किंवा प्रत्येक दिवशी थोडा तरी वेळ काढून, वेळप्रसंगी त्याचा मित्र, सखा, मैत्रीण, वडील, भाऊ, गुरु इत्यादी भुमिका निभवायला हवे, जेणेकरून त्याला इतरांची गरज पडता कामा नये. जेंव्हा घरीच सर्व रिस्त-नाते निभावणारे असल्यावर दुसर्‍याशी मैत्री वैगेरे करण्याची किंवा चुकीच्या लोकांशी संबंध जोडण्याची आणि वाईट संगतीत पडण्याची गरज पडणार नाही.

       

       मार्गातील सेवक सेविकांनी, आपली मुले दररोज सकाळी विनंती व सायंकाळी प्रार्थना करतात की नाही याची खबरदारी घेतली पाहिजे. कारण आजकाल कितीतरी सेवकांच्या कुटुंबातील मुलामुलींच्या विषयी तक्रारी निदर्शनास येत आहेत.

      भगवंताच्या कार्याकडे दुर्लक्ष केल्याने कल्पना रूपी शक्ती आपला प्रभाव दाखवून, मनस्थिती खराब करून, वाईट कर्म करायला प्रवृत्त करते. आणि अशावेळी वैचारिक क्रांती च्या विचारापासून दूर गेल्यावर, भगवंताचा बाबांचा, यांच्या उपस्थितीचा विसर पडतो आणि मनमानी करू लागतो. तेंव्हा दुःखी झाल्यावर कुटुंबातील सर्वांनाच भगवंताची, बाबाची, आणि भगवत कार्याची आठवण येते.


       सेवक सेविका म्हणतात, मुले ऐकतच नाही. पण आपण बाबाचे ऐकतो काय, याचा विचार कोण करणार, हे विचार करायची वेळ तरी आहे काय.

     राकेश दया सोनवाने, मु. ईर्री. हे 27 / 8 / 2000 ला आमचे (संतोष बोपचे, गोंदिया.) निवासस्थानी कार्य घेण्यासाठी आले, कुटुंबातील दुःख सांगितले, ते ऐकल्यावर त्यांना मार्गाच्या शिकवणी चे नियम, बंधन, रुपरेखा, अनुभव याविषयी पुर्ण माहिती दिली.

     त्यांनी त्याचे वडील दारू पितात म्हणून त्याच्याशी संबंध तोडून मार्गात येण्याचे निर्णय घेतल्याचे सांगितले.

     त्यांचे लहान 3 मुले (2 ते 5 वर्षे दरम्यान वयाचे) सकाळ पासून सायंकाळ पर्यंत आई, वडील, आजी यांच्या पेक्षा जास्त वेळ - संपुर्ण वेळ आपल्या आजोबा सोबतच रहायचे, जेवायचे, झोपायचे. म्हणून त्यांनी विचारले कि, आपण दारू पिणाऱ्यांसोबत संबंध ठेवायचे नाही, मग या मुलांना त्यांच्या पासून दूर कसे ठेवायचे ?

       त्याना विचारले "तुम्ही मुलांना त्यांच्यापासून दूर ठेवू शकता काय?" त्यांनी नाही म्हटल्यावर आम्ही त्यांना भगवत कृपेचे काही अनुभव व विचार दिल्यानंतर सांगितले भगवंताला सोबत घेऊन जात आहात. "बाबा हनुमानजी" हे शब्द म्हणत घरी जा आणि आता समोर भगवान काय घडवितो, ते तुम्हीच बघा, आणि 11 दिवस कार्य घडवून 12 व्या दिवशी समाप्त करून कार्य घ्यायला, तेंव्हा सांगा.  कार्य समाप्ती करून आले. तेंव्हा ते म्हणाले, येथून आम्ही घरी गेलो तेंव्हा पासून ते ज्यांच्या पासून दूर राहत नव्हते त्या आजोबांना "तुझी वास येते, तुझ्या जवळ नाही येत" असे म्हणून येथून गेल्यावर त्यांच्या जवळ जातच नाही.

     

      जर सेवकांचे मुले-मुली ऐकत नसतील तर आपण बाबांची ऐकतो काय याचा विचार करा आणि तुम्ही बाबांची ऐकाल तर मुलेही तुमची व बाबांची ऐकून चालतील. आणि जर आपली नाही ऐकत, तर भगवंताला सांगा. वर अनुभव सांगितल्याप्रमाणे  भगवंत त्यांना सद्बुद्धी देईल, या करीता कुटुंबात दया, क्षमा व शांतीचे विचार व आचरण करून  तसे कुटुंबात वातावरण निर्माण करावे लागेल. तेंव्हाच कुटुंबात व सेवकात सत्य, मर्यादा व प्रेमाचे आचरण करून ईच्छानूसार भोजन म्हणजे ईच्छा पुर्ती होवून संपूर्ण कुटुंबाला सुखी व समाधानीचे जीवन जगता येईल. यासाठी बाबांच्या आदेशाचे म्हणजे सकाळची विनंती, सायंकाळची प्रार्थना व हवन कार्य तसेच चर्चा बैठक चा लाभ घेवून बाबांचे आदेश पाळावे लागेल.  मी बाबांचे आदेश, सत्य, मर्यादा, प्रेम, चार तत्व, तीन शब्द. पाच नियम जीवन पाळीन असे मी सत्य वचन देतो याला जीवनात कधीही विसरणार नाही.


🙏 सर्व सेवक व सेविका सेवकांना संतोषकुमार एम. बोपचे चा सप्रेम नमस्कार जी. 🙏

         

[टिप :- वरिल विचार कुणिही काँपी करु नये, त्यापेक्षा जास्तीतजास्त शेअर करावा.]


      भगवतकार्याच्या या गृपला जुडण्याकरिता व आपले परमेश्वरिकृेचे अनुभव सेवकांपर्यत चर्चा बैठकी चा लाभ व प्रश्न मंजुषा मध्ये पोहोचवीण्याकरिता खालील सेवक दादांशी संपर्क साधावा...


  गणेश दादा बिडकर :-9766573410

  मोहन दादा आस्वले:-9764989883

  रोशन दादा काटेकर:-8956656210

•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••


सौजन्य :-

"अॅडमिन,सेवक,सेविका",

मानवधर्म एकता परिवार,

[Wats app group & Facebook page}

युवा आणि जेष्ठ सेवकांचा समुह,

परमपुज्य परमात्मा एक सेवक मंडळ, वर्धमाननगर, नागपुर.

©®


••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••

No comments

Powered by Blogger.