Parmatma ek Anubhav

 ▶️आजचा अनुभव :- 


👇🏿👇🏿👇🏿👇🏿

Parmatma ek Anubhav
Parmatma ek Anubhav




⭕⭕⭕⭕⭕⭕⭕⭕⭕⭕⭕



*भगवान बाबा हनुमानजी को प्रणाम!!*

*महानत्यागी बाबा जुमदेवजी को प्रणाम!!*

           *परमात्मा एक!!*


     *"माझा सत्य अनुभव"*


*[क्रिकेटच्या सट्ट्याच्या नादापाई झालो होतो बेजार, परमात्मा एक मानवधर्मात येताच मिळाला भगवत शक्ति चा आधार]*


माझे पुर्ण नाव सचिन लक्ष्मणराव भोयर असुन मी टाकळघाट ला राहतो.माझा मानवधर्म एकता परिवार या भगवतकार्य च्या गृपवर "माझा सत्य अनुभव" या अनुभव मालिकेत हा माझा पहिला अनुभव आहे.

 

मार्गात येन्याच्या जवळ पास पाच ते सहा महिन्या अगोदर ची गोष्ट आहे. माझ्या घरा जवळ म्हनजे माझ्याच अंगणात शेजारच्या मुलीचा साक्षगंध चा कार्यक्रम होता.मी त्या दिवशी दुकानामध्ये होतो. (माझे चप्पल-जुत्याचे दुकान आहे)माझी आई दुकानात आली व मला म्हनु लागली की आपल्या अंगणात सगाई चा कार्यक्रम आहे.तो आता सुरू होनार आहे .सर्व पाहुणे आले व समाजातील लोक सुध्दा आले.तर तु तीथे जा माझ्या आईच्या सांगण्यावरुन मी कार्यक्रमाला गेलो.


माझा मुलगा व मी माझ्या च घराच्या वट्यावर बसलो होतो. माझ्या मुलानी मला पाणी मागीतले शेजारच्या वक्ती ने पाणी दिले. जसा माझा मुलगा पाणी प्यायला तसेच त्याने पाणीथोडे बाहेर काढले. मी त्याचे हावभाव पाहुन घराच्या आतमध्ये घेऊन आलो.पाहतो तर काय माझ्या मुलाचे डोळे पुर्ण पांढरे झाले होते.डोळे पुर्ण फिरवून टाकलेले होते. हात पाय पुर्ण हेकडे वाकडे झाले होते. ते पाहून मी खुप घाबरलो मी ज्या देवांना मानायचो त्याची आराधना करायला लागलो.माझ्या पत्नी ला आतमध्ये बोलावून घेतले माझी पत्नी पन घाबरली आता काय करायचं विचार पडला माझ्याचं अंगणात सगाई चा कार्यक्रम आम्ही मागच्या दारवाज्याने दोघे ही पती-पत्नी मुलाला घेऊन धावत-धावत बिना चप्पलानी बस स्टॉप कडे पळत सुटलो माझे दुकान जिथे कीरायाने होते ते घर मालक यांनी आपली मोठी गाडी काढली व दवाखान्यात बुटीबोरीला निघालो.


दवाखान्यात जात अस्तानी ते मला म्हणाले की एक गोष्ट सांगू का मी म्हटलं सांगा ते म्हनत होते. तुझ्या घरा जवळ एक व्यक्ती आहे. तो चांगला जानता आहे. मी ऐकल्यावर मी विचारात पडलो. कारण त्या व्यक्तीने माझ्या मुलाला पाणी दिले होते. दवाखान्यात गेलो काही वेळाने सुट्टी झाली. माझा मुलगा बरा झाला आम्ही दोघे पती पत्नी वापस घराकडे निघालो.


माझे बहीण-जावई हे नागपुर राहतात. ते तीन चार महिन्या पुर्वी परमात्मा एक मार्गात जुडले होते. मला या मार्गा विषयी जास्त माहिती नव्हती पन या मार्गात जादु टोना चालत नाही हे मला माहीत होते. मी माझ्या पत्नीला सांगितले आपण परमात्मा एक मार्ग घेवू कारण आपण शुंन्यातुन वर आलेलो आहे. आपली तरक्की पाहुन काही जळनखोर लोक नुकसान पोहचवत आहे. म्हणून या वर अंतिम उपाय मार्ग घेने आहे.यावर माझ्या पत्नीने होकार दिला पण सहा महिने जवळ पास होवुन गेले. पण आम्ही मार्ग घेतला नाही.


 मे महिना २०१५ ची गोष्ट आहे. मला दारु,सट्टा क्रिकेट मध्ये पैसे लावण्याचा खुप शौक होता. मी आय.पी.एल मध्ये दीड लाख रूपये जवळ पास हरलो पैसे हारायचो घरी जाऊन दारु प्यायची असे जवळ पास २४ ते २५ मे ची गोष्ट आहे. माझ्या दिमाखात अचानक परमात्मा एक मार्गाची भान आली मी मोबाईल मध्ये परमात्मा एक सर्च करायचो तेव्हा भगवान बाबा हनुमान जी चे चीत्र दिसायचे महानत्यागी बाबा जुमदेवजीचे व वाराणसी आईचे चीत्र यायचे मनो दादा ठुब्रीकर यांची प्रस्तावना यायची तेव्हा माझ्या मनात परमात्मा एक मार्ग घ्यायचे ठरले पण त्या आधी मी भगवंता ला शब्द ठेवला की भगवान बाबा हनुमान जी माझे मॅच मध्ये हरलेले पैसे निघाले पाहिजे तर मी मार्गात येईल मोबाईल मध्येच पाहूनच शब्द ठेवला.तेव्हा सेमी फायनल व फायनलच्या मॅच बाकी होत्या मी सेमी फायनल मध्ये ५० हजार रुपये लावले.त्यात हार जीत होता होता .काही पैसे जिंकले नंतर परत ५० हजार रुपये लावले. त्यात त ही पैसे कव्हर झाले. मग शेवटची मॅच होती चैनई- मुंबई फायनल मॅच त्या मध्ये मी मुंबई कडुन एक लाख रुपये लावले. हरलो तर एक लाख देने होते व जिंकले तर 80 हजार रुपये मिळणे होते. फायनल मॅच मी मी कोणतेही टेन्शन न घेता जिंकली व माझे हरलेले पुर्ण पैसे निघाले. तेव्हा मी एका भगवंता ची शक्ती ओळखली व परिवारचे मन पंक्के करून गावातील सेवक उमरावजी जाधव यांच्या माध्यमातून मार्गदर्शक विष्णूजी ठवकर काकाजी (बीड गणेशपुर) यांचे कडुण परमात्मा एक मार्गात जुन २०१५ला मार्गात प्रवेश केला आणि मार्गदर्शक यांचे शब्दांवर चांगले कार्य केले. कालांतराने सर्व सुखसमाधानी लाभल्यावर मी त्याग घडविला व त्याग व्यवस्थित झाला व नंतर मासिक आठ हवन पार पाडले व नव्वे हवन २० ऑगस्ट २०१९ मध्ये पार पडले व आता आम्ही सुखाने समाधानी जीवन जगत आहो.


माझ्या लीहीन्या मध्ये काही शब्द चुकले तर भगवान बाबा हनुमान जी ला तसेच महानत्यागी बाबा आणि वाराणसी आईला माफी मागतो व सर्व सेवक दादा व सेविका ताईला क्षमा मागतो.


नमस्कार सर्वांना.


•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••


*सेवकांचे नाव:- सचिन लक्ष्मणराव भोयर* 

*सेवक नंबर :- ४४६८१*

*पत्ता :- मु.पो.टाकळघाट त.हींगणा जि.नागपूर* 

*मार्गदर्शक:- माजी. विष्णूजी ठवकर*

*आजी.सर्यभानजी नेवारे रा.चिचभवन*

परमपुज्य परमात्मा एक सेवक मंडळ,वर्धमाननगर,नागपूर.


*•••••••••••••••••••••••••••••••••*

*अनुभव लेखन व संकलन:-सचिन दादा भोयर*

*--------------------------*

*--------------------------*

*[टिप :- वरिल अनुभवाची कुणिही काँपी करु नये, त्यापेक्षा जास्तीतजास्त शेअर करावा.]*


*भगवतकार्याच्या या गृपला जुडण्याकरिता व आपले परमेश्वरिकृेचे अनुभव सेवकांपर्यत पोहोचवीण्याकरिता खालील सेवक दादांशी संपर्क साधावा...*


*गणेश दादा बिडकर :-9766573410*

*मोहन दादा आस्वले:-9764989883*

*रोशन दादा काटेकर :-8956656210*

•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••


सौजन्य :-

"अॅडमिन,सेवक,सेविका",

मानवधर्म एकता परिवार,

[Watts app group & Facebook page ,Sharchat group}

युवा आणि जेष्ठ सेवकांचा समुह,

परमपुज्य परमात्मा एक सेवक मंडळ, वर्धमाननगर, नागपुर.

©®


••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••

No comments

Powered by Blogger.