"परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ नागपूर येथे दरवर्षी होणाऱ्या १५ नोव्हेंबर वार्षिक जनरल हवनकार्य चे काय महत्व आहे .

 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

*|भगवान् बाबा हनुमानजी को प्रणाम|* 

*||महानत्यागी बाबा जुमदेवजी को प्रणाम||*

*||परमात्मा एक।।*



🍃🍃🍃🍃🍃🍃🍃🍃

*🌻 मानवधर्म एकता परिवार व्हाट्सअप ग्रुप तर्फे दिनांक १५/११/२०२१ सोमवार दिवशी घेण्यात आलेल्या चर्चा बैठकिचा  विषयावर गृप मधील आलेले विचार एकदा अवश्य वाचावे🌻*

🌿🌿🌿🌿🌿🌿🌿


*➡️"परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ नागपूर येथे दरवर्षी होणाऱ्या १५ नोव्हेंबर वार्षिक जनरल हवनकार्य चे काय महत्व आहे❓*


*विचार क्रमांक १*


आजच्या विषयावर मी माझे अल्पबुद्धिने विचार सादर करण्याचा प्रयत्न करीत आहे,

आजचा विषय छान आहे

मानवधर्माचे संस्थापक महानत्यागी बाबा जुमदेवजीनी यांनी अहोरात्र परिश्रम करून 'मानव धर्म' स्थापन केला व या  स्वार्थी दुनियेत भटकत असलेल्या मानवाला एका परमेश्वराचा चा मार्ग दाखवला

 व आमचे सद्गुरु  इतेच थांबले नाहीत तर त्यांनी जसे जमेल तसे अहोरात्र परिश्रम करू समाजातील दुःखी कष्टी नर नारी ला दुःखातून मुक्त करण्याचे कार्य केले.

महानत्यागी बाबा जुमदेवजीना मिळालेल्या मंत्रा द्वारे विधी आणि साधना करून बाबाने भगवान बाबा हनुमान जी ची कृपा प्राप्त केली. बाबा कडे येणारे दुखी कष्टी मानवाला त्या मंत्र द्वारा त्यांना फुक मारून त्याचे दुःख पूर्ण पणे दूर होत नसल्यामुळे बाबा ने बाबा हनुमानजी ला मार्गदर्शन करण्याची विनंती केली. बाबा नी मार्गदर्शनामध्ये म्हटले की,  "सृष्टी रचयिता एक परमेश्वर की कृपा प्राप्त करनी होगी" इसके लिये हरदिन शाम को एक इसतरह पाच हवन करणा होगा. बाबा हनुमान जी ने केलेल्या मार्गदर्शना प्रमाणे हवन कार्य सुरु केले. तो दिवस रक्षाबंधन झाल्यावर चा दुसरा दिवस होता. पाचव्या दिवशी हवन समाप्त होऊन बाबा निराकार अवस्था मध्ये गेले असता ते आपले देहभान विसरून बसले अशाप्रकारे ते त्यांना विदेह स्थिती प्राप्त झाली होती. बाबा ची हि अवस्था पाहून त्याच्या परिवारातील सदस्य चिंताग्रस्त झाले. सहाव्या दिवशी परिवारातील 

सदस्ययांनी हवन करून कार्याची समाप्ती केली. तेव्हा बाबा पूर्ण पणे देह भान विसरून बसले होते आणि ते विदेह स्तिथी मध्ये होते बाबाना तेव्हा पूर्ण आकाशात एकच डोळा दिसत होता. दुसऱ्या दिवशी परिवाराच्या लोकांनी बाबाला विनंती केली की, "हे भगवान आप सेवक को इस विदेह स्तिथी से मुक्त करो" और सेवक की खुद्द की गृहस्ती है ! उन्हे गृहस्थी मे रखो" त्यावेळी भगवंताने बाबा च्या मुखकमलातून उत्तर दिले. 

"अगर आपका भाई आपको इतना प्यारा था, आपको उससे इतनी हमदर्दी थी

 तो आपने उसे भगवान की सेवा करणे क्यू लगाई, उस समय अपने उसे रोकना था"! 

अब सेवक भगवान का हो गया,

न किसी का रहा और भगवान सेवक का हो गया है! मेरा सर सेवक का धड और सेवक का सर  मेरा धड ऐसा विलीन हो गया है! इस तरह दोनो की आत्मा एक हो गई है!

काही वेळानंतर बाबाच्या मुखकमलातून भगवंताने परिवाराच्या लोकांना मार्गदर्शन केले.

की "सेवक भगवान बन गया है! इसलिये सेवक एकही समय साधा भोजन करेंगे! जिसमे दाल, चावल, सब्जी और घी होगा! और कोई महिला घर की हो या बाहर की उसकी छाव सेवक पर ना पडे! नही तो सेवक कही का नही रहेगा! जिंदा नही रहेगा"! अशाप्रकारे भगवंताने दैवी सक्तीची जागृती दिली. बाबाची हि विदेह स्तिथी पाहून चिंताग्रस्त झालेल्या परिवाराच्या लोकांना बाबानी मार्गदर्शन करून सांगितले की, परिवार वाले सुनो, आप सब लोग तीन माह तक भगवान से विनंती करो की, हमारे भाई की ये अवस्था समाप्त कर उन्हे ग्रहस्ती मे रखो! "भगवान को दया आयेगी तो बाबा गृहस्ती मे रहेंगे"! बाबाने केलेल्या मार्गदर्शनाप्रमाणे परिवाराच्या लोकांनी रोज सकाळी पहाटेचा सूर्य निघणाच्या अगोदर विनंती करण्याचे कार्य सुरु केले. त्या वेळेला तीन महिन्या पर्यन्त बाबा विदेह स्तिथी मध्ये होते. बाबा ची विदेह स्तिथी पूर्ण पणे समाप्त होऊन पूवीच्या अवस्थेत आले असता, तो दिवस १५ नोव्हेंबर  १९४८ चा होता. बाबा पूर्ण तीन महिने विदेही अवस्तेत होते ते पूर्ण पणे गृहस्तीत वापस आले म्हणून आपण सर्व सेवक आणि सेविका १५ 

नोव्हेंबर वार्षिक जनरल हवन कार्य साजरा करतो

तसेच आपण सर्व सेवक हवन कार्यात सहभाग घेऊन आपले दुःख दूर करतो 

नमस्कार जी 🙏 


आणि एवढे लिहून मी माझे लिहिणे बंद करतो व माझ्या लिहिण्यात काही चुका झाल्या असतील तर मी माझ्या वतीने सर्व सेवक दादा व सेविका ताईंना माफी मागतो

🙏सर्वाना माझा आदरपूर्वक सप्रेम नमस्कार🙏


परमपूज्य परमात्मा एक सेवक 

एकनाथ दादा गावंडे 

नमस्कार जी 🙏


*विचार क्रमांक २*


̶वरील विषयाला अनुसरून मी माझ्या अल्पबुद्धीने माझे विचार मांडण्याचे प्रयत्न करीत आहो.

     बाबा जुमदेवजी ना मिळालेल्या संन्याशाच्या मंत्राद्वारे 42 दिवसाची साधना केली व एका। भगवंताची कृपा प्राप्ती केली.

 बाबांनी भगवंताला मार्गदर्शन करण्याची विनंती केली, त्यावर भगवंतांनी सांगितले की श्रुष्टी निर्मात्या एका भगवंताची कृपा प्राप्त करावी लागेल. त्या करीत दररोज सायंकाळी एक त्याप्रमाणे हवन करावे. त्याप्रमाणे बाबांनी हवणाला सुरुवात केली.

 पाचव्या दिवशी हवन संपल्यावर बाबा निराकार अवस्थेत आले व  त्यांना विदेह अवस्था प्राप्त झाली.

   जवळ जवळ बाबा तीन महिने विदेह अवस्थेत होते.बाबांची विदेह अवस्था संपून  ते संपूर्ण शुद्धीवर आले तो दिवस म्हणजे 15 नोव्हेम्बर 1948. ज्यामुळे विदेह स्थिती संपून शुद्धीवर आले त्यामुळे हा दिवस सुद्धा  सेवकांसाठी अत्यंत महत्वाचा आहे.

       त्याची आठवण म्हणून 15 नोव्हेंबर ला दरवर्षी मंडळाच्या मानव धर्म मध्ये वार्षिक जनरल हवन कार्य करण्यात येतो.

माझ्या बोलण्यामध्ये काही भूल झाली असेल तर भगवान बाबा हनुमानजी ला माफी मागतो 

महाणत्यागी बाबा जुमदेवजी ला माफी मागतो तसेच माझे सेवक बंधू व सेविका  ताई याना माफी मागतो आणि माझ्या वाणीला विराम देतो.

       !!नमस्कार जी!!

               

सेवक = किशोर दादा खडशे 🙏🏻😊


*विचार क्रमांक ३*

   

     आजचा विषय खूप छान आहे. मी आज आपल्या परीने आजच्या विषयावर थोडक्यात विचार देण्याचे प्रयत्न करीत आहे.

  महानत्यागी बाबा जुमदेवजींनी अहो रात्र परिश्रम करून एका भगवंतांची प्राप्ती केली. व आपल्या सारख्या गोर गरीब जनतेला दुःखातून मुक्त केले. महानत्यागी बाबा जुमदेवजी ना मिळालेल्या सन्याशाच्या मंत्राद्रार 42 दिवसाची साधना करून भगवान बाबा हनुमानजी ची कृपा प्राप्त केली. बाबाकडे येणाऱ्या दुःखी मानवाला मंत्राद्रारे फुक मारून त्यांचे दुःख दूर करू लागले. परंतु भूतबांध्येचे पीडित लोकांचे दुःख पूर्णपणे दूर होत नव्हते. त्यामुळे बाबांनी हनुमानजीना मार्गदर्शन करण्याची विनंती केली. त्यामुळे हनुमानजी बाबाला सांगितले कि सुष्टी निमार्त्या एका परमेश्वराची कृपा संपादन करावी लागेल त्याकरिता दररोज सायंकाळी एक या प्रमाणे पाच दिवस हवन करावे.

   भगवान बाबा हनुमानजी केलेल्या मार्गदर्शन प्रमाणे बाबानी हवनला सुरुवात केली. पाचव्या दिवशी हवन संपल्यावर बाबा निराकार अवस्थेत आले. व देहभान विसरले व त्यांना ती विदेह स्थिती प्राप्त झाली आणि सहाव्या दिवशी कुटुंबातील लिकांनी हवन करून कार्याची समाप्ती केली. त्यावेळी बाबाच्या मुखातून चार वचन निघाले तेच चार वचन म्हणजे परमेश्वर प्राप्तीचे चार तत्व होय. बाबा तीन महिने विदेह स्थिती मध्ये होते बाबांनी स्थिती पाहून कुटुंबातील लोकांनी तीन महिने पर्यंत भगवान ला विनंती केली कि बाबाची अवस्था ठीक करा.

  बाबांनी केलेल्या मार्गदर्शना नुसार कुटुंबातील लोकांनी दररोज सकाळी विनंती करण्याचे कार्य सुरु केले. बाबा विदेहस्थिती तुन बाहेर आले त्याची आठवण म्हणून *दरवर्षी 15 नोव्हेंबर ला मंडळाच्या मानव मंदिर सभागृहात जनरल हवन कार्य करण्यात येत  असतो.*

  असे माझे मत आहे. माझ्या लिहिण्यात काही चूक झाली असेल तर मला माफ करावे जी.

        

         *🍀धन्यवाद जी 🍀*


   *🌹सर्वाना माझा नमस्कार जी🌹*

             *परमात्मा एक सेवक*

          *मोरेश्वर दादा देशमुख*


☘️🙏☘️🙏☘️🙏☘️🙏☘️🙏☘️


*विचार क्रमांक ४*

            

  *महानत्यागी बाबा जुमदेवजी यांनी त्यांना मिळालेला सन्यासाचा मंत्राने विधी आणि साधना करून बाबांनी भगवान बाबा हनुमानजी यांची कृपा प्राप्त केली.बाबांकडे येणाऱ्या दुखी कष्टी मानवांचे मंत्राने फुक मारून बाबा त्यांचे दुख पुर्णपणे दुर नाही करु शकत होते.यासाठी बाबांनी भगवान बाबा हनुमानजी यांना मार्गदर्शन करण्याची विनंती केली.भगवंतानी मार्गदर्शन केले व बाबांना सांगितले की सृष्टी रचिता एका भगवंताची कृपा प्राप्त करावी लागेल.याकरिता प्रत्येक दिवस सायंकाळी पाच दिवस हवन करावे लागेल.त्याच दिवसापासून बाबांनी हवन कार्याला सुरुवात केली.तो दिवस रक्षाबंधन नंतरचा दिवस होता.पाचव्या दिवशी हवन संपताच बाबा निराकार अवस्थेत आले व देहभान विसरले याप्रमाणे बाबांना विदेह अवस्था प्राप्त झाली.बाबाची हे स्थिती पाऊन परिवारातील लोक चिंतेमधे पडले साहाव्या दिवशी परिवारातील लोकांनी हवन कार्य करून कार्याची समाप्ती केली.*

                     *तेव्हा बाबा पुर्णपणे देहभान विसरले होते.व बाबा विदेह स्थिती मध्ये होते.बाबांना तेव्हा पुर्ण विश्वात एकच डोळा दिसत होता.दुसऱ्या दिवशी परिवारातील लोकांनी बाबांना विनंती केली." हे भगवान आप सेवक को इस विदेह स्थिती से मुक्त करो,और सेवक की खुद की गृहस्थी है.उन्हे गृहस्थी मे रखो"तेव्हा भगवंतानी बाबांच्या मुखकमलातुन उत्तर दिले की "अगर आपका भाई आपको इतना प्यारा था तो आपने उन्हे भगवान की सेवा करने क्यु लगाई उस समय आपने उन्हे रोकना था अब सेवक भगवान का हो गया है और भगवान सेवक का हो गया है । मेरा सर सेवक का धड और सेवक का सर मेरा धड ऐसा विलीन हो गया है,इस तरह दोनो की आत्मा एक हो गई है!" काही वेळाने पुन्हा भगवंतानी बाबांच्या मुखकमलातुन म्हटले "सेवक भगवान बन गया इसलिए सेवक साधा भोजन करेंगे दाल चावल सब्जी घी होगा । और किसी भी महिला की छाव सेवक पर ना पडे।नही तो सेवक जिंदा नही रहेंगा ।" अशाप्रकारे भगवंतानी सेवक ला दैवी शक्ती ची जागृती दिली.बाबांनी परिवारातील लोकांना मार्गदर्शन केले की "परिवार वाले सुनो । आप सब लोग तीन माह तक भगवान से विनंती करो की हमारे भाई कि यह अवस्था समाप्त कर उन्हे गृहस्थी मे रखे भगवान को दया आयेंगी तो बाबा गृहस्थी मे रहेंगे।" बाबांनी केलेल्या मार्गदर्शन अनुसार परिवारातील लोकांनी भगवंताला विनंती करण्याचे कार्य सुरु केले.बाबा तीन महिने विदेह अवस्थेत होते.बाबांची विदेह अवस्था पुर्ण होऊन बाबा होश मध्ये आले ती तारीख होती 15 नोव्हेंबर 1948 बाबा तीन महिने विदेह अवस्थेत होते.आणि 15 नोव्हेंबर ला गृहस्थी मध्ये वापस आले.याकरिता आपन सर्व सेवक  15 नोव्हेंबर ला वार्षिक जनरल हवन कार्य दिवस मनवत असतो.बाबांची विदेह स्थिती समाप्त होऊन बाबा पुर्णपणे होश मध्ये आले हे आठवण राहण्याकरिता दर वर्षी 15 नोव्हेंबर ला मानव मंदिर भवनामध्ये जनरल हवन कार्यक्रम आयोजित होत असते.या दिवशी सर्व सेवक भवनामध्ये डब्बा घेऊन येतात व एकत्र भोजन करतात.अशाप्रकारे हवन कार्याचे महत्त्व आहे.*

               *माझ्या कडून विचार लिहीण्यात काही चुका झाल्या असेल तर मला क्षमा करावी.*


*बाबांचा सेवक*


*वैभव श्रावणजी ढोडरे*


*आदरपूर्वक नमस्कार जी*


*विचार क्रमांक ५*


महांनत्यागी बाबा जुमदेवजींनी आम्हाला मानव बनविले आमच्यात मानवता रूजवुन आज बाबांनी लावलेल्या "सत्याचं रोप" वटवृक्ष होवुन आनंदाने सेवकांना उजळून डौलाने फडकत आहे . महान कार्य करतांना बाबांना खूप अडचणी आल्या आणि त्याची माहिती आम्हा सर्व सेवकांना आहे बाबांनी अविरत कष्ट करून हाडाची काडे केली उन्हाळा पावसाळा हिवाळा कुठलाही ऋतू आपल्यासाठी समाधान कारक नाही हे विचार बाबांनी कधीही केले नाही थंडी असो ऊन असो वारा असो पाऊस असो बाबांनी सतत सेवकांना मार्गदर्शन व मार्गाचा प्रचार प्रसार करून   मानवधर्माची शान आजही जगाच्या पाठीवर राज्य करीत आहे

आजचा विषय खुप सुंदर आहे कारण बाबांनी सौराष्ट्र दौरा करीत असताना "वीरपूर" ला जेव्हा बाबा गेले तेव्हा त्यांनी "जलाराम बापू" चे मंदिर पाहिले या मंदिरामध्ये कुठलीही मूर्ती नव्हती व एकदम शांत सुख समाधानी मिळावी अशी रचना केली होती आणि हे सर्व बाबांना मनातून आवडलं व त्यांना आपल्याही सेवकांसाठी चांगलीशी जागा मिळवून" मानव मंदिर"बांधण्याचा विचार केला आणि तिथूनच प्रेरणा घेऊन बाबांनी नागपूरला" मानव मंदिर" उभारले.

मानव मंदिर उभारण्यासाठी बाबांनी प्रत्येक सेवकाकडून एक हजार एक रुपयाचे दान मागितले आणि त्यापेक्षाही ज्यांनी जास्त दान दिले ते पण स्वीकारले परंतु कुठल्याही धनाढ्य श्रीमंत लोकांकडून त्यांनी दान घेतले नाही या कार्यामध्ये पहिले दान एक हजार एक रुपयाचे श्रीमती नागाबाई किसन धापडे हिने 28 फरवरी 1980 ला दिले . आज पहिले नाव श्रीमती नागाबाई यांचे आहे यावर सुंदर एक उदाहरण आपल्या समोर ठेवत आहे नागाबाई ह्या विधवा होत्या बाकी धर्मात विधवा बाई चे दान अशुभ मानल्या जाते पण आमच्या बाबांनी स्त्रीला सती सावित्री चा दर्जा दिला आहे स्त्रीला सन्मानित केले आहे आणि आजही पहिले दान विधवेने दिले तरीपण बाबांनी ते स्वीकारले व आज भव्य वास्तू ही उभी आहे किती मोठं वैचारिक विचार बाबांनी केला आणि हीच वैचारिक क्रांती बाबांच्या शब्दा शब्दाच्या अक्षरातून आपल्याला जाणवते

मानव मंदिराची जागा मिळाली भव्य वस्तू तयार झाली याच ठिकाणी वाचनालय, परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ दवाखाना, सेवकांच्या मुलांसाठी शिक्षण सोयीचं व्हावं म्हणून राहता येण्याची सोय व सर्वात मोठी गोष्ट म्हणजे मानव धर्माचे प्रत्येक कार्यक्रम या वास्तूमध्ये होतात त्यामुळे सेवकांची कुठलीही गैरसोय नको व्हायला म्हणून सुसज्ज अशी इमारत आजही आमच्या समोर आहे

ह्या देशांमध्ये श्रीमंत लोकांच्या अनेक संस्था आहेत अनेक वास्तू आहेत परंतु बाबांनी जे स्वप्न पाहिले होते माझ्या गरीब सेवकांच्या मदतीने" मानवधर्माची" व" परम पूज्य परमात्मा एक सेवक मंडळ नागपूर" यांची वास्तु तयार व्हावी बाबांचे हे स्वप्न पूर्ण झाले जवळपास या इमारतीला 26 लाख 70 हजार रुपयांचा खर्च आला व हा सर्व पैसा गरिबांच्या कष्टाच्या पैशातून" मानव मंदिराची" भव्य वास्तू बाबांनी तयार केली. या भवनाचे वास्तुपूजन 25 नोव्हेंबर 1986 रोजी महांत्यागी बाबा जुमदेवजी यांच्या शुभ कर कमला द्वारे करण्यात आले. 25 नोव्हेंबर हा आमचा वार्षिक जनरल हवन कार्याचा दिवस येत होता  पण 1986 ला भगवंताचा प्रगट दिन 25 ऑगस्ट रोजी संपन्न झाला होता बाबांनी जेव्हां परमेश्वराची प्राप्ती केली त्यावेळी बाबा तीन महिने विदेही अवस्थेत राहिले होते व हे तीन महिने म्हणजे बाबा भगवंतात व भगवंत बाबात विलीन झाले होते म्हणून बाबांनी सर्व सेवकांना आपल्या मार्गदर्शनात सांगितले की हे तीन महिने सोडून वास्तूचे पूजन करा कारण वास्तु पूजन म्हणजे गृहप्रवेश बाबांनी सुद्धा तीन महिन्यानंतर  विदेही अवस्था संपवुन आपल्या प्रपंचामध्ये प्रवेश केला . बाबांनी आपल्याला जो आदेश दिला  आहे तो आदेश म्हणजे भवनात" प्रगट दिन" साजरा केल्यानंतर तीन महिन्यांनी प्रत्येक वर्षी" प्रकट दिन" 15 ऑगस्ट ला व 15 नोव्हेंबरला" वार्षीक जनरल सामूहिक हवन" कार्य भवनात करण्यात येईल व बाबांच्या या कार्याला आजही परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ नागपूर बाबांच्या आदेशाचे पालन करीत आहे या मार्गातील सेवक श्रमिक कष्टकरी असल्यामुळे शेतकरी मजूर लोकांना या महिन्यांमध्ये वेळ मिळते व सुगीचे दिवस आलेले असतात आनंदाच्या क्षणी सर्वांच्या भेटीगाठी होऊन मानवधर्माचे महत्व व आम्ही मानत असलेला हा सण आमच्यासाठी खूप महत्त्वपूर्ण आहे आम्हाला या कोरोना  पासून जरी कार्यक्रमाचा प्रत्यक्ष लाभ घेता येत नसला तरीपण आज अनेक ग्रुपच्या माध्यमातून चर्चा बैठकीच्या माध्यमातून काही सेवक लोक सुंदर कार्य करीत असतात व आमच्यासारखे सेवक भगवंतगुणांच  बाबांच्या  मार्गदर्शनाचा लाभ घेत असतात आणि म्हणूनच आजच्या विषयावर मी आपल्या समोर जे विचार ठेवले आहेत ते ह्या ठिकाणी संपवीत आहे

माझ्या लिखाणात काही चूक झाली असल्यास मला क्षमा करणे

सर्वांना माझा नमस्कार जी🙏

शिवानी काटकर सेविका लाखनी


*विचार क्रमांक ६*


आजचा विषय छान आहे यावर मी माझे विचार व्यक्त करीत आहे सर्वात आधी आपणास सांगू इच्छितो की आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे आणि आज जे विचार लिहीत आहे ते परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमान नगर नागपूर यांच्या मार्फत प्रकाशित करण्यात आलेले मानवधर्म परिचय पुस्तक कि तील आहे.


महानत्यागी बाबा जिंदगी जीनी त्यांना मिळालेल्या संन्यासाच्या मंत्र द्वारे 42 दिवसांची साधना करून भगवान बाबा हनुमान जी की कृपा प्राप्त केले बाबांकडे येणाऱ्या दुखी मानवाला मंत्राद्वारे खूप मारून त्यांचे दुःख दूर करू लागले परंतु बुद्धीने पीडित लोकांचे दुःख पूर्णपणे दूर होत नव्हते त्यामुळे बाबांनी हनुमांजी ना मार्गदर्शन करण्याची विनंती केली त्यावर मार्गदर्शन करताना बाबा हनुमानजी नी बाबा ला सांगितले की सृष्टी निर्मात्या एका परमेश्वराची कृपा संपादन करावी लागेल त्याकरिता दररोज सायंकाळी एक याप्रमाणे पाच दिवस हवन करावे हनुमान जी ने केलेल्या मार्गदर्शनाप्रमाणे बाबांनी हवनाला सुरुवात केली पाचव्या दिवशी हवन संपल्याबरोबर बाबा निराकार व्यवस्थित आले व देह भान हरवले तसेच त्यांना विदेह स्थिती प्राप्त झाली बाबांची ही स्थिती पाहून कुटुंबातील मंडळी काळजीत पडली सहाव्या दिवशी कुटुंबातील लोकांनी हवन करून कार्याची समाप्ती केली त्यावेळी बाबाच्या मुखकमल आतून चार वचन निघाले ते चार वचन म्हणजे परमेश्वर प्राप्तीचे चार तत्त्व होय दुसऱ्या दिवशी मंडळींनी बाबांना विनंती केली की हे हे भगवान आप सेवक को इस विधेयक स्थिती से मुक्त करो सेवक कि गृहस्ती है बच्चा है तेव्हा परमेश्वराने बाबांच्या मुखकमल आतून उत्तर दिले कि अगर आपका भाई आपको इतना प्यारा था आप कोनसे इतनी हमदर्दी है तो आपको उसे भगवान की सेवा करने क्यो लगाई उसे हम दर्दी तो आपको से भगवान की सेवा करने क्यो लगाई उसे हमदर्दी तो आपने उसे रोकना था आप सेवक भगवान का हो गया किसी का रहा है और भगवान सेवक का हो गया है मेरा सर सेवक धड और सेवा का सर मीरा धड ऐसा विलीन हो गया है इस तरह दोनों की आत्मा एक हो गई है थोड्यावेळाने भगवंताने पुन्हा घरच्या मंडळींना उद्देशून बाबाच्या मुखकमलातुन शब्द काढले की सेवक भगवान बन गया इसले सेवक एकी समय थोडासा साधा भोजन करेंगे और कोई भी औरत घर की होया बहार की उसकी छाव सेवक पर ना पडे काही का नही रहेगा जिंदा नही रहेगा अशाप्रकारे भगवंताने सेवकाला दैवी शक्तीची जागृती दिले बाबांची ही स्थिती पाहून काळजीत असलेल्या कुटुंबातील लोकांना एके दिवशी बाबांनी मार्गदर्शन केले की घरवाली सुनो आप सब लोग तीन महिने तक भगवान से विनंती करू की हमारे भाई की अवस्था समाप्त कर उसे गृहस्ती मे रखो भगवान को गया आयेंगे तो बाबा गृहस्ती मे रहेंगे केलेल्या मार्गदर्शनानुसार कुटुंबातील लोकांनी दररोज सकाळी सूर्योदयापूर्वी विनंती करण्याचे कार्य सुरू केले जवळ जवळ तीन महिने बाबा विदेही स्थितित होते बाबांची स्थिती संपून ते पूर्ण शुद्धीवर आले तो दिवस म्हणजे 15 नोव्हेंबर 1948 मंत्राद्वारे परमेश्वरी कार्य करणे म्हणजे संन्यासी होऊनच परमेश्वरी खूप मारून इतरांचे दुःख दूर करू शकतो गृहस्ती मध्ये राहणारा व्यक्ती ते कृपा प्राप्त करू शकत नाही परंतु महांत्यागी बाबा द्वारे प्राप्त केलेली परमेश्वरी कृपा आपल्या त्यागाने व निष्काम कर्मयोग द्वारे गृहस्थाश्रमात आलेल्या दुःखीकष्टी लोकांच्या कल्याणाकरिता उपयोगात आणून त्यांना समाधान मिळवून दिले आहे जर बाहेर आले नसते तर गृहस्थी मध्ये मानवाला ह्या कृपेचा लाभ घेता आला नसता त्यामुळे बाबांनी विदे स्थिती संपून शुद्धीवर आले त्यामुळे तो दिवस सुद्धा सेवकांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे त्याची आठवण म्हणून दरवर्षी 15 नोव्हेंबरला मंडळाच्या मानव मंदिर सभागृहात वार्षिक हवन कार्य करण्यात येत असतो त्यात सहभागी होणारे सेवक आपापले जेवणाचे डबे आणत असून हवन कार्य झाल्यानंतर भगवत काढायचे चर्चा बैठक होऊन सर्व सेवक सहभोजनाचा आनंद उपभोक्ता त्यानंतर सेवकांच्या सांस्कृतिक कार्यक्रम ठेवण्यात येतो ह्या वार्षिक हवन कार्य सुद्धा लाखो सेवक स्त्री-पुरुष आपापल्या डब्यात सह उपस्थित राहून या परमेश्वरी कार्याचा लाभ घेतात



वरील माहिती ही मानव धर्म परिचय निवृत्ती मराठीतील मंडळ मंडळाद्वारे संचालित पुस्तक कि तिला आहे


लेखन

मानवधर्म एकता परिवार एडमिन ग्रुप


*विचार क्रमांक ७*


भगवान बाबा हनुमान जि को प्रनाम महान त्‍यागि बाबा जुमदेवजि को प्रनाम परमात्‍मा एक आजचा विषय खुप सुंदर आहे महान त्‍यागि बाबा जुमदेवजी नि अथक परिश्रमातुन मानवधमऀची स्‍थापना केली बाबा जुमदेवजीना एका संन्‍यास्‍याद्‍वारे एका भगवंताचि सिध्‍दि मंत्र प्राप्‍त झाला एका परमेश्‍वराच्‍या सिध्‍दिद्‍वारे 42 दिवसांची साधना करून भगवान बाबा हनुमान जिंची चैतन्‍यरुपी कृपा दृष्‍ठि प्राप्‍त केली दु;खि कष्‍ठि दिन दलित मानवाच्‍या  परिवाराचे दु:ख मंत्राद्‍वारे फुक मारून  दुर करू लागले परंतु भुतबाधेने वैदवानी केलेल्‍या परिवारातिल दु:ख पुणऀपने दुर होत नव्‍हते त्‍यामुडे बाबानी भगवान बाबा हनुमान जिंना मागऀदशऀन करण्‍याची विनंती केली त्‍या वर भगवान बाबा हनुमान जींनी मागऀदशऀन करतांना बाबा जुमदेवजींना सांगितले की सृष्‍ठि निमऀता एका भगवंताची कृपा संपादन प्राप्‍त करण्‍यासाठी दररोज सायंकाळी एक याप्रमाने दररोज पाच दिवस त्रिकाल हवन कायऀ करावे लागेल त्‍याच दिवसापासुन बाबा जुमदेवजींनी त्रिकाल पाच दिवस दिवस रात्र हवनकायऀला सुरुवात केलि तो दिवस रक्षाब्‌धन नंतरचा दिवस होता पाचव्‍या दिवसी हवनकायऀ संपताच बाबा जुमदेवजी आपले देहभान विसरून निराकार अवस्‍थेमदये आले याप्रमाने बाबांना विदेह अवस्‍था प्राप्‍त झाली बाबांचि विदेह स्‍थिती पाहुन परिवारातील लोक चिंतेमदये पडले आणि सहाव्‍या दिवसी परिवारातील सवऀ सदस्‍यांनी हवनकायऀ करुन कायऀची समाप्‍ती केली बाबा जुमदेवजी आपले पुणऀ   देहभान विसरले हौते विदेह अवस्‍थेमदये बाबा जुमदेवजींना सँपुणऀ विक्ष्‍वामदये एकच डोळा दिसत होता दुसर्‍या दिवसाला परिवारातिल लोकांनि बाबांना विनंती केलि की हे भगवान आप सेवक को इस विदेह अवस्‍था से मुक्‍त करो और सेवक को खुद की गृहस्‍थी होने के कारन उन्‍हे गृहस्‍थी अवस्‍था मे रखो तेव्‍हा परमेश्‍वरांनी बाबांच्‍या मुखकमलातुन उदगार काढले की अगर आप का भाई ईतना प्‍यारा था तो आप ने उन्‍हे भगवान की सेवा करने क्‍यु लगाई उस समय आप को उन्‍हे रोकना चाहीए था अब सेवक भगवान का हो गया मेरा सर सेवक का धड और सेवक का सर मेरा धड ऐसा विलीन हो गया है ईस तरह दोनो की आत्‍मा एक हो गई है काही वेळाने पुन्‍हा परमेश्‍वरानी बाबांच्‍या मुखकमलातुन म्‍हटले की सेवक भगवान बन गया ईस लीए सेवक साधा भोजन करेंगे दाल चावल सब्‍जी घी होगा और किसी भी महीला कि छाव सेवक पर ना पडे नही तो सेवक जिंदा नहि रहेगा अस्‍याप्रकारे परमेश्‍वरांनी सेवकांना दैवी शक्‍तीची जागृती दिली बाबांनि परिवारातिल लोकाना मागऀदशऀन केले की आप सब लोक तिन माह तक भगवान से विनंति करो की हमारी भाई कि यह विदेह अवस्‍था  समाप्‍त कर उन्‍हे गृहस्‍थी अवस्‍था मे रखे भगवान को दया आयेगी तो बाबा गृहस्‍थी अवस्‍था मे रहेंगे बाबांनि केलेल्‍या मागऀदशऀनानुसार परिवारातील सवऀ सदस्‍यांनी एका परमेश्‍वराला विनंति करण्‍याचे कायऀ सुरु केले बाबा तीन महीने विदेह अवस्‍थेतुन पुणऀ होउन बाबा  गृहस्‍थि अवस्‍थेमदये आले ती दिनांक 15नोव्‍हेंबर 1948 बाबा तिन महीने विदेह अवस्‍थेत होते आनि 15 नोव्‍हेबरला गृहस्‍थीअवस्‍थेत वापस आले या करिता आपन सवऀ सेवक दादा 15 नोव्‍हेबरला वार्षिक जनरल हवन कायऀ दिवस साजरा करित असतो 15 नौव्‍हेबरला मानवमंदीर भवनामदये जनरल हवनकायऀ कायऀक्रम आयोजित होत असतै या दिवसी सवऀ सेवक दादा भवनामदये डब्‍बा घेउन येतात व एकत्र भोजन करतात  विचार देन्‍यात काही चुक भुल झालि असेल तर सवऀस्‍वि क्षमा असावी :;


बाबांचा सेवक:;

विजय रोकडे🙏सवऀ सेवक दादा सेविका ताई बालगोपाल सर्वांना नमस्कार जि🌹🙏



*[टिप :- वरिल विचार कुणिही काँपी करु नये, त्यापेक्षा जास्तीतजास्त शेअर करावा.]*


*भगवतकार्याच्या या गृपला जुडण्याकरिता व आपले परमेश्वरिकृेचे अनुभव सेवकांपर्यत चर्चा बैठकी चा लाभ व प्रश्न मंजुषा मध्ये पोहोचवीण्याकरिता खालील सेवक दादांशी संपर्क साधावा...*


*गणेश दादा बिडकर :-9766573410*

*मोहन दादा आस्वले:-9764989883*

*रोशन दादा काटेकर:-8956656210*

•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••


सौजन्य :-

"अॅडमिन,सेवक,सेविका",

मानवधर्म एकता परिवार,

[Wats app group & Facebook page}

युवा आणि जेष्ठ सेवकांचा समुह,

परमपुज्य परमात्मा एक सेवक मंडळ, वर्धमाननगर, नागपुर.

©®


••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••

No comments

Powered by Blogger.