स्वतःची कर्मपूजाचं कामाची.. मानवी अनुभव PARMATMA EK ANUBHAV

          स्वतःची कर्मपूजाचं कामाची.. मानवी अनुभव PARMATMA EK ANUBHAV 

           

           माणसाला योग्यरीतीने जगण्यासाठी काही कर्तव्य करावी लागतात. याला फलप्राप्ती म्हणत नाही. संसारी माणसाने देवपूजा करणे, मुल असतील तर त्यांना पोटभर जेवू घालणे, कपडालत्ता देणे व शिक्षण देणे, दारी आलेल्या साधारण अतिथीला जेवू घालणे हे त्याचे कर्तव्यच आहे. आवर्जून म्हणून जे केले जाते त्याला फल प्राप्ती नाही. व्यवहार म्हणून हे करावेच लागते.



Parmatma ek image,
स्वतःची कर्मपूजाचं कामाची.. मानवी अनुभव PARMATMA EK ANUBHAV 


    ज्या गोष्टींमध्ये लोभ, स्वार्थ, हित काहीही नसेल, त्या कर्तव्याला फलप्राप्ती आहे. जेव्हा माणूस,मनुष्य म्हणून जगायला लायक होतो, तेव्हाच त्याच्या हातून निःस्वार्थ व निर्हेतुक कर्तव्ये होऊ शकतात. कोण त्याही कामामध्ये स्वार्थ नको, लबाडी नको, हेतू नको. तरच पुण्यसंचय होऊ शकतो. सहेतुक व्यवहारात पुण्यसंचय होत नाही. मात्र दान करण्यामध्ये फलप्राप्ती आहे. मग हे दान सहेतुक असो या निर्हेतुक असो. दान करण्यामध्ये कोणताच स्वार्थ किंवा व्यवहार गुंतलेला नसतो म्हणून त्याची फलप्राप्ती आहे.


       श्रीमंती व गरिबी प्रत्येकाला त्याच्या कर्माप्रमाणे मिळते. आजकल लोकांना खरा धर्म समजत नाही. कोणत्या कर्माची काय फलप्राप्ती होते तेही समजत नाही. सर्वजण सांभ्रमात पडलेले दिसतात. त्यामुळे कर्तव्यातूनही फलप्राप्तीची अपेक्षा केली जाते व फलप्राप्ती न झाल्यामुळे निराशा पदरी पडते. त्यातूनच देवाला दोष दिला जातो. 

         मनुष्याच्या जीवनात प्रारब्ध व पुरुषार्थ ही दोन महत्वाची अंगे असतात. काही कर्माचे फल लांबणीवर पडून पुढे केव्हातरी ते प्रयत्नाशिवाय किंवा अप्रत्यक्षपणे मिळते त्याला दैव किंवा प्रारब्ध असे म्हणतात. हे दैव किंवा प्रारब्ध ज्याच्या त्याच्या कर्मावर अवलंबून आहे. धर्म न मानणाऱ्या लोकांना देखील आपल्या कर्माचे फल हे मिळतेच. धार्मिक अधिष्ठान असल्यास सर्वच बाबतीत सौख्य लाभते. सौख्य म्हणजे जिभेला रुची असणे, अन्नाची चव चांगली लागणे, आपण खालेलं अन्न कुठलाही शारीरिक त्रास न होता चांगले पचणे व त्यापासून आपल्याला समाधान मिळाले की त्याला सौख्य असे म्हणतात. भरपूरे दागदागिने उंची कपडे म्हणजे सौख्य नव्हे. घरात सुबत्ता आहे. म्हणून खायचे आणि पचले नाही म्हणून औषध घ्यायचे हे सौख्य नाही. घरात सर्वांना एकमेकांशी प्रमाणे व आपुलकीने वागणे, एकमेकांशी काळजी घेणे याला सौख्य म्हणतात. शरीरसौख्य नसेल तर आर्थिक व मानसिक सौख्य ही लाभत नाही. 


                 माझी आई मला लहानपणी सांगत होती की 'हट्टानी काम करावे आणि भाग्यानी, खावे' आज मी भाग्यानी 'मानव धर्माचा सेवक बनलो व माझे तुमचे जीवन, सफल झाल्यासारखे वाटत आहे. गेल्या एकोणसत्तर वर्षापासून एक महान आत्म्याची चैतन्यमय शक्ती कार्य करत असून, कलियुगाची घोर काळीमा दूर करत असून 'सत्युगात पाऊल टाकणारा अवतरित आध्यात्मिक महापुरुष म्हणजे महानत्यागी बाबा जुमदेवजी चा मार्ग मानव धर्म परम पूज्य परमात्मा एक सेवक मंडळ, वर्धमान नगर, नागपूरचे संस्थापक व आम्हा सगळ्या सेवकांचे सद्गुरु महान त्यागी बाबा जुमदेवजी ने मानव धर्मात समाजातील लोकांच्या अंधश्रद्धा निर्मुलन, व्यसनमुक्त समाज तसेच आदर्श मानव घडवून, सुखी जिवन जगण्याची प्रेरणा देणारे, दुःखी गरीब व अज्ञानी मानवाला एका भगवंताचा परिचय करुन दिला.  


            दुःखी, कष्टी, अंधश्रद्धेने ग्रासलेल्या तसेच व्यसनाधीन व्यक्तिचा कुटुंबातील दुःख दूर करण्याकरिता औषधोपचार तांत्रिक-मांत्रिकाचे नानाविण प्रयत्न करुनही त्यांचे दुःख नाहीसे न झाल्यामुळे ते या मार्गोवर येऊन महान त्यागी बाबा जुमदेवजी यांचे मार्गदर्शनाने व बाबांनी दिलेल्या चार तत्व, तीन शब्द व पांच नियमांचे आपल्या गृहस्थी मध्ये पालन केल्यामुळे त्यांच्या कुटुंबात असलेल्या दुःख नाहिसे होऊन त्यांना सुख समाधानी मिळालेली आहे व ते आपले जीवन समाधानाने जगत आहेत. 'मानव धर्म' मार्गात मानवानी मानवा सारखे वागावे आणि जनसेवा हीच ईश्वर सेवा आहे, हे ह्याच मार्गाद्वारे सत्य ठरल्या गेले आहे. बाबांचे अनेक आत्मा अनुभवातून एका प्रसंगी दुसऱ्या दिवशी म्हणजे सहाव्या दिवशी दिनांक २५ ऑगस्ट १९४८ रोजी बाबा गुंगीतच असल्यामुळे घरच्या लोकांनी हवन करुन कार्याची समाप्ती केली. 


            हवन समाप्त होताच बाबांचे ब्रम्हांड चढले व ते पुन्हा निराकार अवस्थेत आले. त्यावेळी बाबाच्या मूख कमलातून उद्गार निघाले की, मैं सबका एक भगवान हूँ! सेवक, मुझे कहा ढूंढ रहा है! मैं चौबीस घंटे तेरे पास हूँ। जो क्षण में तुझसे छूट जाऊंगा, तेरा शरीर मृत हो जायेगा। काही वेळाने पुन्हा उद्गार निघाले की, हे सेवक मैं भगवान हूँ। तू मानव हैं! मैं जानता हूँ, मानव यह बेईमान है। उनमें से तू एक मानव है। भले ही तूने मुझे प्राप्त किया, मैं भगवान हूँ। मैं मानव पर कदापि ही विश्वास नहीं करता! तेव्हां बाबांनी भगवंता जवळ प्रतिज्ञा केली की, हे भगवान मैं जिवन में इमान रखूंगा और सत्य निष्काम सेवा करुंगा, ऐसा आपको सत्य वचन देता हूँ। अश्याप्रकारे बाबांनी परमेश्वरी कृपा प्राप्त करण्याकरिता चार तत्व, तीन शब्द पांच नियमाद्वारे मार्गात येणाऱ्या दुःखी, कष्टी लोकांनी ह्या तत्वाचे पालन केल्यास त्यांचे दुःख पूर्णतः नष्ट होऊन त्यांना समाधानी प्राप्त झाली आहे. देणे जरुरी आहे. स्वतःला इतके मजबूत बनावे की कुणासही बोलण्याची आवश्यकता नसावी. 


           बाबाने सांगितले त्याप्रमाणे भविष्यात घटना घटित होत आहे. म्हणजे परमात्मा एकचा मानव धर्म मार्गात लाखों सेवकांना सचेल केले आहे. बाबांनी पुढे तुफान-तुफानच येण्याचे संकेत आहे व पुढचे पाऊल सेवकांनी सांभाळून टाकून 'सत्य- मर्यादा-प्रेमाच्या व्यवहारानी देशांत सत्य निर्माण होईल. हेचतर आहे 'कर्म पूजा' बनून राष्ट्रात सत्यांचा झेंडा लावणे आवश्यक आहे. बघा! नैसर्गिक वातावरण जंगल, पहाड, प्राकृतिक मुळे आपणं सारखे सारे जग आहे, आपणापासून प्राकृतिक वातावरण नाही. अहं भाव मुळे सगळीकडे वातावरण बादलत चालले आहे, महाविनाश नाही तर महाविनाश! जगाला ग्लेशियर बर्फामुळे तर फारच धोका वाढत आहे. असे न हो कि सगळं काही समाप्तचं होऊन जाणार! म्हणून बाबांनी 'मानव धर्मात सांगितले 'चार तत्व, तीन शब्द, पांच नियमाची बाराखडी आणि सत्य-मर्यादा प्रेमाचाचं व्यवहार मानव जातील वाचवू शकते आणि जगाचे कल्याण होऊ शकते. असे आमचे व जगाचे कल्याण करणारे, छत्तीस कोटी देवतापासून फक्त एका परमात्याचे दर्शन करुन सेवकांना मुक्तीचा मार्ग दाखविणारे आमचे सगळ्यांचे सद्गुरु 'महान बाबा जुमदेवजी कोटी-कोटी प्रणाम! आणि बाबा इस धरती पर जब तक सूरज चांद रहेगा, बाबा तेरा नाम रहेगा...! 



Video Anubhav clips :- 












No comments

Powered by Blogger.