PARMATMA EK MANVI ANUBHAV | परमात्मा एक अनुभव

                       ▶️आजचा अनुभव


PARMATMA EK MANVI ANUBHAV |  परमात्मा एक अनुभव
PARMATMA EK MANVI ANUBHAV | परमात्मा एक अनुभव


⭕⭕⭕⭕⭕⭕⭕⭕⭕⭕⭕

 

 !!भगवान बाबा हनुमानजी को प्रणाम!!     

  !!महानत्यागी बाबा जुमदेवजी को प्रणाम!!       

            !!परमात्मा एक!!               


                      "माझा सत्य अनुभव"


माझे नाव सचिन वामनजी कावळे असुन मी मु.राजोला तर.कुहि जि.नागपुर येथे परिवारसह वास्तवत आहे व आज मी "माझा अनुभव" मानवधर्म एकता परिवार गृपचा या अनुभव मालिकेत माझा पहिला अनुभव 'मार्गात आल्यानंतर चा दैवी शक्तीचा अनुभव' सादर करीत आहे.


आम्ही मार्गात येण्याच्या अगोदर माझ्या कुटुंबात एकूण ८ सदस्य राहत होते. आई-वडील, आम्ही ३ भाऊ आणि ३ बहीण असा आमचा मोठा परिवार होता. मार्गात येण्याच्या आधीच मोठया भावाचे आणि मोठया बहिणीचे लग्न झाले होते. नंतर माझ्या दुसऱ्या थोरल्या बहिणीवर खूप दुःख आले आणि माझ्या भावाला २ वर्ष झाले तरी काहीही मूल बाळ झाले नाही. माझ्या वहिनीला सुद्धा बाहेरच लावलेलं होते. तेव्हा माझ्या भावाची खूप इच्छा होती की आपण मार्गात प्रवेश करूया. परंतु माझी आई ही गुरुमाऊली यांची भक्त होती. त्यामुळे आई मार्गात येण्यास नकार द्यायची. परंतु मुलीच्या जीवसाठी आई-वडील मार्गात येण्यास तयार झाले. तेव्हा आम्ही कार्यकर्ते काकाजीकडे जाऊन आमची सर्व आपबिती सांगितली आणि कार्याला सुरुवात केली.


मार्गात प्रवेश करण्याच्या आधीच माझ्या भावाला मुलगी झाली होती. त्या छोट्याश्या मुलीवर सुद्धा तांत्रिकाने वैद्यवानी लावली होती. मार्गात आल्यावर ती पण छान खेळू लागली. नंतर आम्ही तिच्यासाठी नामकरण सोहळा ठेवला. तेव्हा आम्ही मार्गात नुकतेच आलो होतो. तर झाले असे की ज्या दिवशी नामकरण चा कार्यक्रम होता त्या दिवशी आमच्याकडे आमचे नातेवाईक आले. तसेच माझी मावशी आणि काकाजी सुद्धा आलेले होते. माझ्या काकाजीना दारूचे व्यसन होते. जेव्हा नामकरण कार्यक्रम सुरू झाले तेव्हा ती छोटीशी मुलगी खूप रडत होती. आम्ही तिला खूप समजवण्याचा प्रयत्न करीत होतो. परंतु ती कोणा जवळच राहत नव्हती. कारण माझे काकाजी हे दारू पिऊन त्या कार्यक्रमात आले होते. परंतु ही चूक कोणाच्याच लक्ष्यात येत नव्हती. 


तेव्हा काही वेळाने आमची चूक आमच्या लक्षात आली की काकाजी दारू पिऊन आहेत. म्हणून मग लगेच आम्ही कार्यकर्ते काकाजीना फोन केला आणि त्यांना सर्व हकीकत सांगितली. तेव्हा त्यांनी सांगितले की भगवंता समोर ज्योत लावून माफी मागा आणि तीर्थ बनवून बाळाला पाजून द्या आणि शरीराला लावून द्या. काकाजीनी सांगितल्याप्रमाणे आम्ही तसेच केलं, तेव्हा ती शांत झाली आणि झोपी गेली. पूर्ण कार्यक्रम आटोपत पर्यंत तिनी आम्हाला काहीच त्रास दिला नाही आणि आज ती पहिल्या वर्गात शिकत आहे.


तसेच एक छोटंसं अनुभव माझ्या दुसऱ्या थोरल्या भावाचं सांगू इच्छितो. माझा भाऊ हा गोंदियाला राहतो. पुष्कळ वर्षांपासून तो बाहेर राहायला गेला आणि त्याचं लग्न होयपर्यंत तो फक्त शब्दावर होता. २०१४ या वर्षी त्याच लग्न राजोला वरून झालं. पहा सेवकांनो आपल्या मार्गात शब्दाला किती महत्त्व दिले आहे! थोडक्यात सांगतो, भावाचे लग्न झाले आणि २ ते ४ दिवसांनी माझ्या भाऊजीनी सहज माझ्या वहिनीची गम्मत केली की माझी मुलगी आणि माझा मोठया भावाची मुलीला गोंदियाला शिकण्यासाठी पाठवू. तेव्हा लगेच माझ्या नवीन वहिनीने माझ्या भाऊजीला म्हंटले की बाप्पा-बाप्पा मग तर आम्हाला मुलं करण्याची काही गरजच नाही पडणार.


पहा सेवकांनो हे शब्द बाबाला आवडले नाही. खरोखरच लग्नाला अडीच वर्षे होऊन सुद्धा माझ्या भावाला मुलं बाळ झाले नाही आणि माझ्या भावांनी मुलं बाळ होण्यासाठी खूप पैसा खर्च केला. कमीत कमी ५० ते ६० हजार रुपये खर्च केले. तरी सुद्धा आराम काहीच नाही. कारण बोलण्यात चूक झाली होती. त्या चुकीकडे कोणाचे लक्ष्यच नाही. काही दिवसांनी ही चूक माझ्या मोठया भावाच्या लक्षात आली आणि एके दिवशी माझ्या मोठ्या भावाने त्यांना गावी बोलावले आणि मार्गदर्शक साहेबांना घरी बोलावून माझ्या वहिनीला सर्व हकीकत विचारली. झालेल्या चुकीची माफी मागायला लावली आणि त्यांचे कार्य गोंदियातून आहेत त्यांना सुद्धा माफी मागायला लावली. तेव्हा माझ्या वहिनीला काही दिवसानंतर मुलगा झाला तो आता ६ महिन्याचा आहे. बघा, एका छोट्याशा शब्दांमुळे किती दुःख सहन करावे लागतात. हे आम्हाला ह्या अनुभवातून समजून आले.


ह्या २ महिन्यात मला आलेला अनुभव सांगू इच्छितो. मी मौदा आश्रम या ठिकाणी रात्रीला सेक्युरिटी गार्ड ची नोकरी करतो आणि दिवसाच्या वेळेस पार्ट टाइम इन्शुरन्स ऑफिस मध्ये नोकरी करतो. अचानक एक दिवस माझ्या कडे १०५० रुपये होते आणि मला १००० रुपये बँकेत डीपाँझिट करायचे होते. तेव्हा मी पैसे घेऊन SBI च्या एटीम मध्ये गेलो. तेव्हा मी पैसे एटीम मध्ये टाकले. तिथून ८०० रु. एटीम मध्ये जमा झाले आणि २०९ रु. वापस आले. मी ३ वेळा प्रयत्न केले तरी सुद्धा ते पैसे जमा होत नव्हते. कारण बाबा माझी परीक्षा घेत होते. तेव्हा मी २०० रुपये खिशात ठेवले आणि ऑफिस मध्ये परत आलो नंतर काही वेळानंतर माझे जेष्ठ मार्गदर्शक श्री. शंकरजी ढोमने आणि त्यांच्यासोबत सेवक श्री. दिलीप वैद्य हे आश्रम मध्ये आले होते. तेव्हा त्यांचा मला फोन आला आणि ते मला विचारू लागले की, "सचिन तू कुठे आहे?" मी म्हंटल, "ऑफिस मध्ये आहे." जेव्हा ते माझ्याकडे आले मी त्यांना म्हंटल की, "चला आपण चहा वैगरे घेऊ."


तेव्हा त्यांनीच मला म्हंटल की, "चहा वैगरे नाही घेऊ. आपण नाश्ता करू." आमचे मार्गदर्शक काकाजी हे कोणाकडूनच चहा किंवा नाश्ता करत नाही. पण बाबांची कृपा, मग आम्ही एका हॉटेल मध्ये गेलो आणि नाश्ता वैगरे खाल्ले आणि ९५ रुपयांच बिल निघालं. जेव्हा मी बिल द्यायला गेलो तेव्हा माझा लक्ष्यात आले की माझ्या जवळ ५० रु. राहिले होते. म्हणूनच माझे २०० रुपये एटीम मध्ये जमा झाले नाही. तेव्हा मला खूप आनंद वाटला की खरच बाबा हे कोणावरच संकट येऊ देत नसतात. ह्या अनुभवाचा उद्देश म्हणजे की, भगवंताला माहीत होते की आपलेच सेवक दादा यांच्याकडे येणार आहेत आणि याला पैश्याची गरज नक्कीच पडणार आहे. म्हणून सेवकांनी कोणतेही कार्य करतांना विचार करूनच केले पाहिजे आणि तत्व, शब्द, नियमाने वागले पाहिजे. मी पण तत्व, शब्द नियमाणेच वागेल.


लिहिण्यात काही चुक-भुल झाली असेल तर "भगवान बाबा हनुमानजी" व "महानत्यागी बाबा जुमदेवजी" यांना क्षमा मागतो.


नमस्कार...!


नाव :- सचिन वामनजी कावळे

पत्ता :- मु./पो. राजोला, ता. कुही, जि. नागपूर

सेवक नंबर :- ३१२८८

मार्गदर्शक :- श्री. शंकरजी ढोमने

परमपुज्य परमात्मा एक सेवक मंडळ,वर्धमाननगर,नागपूर.


 •••••••••••••••••••••••••••••••••

 --------------------------

 --------------------------

[टिप :- वरिल अनुभवाची कुणिही काँपी करु नये, त्यापेक्षा जास्तीतजास्त शेअर करावा.]


 भगवतकार्याच्या या गृपला जुडण्याकरिता व आपले परमेश्वरिकृेचे अनुभव सेवकांपर्यत पोहोचवीण्याकरिता खालील सेवक दादांशी संपर्क साधावा...


 गणेश दादा बिडकर :-9766573410

 मोहन दादा आस्वले:-9764989883

 रोशन दादा काटेकर :-8956656210

•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••


सौजन्य :-

"अॅडमिन,सेवक,सेविका",

मानवधर्म एकता परिवार,

[Watts app group & Facebook page ,Sharchat group}

युवा आणि जेष्ठ सेवकांचा समुह,

परमपुज्य परमात्मा एक सेवक मंडळ, वर्धमाननगर, नागपुर.

©®


••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••

No comments

Powered by Blogger.