नियमावलीप्रमाणे मार्गातील साध्या व पक्या सेवकांकरिता नियम"
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
*|भगवान् बाबा हनुमानजी को प्रणाम|*
*||महानत्यागी बाबा जुमदेवजी को प्रणाम||*
*||परमात्मा एक।।*
🍃🍃🍃🍃🍃🍃🍃🍃
*🌻 मानवधर्म एकता परिवार व्हाट्सअप ग्रुप तर्फे दिनांक २९/११/२०२१ सोमवार दिवशी घेण्यात आलेल्या चर्चा बैठकिचा विषयावर गृप मधील आलेले विचार एकदा अवश्य वाचावे🌻*
🌿🌿🌿🌿🌿🌿🌿
*➡️"नियमावलीप्रमाणे मार्गातील साध्या व पक्या सेवकांकरिता नियम"*
*नियम क्रमांक १) नवीन मार्गात येणाऱ्या सेवकांना परमेश्वरी कृपेचा अनुभव मिळाल्यानंतर जीवनात कोणत्याही प्रकारचे भावना अथवा कल्पना उत्पन्न करून नये. मरे या जिये भगवत नामपर या तत्वाप्रमाणे जीवनात ध्येयाने एकच परमेश्वर मानावा.*
*वरील नियमाला सेवक कशाप्रकारे समजतो*
*विचार क्रमांक १*
*सर्व प्रथम सर्व सेवक दादा व* *सेविका ताईंना माझा सप्रेम* *नमस्कार व आजच्या* *चर्चा बैठकीच्या* *विषयांवर मी माझे अल्पमत* *सादर करीत आहे*
*आमचे सदगुरू महान त्यागी* *बाबा जुमदेवजी यांनी* *अहोरात्र परिश्रम करून* *मानव धर्म निर्माण* *केला आहे,*
*मानव या पुथ्वी तलावर जन्मा* *आला, परंतु तो* *परमात्माचा अश आहे* *परमेश्वराने त्याला बुद्धी आणि* *अन्य गुण दिले आहे* *आणि त्याच बरोबर* *त्याला मोह माया अहंकार* *सुद्धा दिला आहे, आणि तो* *स्वतःला सर्वे सर्व परमेश्वर* *समजत आहे, आणि* *तो परमेश्वर ला मानत* *नाही, आणि तो याच* *गुणाने मोह माया अहंकार मध्ये फसतो, आणि तो दुःखी होतो, आणि या दुःखाचे निराकरण करण्यासाठी कित्येक प्रकारचे उपाय करतो, आणि जेव्हा* *त्याचे दुःख दूर होत नाही तेव्हा त्याला परमेश्वराची आठवण येते, आणि तो* *परमेश्वराचा धावा करतो, आणि आमचे सद्गुरु आपल्या मार्गदर्शनात नेहमी* **सांगत की मानव हा सर्वे सर्व्ह नाही, मनुष्य हा कर्म कर्ता आहे, आणि मानवाने फळाची अपेक्षा करू नये, फळ देणारा हा* *परमेश्वर आहे, म्हणून मनुष्य जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत त्याने आपल्या रोजच्या जीवनात परमेश्वराला प्रिय असणारे कार्य करावे, आणि त्याला मृत्यू आल्यावर त्याची आत्मा परमेश्वरात विलीन होते, अन्यथा त्याची आत्मा भटकत राहते, त्याची आत्मा अशात राहते, आणि परमेश्वराला समोर ठेवून कार्य केले तर त्याच्या तून मोह माया अहंकार नष्ट होते, आणि बाबा च्या असे लक्ष्यात आले होते की सेवक मार्गात आल्यानंतर जुनी भावना उत्पादन करून दुखास पात्र होतात म्हणून माझ्या मते सेवक लोकांनी या मार्गात प्रवेश केल्यावर कसल्याही प्रकारची भावना निर्माण करू नये आणि दुखास पात्र होऊ नये, व वरील विषयाला मानून या मानव धर्माचा प्रसार व प्रचार करावा व या मार्गात मरे या जिये भगवंत नामपर या नियमाला समोर ठेवून आपले जीवन जगत राहावे आणि मी माझ्या अल्पमताने विचार सादर करून आपल्या वाणीला विराम देतो आणि विचार सादर करत असताना माझ्या लिहिण्यात काही चूक झाली असेल तर मी भगवान बाबा* **हनुमानजी ला माफी मागतो व महान त्यागी बाबा जुमदेवजी ला माफी मागतो तसेच सर्व सेवक दादा व सेविका ताईला सुद्धा माफी मागतो व आपल्या वाणीला विराम देतो*
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
*आपलाच सेवक*
*महेंद्र रामभाऊ जी पडोळे
रा, पोस्ट सिल्ली, तालुका-कुही, जिल्हा-नागपुर
सेवक क्रमांक२९२४*
*विचार क्रमांक २*
महांनत्यागी बाबा जुमदेवजींनी एका भगवंताला दोन वचने दिली होती परमात्मा एक, मरेया जीये भगवत नामपर ही दोन वचने बाबांनी भगवंताला दिली आहेत याच नुसार आपण मार्गात प्रवेश करतो तेव्हा मार्गदर्शक सुद्धा आपल्याला हा मार्ग मरण्याचा आहे असे सांगतात या मार्गात आल्यानंतर अनेक देवी-देवतांचे पूजन न करता हे ध्येयाने एकाच परमेश्वराला मानावे लागते. आपण दुःखात असतो आपल्याला कुठेही थारा नसतो चहूबाजूंनी आपण अंधार वाटेने चालत असतो त्यात अनेक वेळा खाचखळगे खाऊन आपण वेदनेने तळमळत असतो ह्या वेदना इतक्या जिव्हारी लागलेल्या असतात की आपल्याला जेव्हा "परमात्मा एक" मार्गाची कोणीतरी माहिती सांगतो त्यावेळी आपण फक्त आणि फक्त आपल्या कुटुंबाचा व आपल्या स्वतः चा सुख समाधान शोधत असतो कुटुंबाला सुद्धा हे सुख समाधान पाहिजे असते आणि त्यावेळी आम्ही बाबांना दिलेल्या वचनाप्रमाणे वचनबद्ध होतो" मरे या जीये भगवत नाम पर" मी मरीन कींवा जगेन, ध्येयाने एकाच परमेश्वराला मानेन.
आमचे ध्येय मजबूत असतात आम्ही एक चित्त एक लक्ष एक भगवंत अशी एकाग्रता साधून एका परमेश्वराच्या चरणी मेलेले असतो आमचे दुःख दूर होतात कारण त्यावेळेस विचलित झालेले मन एकवटून आम्ही बाबांच्या शिकवणीप्रमाणे तत्व शब्द नियमाचे पालन करत कार्य करीत असतो.
काही दिवसात आमचे दुःख दूर होतात आम्हाला सुख समाधान मिळते आणि आमच्या कुटुंबाची प्रगती उंचावते त्यावेळी मात्र आम्ही वेळेनुसार कार्य करीत नाही मग बोलण्या चालण्यात वागण्यात आमच्यातील तीन शब्दाचा पालन होत नाही आणि कुठेतरी आम्ही केलेले कर्म चुकतात आणि ते चुकलेले कर्म आम्हाला दुखाची झळ पोहोचवतात त्यावेळी आमचे मन विचलित होते कुठेतरी मनाची एकाग्रता साधत नाही आम्ही स्वतःची चूक शोधण्याऐवजी अनेक प्रकारच्या भावना व संभ्रमणात आम्ही आपले विचार परावर्तित करतो कुठेतरी नकारात्मक विचार आमच्या मनात येतात पण आम्ही दिलेल्या वचनाला विसरतो" मरे या जिये भगवत नाम पर"आमचे हे वचन ज्यावेळी आमच्यावर दुःख होते त्यावेळी आम्ही मेलो होतो व आज मरणाच्या वाटेवर ती लागलो त तर दुःख दूर करणारी ही दैवी शक्ती आपल्या जवळच आहे आपले दुःख दूर करण्याकरता आपण एका भगवंताला जर आपली चूक सांगितली आपल्या चुकीची सोडवणूक केली तर नक्कीच आपल्याला यश मिळेल बाबांनी आम्हाला सांगितलं आहे जो सेवक तत्व,शब्द ,नियमाने वागेल त्याच्या पायाला काटा ही रुतणार नाही ह्या बाबांच्या शब्दाची आठवण ठेवून आपण जीवनात ध्येयाने एकच परमेश्वर मानावा
कारण कर्ता-करविता भगवंत आहे आपण फक्त कर्म करायचे आहेत ते पण बाबांच्या शिकवणीने व दिलेल्या तत्व शब्द नियमाने शुद्ध आचरण पवित्र विचार मनात आणून कुठल्याही भावनेला स्थान न देता आपलं जीवन जगणे आहे हा मार्ग जगावेगळ आहे आणि कर्मावर आधारित आहे जो चांगले कर्म करेल त्याचं चांगलं होईल आणि जो वाईट कर्म करेल त्याचे फळ त्याला भोगावे लागतील कर्म आपण करायची आहे फळ देणारा भगवंत आहे आणि म्हणूनच सेवकांनी परमेश्वरी कृपेचा अनुभव मिळाल्यानंतर आपण दिलेल्या वचनाप्रमाणे मरेपर्यंत वाटचाल करायची आहे
एवढे विचार देत मी माझे लिखाण बंद करते माझ्या लिखाणात काही चूक झाली असल्यास मला क्षमा करणे
सर्वांना माझा नमस्कार जी🙏
शिवानी काटकर सेविका लाखनी
*विचार क्रमांक ३*
*आजच्या विषय नियमावली प्रमाणे मार्गातील साध्या व पक्का सेवकांकरिता नियम तरी ही मी आपले बुध्दी नुसार आपले विचार मांडले आहे महात्यागी बाबा जुमदेवजी यांनी अफाट कष्ट करुन या कृपेला साध्ये केलं बाबांनी जेंव्हा विधी चालु केली खुप अदचन आली बरेचशे गोष्टी ला तोंड द्यावे लागले महात्यागी बाबा जुमदेवजी यांनी एका भगवंताला प्राप्त करुन ते आपल्या गरीब दु:की कष्टी मानवा पर्यंत पोहोचली आहे तरी ही आपल्या मानव हा मोह माया अहंकार न फसावा म्हणून बाबा आपल्या काही नियम दिले व सत्य मर्यादा प्रेम जीवना आचरण करावे म्हणून त्या महात्यागी बाबा जुमदेवजी आपल्या सर्व सेवक पर्यंत दिले आहे आणि बाबांनी प्रतिज्ञा केल्याप्रमाणे त्या शक्तिंचे संशोधन करण्यास सुरुवात केली त्यांनी हनुमानजी समोर प्रश्न ठेवला की हे हनुमानजी संसार में ऐसी कौनसी शक्ती है जो सैतान को पल में निकाल सके भुत किस कहे और भगवान किसे कहे इसका स्पष्टीकरण हमें समजा दो त्यावा पासनु बाबा जुमदेवजी यांनी फक्त एका भगवंताला मानाला लागले बाबा का सिर और भगवान ढंळ भगवान का ढंळ तो बाबा सिर हो गया है असं भगवंतांनी बाबींचे भावाला म्हटले म्हणून सेवकाना बाबानी एकाच भगवंताला मानाला सांगीतले व मरे या जिरे भगवत नाम पर सेविका सांगीतले आहे*
*सर्व सेवक दादा व सेविका ताईंना नमस्कार काही लीहीनेत चुक बुल झाली असनार तर भगवान बाबा हनुमान व महात्यागी बाबा जुमदेवजी आणि सर्व सेवक दादा व सेविका ताईंना माफी मागते🙏🙏*
सेवक = ऋषिकेश गुरनुले 🙏🏻😊😊
*विचार क्रमांक ४*
आजचा विषय छान आहे यावर मी माझे विचार व्यक्त करीत आहे महानत्यागी बाबा जुमदेवजी यांनी आपल्या परिवाराचे दुःख दूर करण्याकरिता आपल्या प्राणाचे आणि त्यागी वृत्ती मुळे एका भगवंताची प्राप्ती केली कालांतराने बाबांना विचार आला की या पृथ्वीवर असंख्य असे दुखी आणि गरीब लोकही आहे त्यांनाही या दुःखातून दूर करता यावे म्हणून मानव जातीला सुद्धा ही सेवा मोफत दिली आहे आपण सर्व सेवक या मार्गात दुःखामुळे प्रवेश केलेला आहे. आणि सर्वांना आराम आही मिळालेला आहे परंतु आपण सर्व दुःखातून मुक्त झाल्यानंतर ही आपल्या मनात अंधश्रद्धेविषयी भरपूर अशी भावना निर्माण होते आणि पुन्हा आपण दुखाच्या मार्गाने जातो परंतु सेवकांना बाबांनी दिलेल्या तत्व शब्द नियमाच्या आचरण अमलात आणणे गरजेचे आहे सेवकांना स्वतःच्या मनातील मोहमाया अहंकार जू बाळू बना फसवणूक पणा या सर्व गोष्टींचा त्याग करायला पाहिजे सर्व गोष्टीचा त्याग करून तेव्हाच आपल्याला परमेश्वर एक रुपयाला मिळेल कोणतीही शंका-कुशंका मार्गात प्रवेश केल्या नंतर कुणीही मनात धरू नये आणि तन-मन-धनाने एकाच भगवंताची कार्य करावे आणि भगवंताला शब्द द्यावे की मी मरणार किंवा जगीन फक्त भगवान बाबा हनुमानजी ला मनिन. आणि बाबांनी दिलेला तत्त्व शब्द नियमाप्रमाणे वागणूक करीत मी सुद्धा या गोष्टीवर आम्हाला करण्याचा प्रयत्न करेल आणि आपणही प्रयत्न करा ही विनंती नमस्कार
*आपला सेवक*
*रोशन विनोदराव काटेकर*
*अंबिका नगर नरसाळा रोड नागपुर*
*सेवक क्रमांक- ५९७/५७८८*
*विचार क्रमांक ५*
*मी थोडक्यात विचार मांडण्याचा प्रयत्न करतो*
*आपले सर्वाचे सद्गुरु महानत्यागी बाबा जुमदेवजी यांनी अपार मेहनत करून एका भगवंताची प्राप्ती केली आणि दुखी कष्टी गोरगरीब मानवाचे दुःख दूर केले आणि आपल्या ला मानवधर्म मार्ग जगा वेगळा मार्ग दाखवला आहे महानत्यागी बाबा जुमदेवजी यांनी आपल्याला शिकवण दिली आहे चार तत्व तिन शब्द पाच नियम दिले आहे हे शिकवण फक्त मानवधर्मात आहे आणि त्याच बरोबर आपल्या ला सत्य मर्यादा प्रेमाची आचरण करायचे आहे मानव हा बुधी जीवी प्राणी आहे परमेश्वरा आवडणारे त्याचे गुण आहे त्याच बरोबर मानवाला मोह माया अहंकार मध्ये जकडला आहे बाबा ने सांगितले आहे मोह माया अहंकार यांचा त्याग करावे लागेल कारण आपण ज्या वेळेस आपण मार्गाची रुपरेषा माहीत नसते त्या वेळेस आपण नविन असतो तर आपल्याला मार्गात यायचे आहे तर आपल्या ला मार्गदर्शक यांचे कडे जाऊन आपण त्यांना मला मार्गात यायचे* *आहे तर आपल्या ला मार्गदर्शक सविस्तर पणे मार्गाविषयी माहिती देते या मार्गात यायचे असेल तर* *मरावे लागते तर आपले उत्तर हो येते आणि कारण नविन सेवक हा परमेश्वरी कृपा चा अनुभव घेतो आणि कधी कालातर जुने* *विचार भावना अथवा कल्पना उत्पन्न करतो त्यामुळे दुखास पात्र होतो अशी भावना आपल्या मनात आणातची नाही असे मार्गदर्शक सांगतात म्हणून* च *बाबानी चार तत्व तिन शब्द पाच नियम दिले आहे आणि त्याच बरोबर आपल्या ला*
*मरे या जीए भगवंत नामपर*
*मरे या जीए भगवंत नामपर*
*मरे या जीए भगवंत नामपर*
*कारण आपले मन भटकू नये यासाठी की आपण मोह माया अहंकार कडे जाऊ नय*े
*मरे या जीए भगवंत नाम पर या तत्त्वानुसार जीवनात ध्येयाने एकच परमेश्वर मानने*
*मी आपले विचार इथेच थांबतो व सर्व प्रथम भगवान बाबा हनुमान जी ला माफी मागतो महानत्यागी बाबा जुमदेवजी ला माफी मागतो व वाराणसी आई ला सुध्दा माफी मागतो*
*बाबाचे सेवक खुशाल दादा पवार*
*सेवक क्र 50019*
*विचार क्रमांक ६*
आपले सदगुरु महाणत्यागी बाबा जुमदेवजी यांनी अहोरात्र परिश्रम करून एका भगवंताची प्राप्ती केली आहे आणि ती आपल्याला फुकट वाटून दिली. त्यामुळेच आपण या मार्गात बिनधास्त जगत आहोत.तरी काही मार्गात आलेले सेवक व सेविका आपल्या मनात जुने विचार किंवा भावना आणून दुःखी होत असतात.आपण या मार्गात प्रवेश करतेवेळी परमेश्वराला वचन देतो की मी मरीन किंवा जगीन जीवनात एकच भगवंत बाबा हनुमानजी लाच माणिन.त्यानुसार आपल्याला ते कार्य करायचे आहे.बाबांनी दिलेल्या तत्त्व शब्द नियमामांचा पालन करायला पाहिजे.आपण दिलेल्या शब्दावर भगवंत आपल्यासाठी धाऊन येतो.मग मनात शंका कुशंका आणून स्वतःवर दुःख आणू नये.बाबांनी सांगितलेल्या नियमानुसार जीवनात एकच भगवंताला मानायला पाहिजे.मी इथेच माझ्या वाणीला विराम देतो
माझ्या वाणीतून काही चूक भूल झाली असेल तर मला माफ करावे.
सर्वाना माझा नमस्कार जी
आपला सेवक
किशोर मारोती खडसे
मु.पो.सिल्ली ता.कुही जी.नागपूर
सेवक क्र.7828
*[टिप :- वरिल विचार कुणिही काँपी करु नये, त्यापेक्षा जास्तीतजास्त शेअर करावा.]*
*भगवतकार्याच्या या गृपला जुडण्याकरिता व आपले परमेश्वरिकृेचे अनुभव सेवकांपर्यत चर्चा बैठकी चा लाभ व प्रश्न मंजुषा मध्ये पोहोचवीण्याकरिता खालील सेवक दादांशी संपर्क साधावा...*
*गणेश दादा बिडकर :-9766573410*
*मोहन दादा आस्वले:-9764989883*
*रोशन दादा काटेकर:-8956656210*
•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
सौजन्य :-
"अॅडमिन,सेवक,सेविका",
मानवधर्म एकता परिवार,
[Wats app group & Facebook page}
युवा आणि जेष्ठ सेवकांचा समुह,
परमपुज्य परमात्मा एक सेवक मंडळ, वर्धमाननगर, नागपुर.
©®
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
Leave a Comment